Gaza war Houthi rebels attack on Israeli airport again
जेरुसेलम: इस्रायलच्या गाझामध्ये कारवाया सुरुच आहे. पुन्हा एकदा गुरुवारी (०६ जून) इस्रायलने लेबनॉनची राजधानी बेरुतवर हल्ला केा आहे. यामध्ये बेरुतमधील इमारतींना लक्ष्य करण्यात आले. या हल्ल्याचा बदला म्हणून पुन्हा एकदा येमेनच्या विद्रोह्यांनी इस्रायलच्या बेन गुरियान विमानतळावर हल्ला केला आहे. हे विमानतळ इस्रायलचे प्रमुख आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. हुथींच्या हल्ल्यामुळे विमानताळावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. यापूर्वी देखील गेल्या महिन्यांत ४ मे रोजी इस्रायलच्या बेन गुरियन विमानतळावर हल्ला करण्यात आला होता.
या हल्ल्याची माहिती हुथींच्या प्रवक्त्याने दिली. त्यांनी म्हटले की, तेल अवीवच्या पूर्वेकडील बेन गुरियन विमानतळावर क्षेपणास्त्र हल्ला करण्यात आला आहे. गाझातील लादलेल्या इस्रायलच्या उरासमारीच्या गुन्ह्यानुळे आणि लेबनॉनमधील बेरुतवर केलेल्या इस्रायली हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून ही कारवाई करण्यात आली आहे.
हुथी बंडखोरांचे प्रवक्ते जनरल याह्या सारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, या कारवाईमध्ये पॅलेस्टाईन-२ क्षेपणास्त्राचा वापर करण्यात आला. इस्रायलच्या गाझातील कारवायामुळे हा हल्ला करण्यात आला. विमानतळावरील हवाई वाहतूक बंद करणे आणि लाखो स्थायिकांना बॉम्ब आश्रयस्थानांमध्ये पळून जाण्यास हुथींनी भाग पाडले. हा त्यांच्या पूर्व निर्धारित उद्देश होता.
🇾🇪 Yemen Military: 🔴 In support of Palestine and in response to Israel’s strike on the southern suburb of Beirut in Lebanon, Yemen targets Ben Gurion Airport with a hypersonic missile…🚀🔥 pic.twitter.com/CI36R8iJx8 — SAQLAIN aBBas (@SaqlainAbbasPTI) June 6, 2025
इस्रायलच्या सैन्याचे गाझाली हल्ले आणि मानवतावादी मदत बंदी धोरण सध्या सुरुच आहे. यामुळे गाझातील लोकांना उपासमारीचा सामाना करावा लागत आहे. पायभूत सुविधा देखील मिळणे कठीण झाले आहे. यामुळे हुथींचे प्रवक्ते याह्या सारी यांनी गाझाच्या लोकांसाठी हा बदला घेतला असल्याचे म्हटले आहे.
त्यांनी म्हटले की, ” ही कारवाई निरापराध पॅलेस्टिनी लोकांसाठी एक विजय आहे. गाझातील इस्रायलच्या गुन्ह्यांना आणि बेरुतमधील दक्षणेकडील हल्ल्यांना आक्रमक प्रत्युत्तर आहे. येमेनी जनता आणि लढाऊ सैन्य गाझातील पॅलेस्टिनी लोंकाच्या पाठिशी आहे” जोपर्यंत इस्रायलाची गाझातील आक्रमकता संपत नाही, तोपर्यंत आवाज उठवला जाईल असेही याह्या सारी यांनी म्हटले आहे.
दुसरीकडे अमेरिकेच्या ट्रम्प प्रशासनाने इस्रायलविरोधी कारवाई करणाऱ्या आणि नेतन्याहूंच्या अटक वॉरंट जारी करणाऱ्या आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयाच्या न्यायाधीशांवर निर्बंध लादले आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. ह्यूमन राईट्स वॉचने ट्रम्प यांच्या या कारवाईला विरोध केला आहे. हे निर्बंध न्यायाच्या प्रक्रियेवर आघात करणारे असल्याचे ह्यूमन राइट्स वॉचने म्हटले आहे.