Gaza stampede Tragedy 43 killed in food center stampede at gaza, Israeli forces accused of genocide
गाझा पट्टी : बुधवारी ( १६ जुलै) पुन्हा एकदा गाझात मृत्यूचा तांडव पाहायला मिळला आहे. गाझातील खान युनूस येथे अन्न वाटप केंद्राबाहेर चेंगराचेंगरीची घटना घडली आहे. यामध्ये ४३ जणांचा चिरडून मृत्यू झाला आहे. अन्न मिळवण्याच्या प्रयत्नात असताना चेंगराचेंगरी झाली. याचा आरोप पुन्हा एकदा इस्रायली सैन्यावर करण्यात आला आहे. गेल्या काही महिन्यात चेंगारचेंगरीच्या अनेक घटना घडल्या आहेत. यामध्ये आतापर्यंत ८७० पॅलेस्टिनींचा मृत्यू झाला आहे.
गाझाच्या आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गाझा ह्युमॅनिटोरियन फाउंडेशन (GHF)सेंटरमध्ये ही घटना घडली आहे. मंत्रालयाने इस्रायली सैन्य आणि अमेरिकेवर पॅलेस्टिनींना जाणूनबुजून उपाशी मारत सामूहिक हत्या करत असल्याचा आरोप केला आहे. तर हिंसाचार भडकवल्याबद्दल हमासशी संबंधित घटनाना गाझाच्या आरोग्य मंत्रालयाने जबाबदार धरले आहे.
तसेच गाझाच्या सरकारी माध्यमांनी इस्रायली सैन्यावर पॅलेस्टिनींना ड्रग्ज पुरवल्याचा आरोपही केला आहे. गाझा ह्युमॅनिटोरियन फाउंडेशनकडून पॅलेस्टिनींना वाटप करण्यात आलेल्या अन्नात ऑक्सिकोडेन नावाच्या अंमली पदार्थाच्या गोळ्या आढळल्याचे गाझाच्या सरकारी माध्यमांनी म्हटले आहे. याशिवाय याला अमेरिकेकडून पाठिंबा मिळत असल्याचाही गंभीर आरोप केला जात आहे.
सध्या गाझामध्ये मोठ्या प्रमाणात नरसंहार पाहायाला मिळत आहे. २०२३ मध्ये सुरु झालेल्या युद्धापासून आतापर्यंत ५८ हजाराहून अधिक गाझावासी मारले गेल्याची माहिती समोर आली आहे. तसेच १ लाखांहून अधिक लोक जखमी झाले आहेत. गेल्या २४ तासांत ९४ जणांचा मृत्यू, तर शेकडो जखमी झाले आहेत. याशिवाय ५ लाख लोक उपासमारीला बळी पडत आहे. उपासमारीमुळे ५ पैकी १ व्यक्तीचा बळी जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
आतापर्यंतच्या इस्रायली हल्ल्यात गाझातील अनेक इमारतींच्या इमारती उद्ध्वस्त झाल्या आहे. अनेक लोक मलब्याच्या ढिगाऱ्यांखाली अडकून मरत आहे. आतापर्यंतच्या इस्रायली कारवाईत लाखो पॅलेस्टिनी मारले गेले आहेत. तसेच १.९ दशलक्ष लोक स्थलांतरित झाले आहे.
दरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गाझामध्ये युद्धबंदीचे आवाहन केले होते. त्यांनी युद्धबंदीसाठी चर्चा करणाऱ्या लोकांना २० महिन्यांपासून सुरु असलेले युद्ध थांबेल असा करार करण्याचे म्हटले होते. परंतु अद्याप यामध्ये त्यांना यश आलेले नाही.
सध्या गाझातील मृतांच्या आकड्यात पुन्हा एकदा वाढ होत आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. गाझातील लोकांना पायाभूत सुविधा मिळणे देखील कठीण झाले आहे.