Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Hormuz Strait: तुमचं तुम्ही बघा! ट्रम्प यांच्या होर्मुझ प्लॅनला जर्मनीचा कडवा प्रतिकार; US ची ‘घाण’ साफ करण्यास बर्लिनचा नकार

US-Iran War: जर्मनीने होर्मुझच्या सामुद्रधुनीत लष्करी मोहिमेत भाग घेण्यास नकार दिला, परराष्ट्र मंत्री वाडेफुल म्हणाले की राजनैतिक कूटनीति आणि संवाद हाच एकमेव उपाय आहे, तर अमेरिका युती निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Mar 16, 2026 | 09:43 AM
germany rejects donald trump hormuz strait military coalition iran war marathi

germany rejects donald trump hormuz strait military coalition iran war marathi

Follow Us
Follow Us:
  • जर्मनीचा स्पष्ट नकार
  • ट्रम्प यांचा ‘सात देशांचा’ प्लॅन
  • ऑपरेशन अ‍ॅस्पाइड्सवर प्रश्नचिन्ह

Germany rejects US Hormuz Mission : मध्यपूर्वेतील युद्ध (US-Israel Iran War) आता केवळ रणांगणापुरते मर्यादित राहिले नसून, ते आता जागतिक मुत्सद्देगिरीच्या (Diplomacy) कसोटीवर उतरले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणच्या विरोधात आणि होर्मुझच्या सामुद्रधुनीच्या संरक्षणासाठी एक मोठी जागतिक आघाडी उघडण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, अमेरिकेचा सर्वात विश्वासू मित्र समजल्या जाणाऱ्या जर्मनीने या मोहिमेत सहभागी होण्यास स्पष्ट शब्दांत नकार देऊन ट्रम्प यांना मोठा धक्का दिला आहे. जर्मनीच्या या भूमिकेमुळे ‘नाटो’ (NATO) देशांमधील मतभेद आता चव्हाट्यावर आले आहेत.

जर्मनीची भूमिका: “लष्करी बळापेक्षा संवादाला महत्त्व”

जर्मन परराष्ट्र मंत्री जोहान वेडफुल यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत स्पष्ट केले की, जर्मनी सध्या होर्मुझच्या सामुद्रधुनीत कोणतीही लष्करी भूमिका बजावणार नाही. “आम्ही या संघर्षाचा भाग बनणार का? तर याचे उत्तर ‘नाही’ असे आहे,” असे त्यांनी ठामपणे सांगितले. जर्मनीच्या मते, होर्मुझची सुरक्षा ही तोफा आणि विमानांनी नाही, तर राजनैतिक संवाद आणि कूटनीतीनेच सुनिश्चित केली जाऊ शकते. जर्मनीने घेतलेली ही भूमिका अमेरिकेच्या आक्रमक धोरणापेक्षा पूर्णपणे भिन्न आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Bibi Alive: नेतान्याहू यांचा ‘तो’ VIDEO आणि अफवांचा बाजार; इस्रायली पंतप्रधानांनी शत्रूला आपल्याच स्टाईलमध्ये कसं झापलं?

ऑपरेशन अ‍ॅस्पाइड्स आणि युरोपचा अनुभव

जर्मनीने यावेळी युरोपियन युनियनच्या ‘ऑपरेशन अ‍ॅस्पाइड्स’चा उल्लेख केला. फेब्रुवारी २०२४ मध्ये हुथी बंडखोरांपासून जहाजांचे रक्षण करण्यासाठी हे अभियान सुरू करण्यात आले होते. मात्र, वाडेफुल यांच्या मते, हे अभियान अद्याप पूर्णपणे प्रभावी ठरलेले नाही. “जेव्हा आधीची मोहीमच संघर्ष करत आहे, तेव्हा होर्मुझसारख्या अतिशय संवेदनशील भागात नवीन आघाडी उघडणे जर्मनीला मान्य नाही,” असे संकेत त्यांनी दिले आहेत. यामुळे युरोपमधील इतर देशही आता अमेरिकेला पाठिंबा देण्यापूर्वी दोनदा विचार करण्याची शक्यता आहे.

Germany will not send long-range Taurus missiles — Scholz. “We have made a clear decision about what we will and will not do. This decision will not change.” And yet, they could help all of us end the war faster. But no. pic.twitter.com/EygANmLBS4 — Maria Drutska 🇺🇦 (@maria_drutska) September 14, 2024

credit – social media and Twitter

ट्रम्प यांचा ७ देशांना इशारा: “स्वतःच्या तेलाचं रक्षण स्वतः करा”

दुसरीकडे, डोनाल्ड ट्रम्प यांनी आपली आक्रमक पवित्रा कायम ठेवला आहे. त्यांनी अशा सात देशांची यादी तयार केली आहे जे त्यांच्या ऊर्जा गरजांसाठी मध्यपूर्वेतील तेलावर अवलंबून आहेत. ट्रम्प म्हणाले की, “अमेरिकेला आता या मार्गाची तितकीशी गरज नाही, कारण आमच्याकडे स्वतःचे तेल साठे मुबलक आहेत. त्यामुळे ज्या देशांना तेल हवे आहे, त्यांनी पुढे येऊन या प्रदेशाचे रक्षण करावे.” ट्रम्प यांच्या या विधानाचा सरळ अर्थ असा आहे की, अमेरिका आता दुसऱ्यांच्या हितासाठी स्वतःचे सैन्य आणि पैसा खर्च करण्यास तयार नाही.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Global Diplomacy: इराणची भारताला मोठी ‘ऑफर’; होर्मुझमधून मार्ग मोकळा, पण PM मोदींना घ्यावा लागणार ‘हा’ मोठा निर्णय

होर्मुझचे महत्त्व आणि जागतिक संकट

होर्मुझची सामुद्रधुनी ही जगाची ‘आर्थिक नाडी’ मानली जाते. जगातील एकूण तेल पुरवठ्यापैकी सुमारे २० ते ३० टक्के तेल याच मार्गावरून जाते. इराणने हा मार्ग बंद करण्याची धमकी दिली आहे, तर अमेरिका आणि इस्रायलने इराणच्या अण्वस्त्र तळांवर हल्ले करण्यास सुरुवात केली आहे. अशा परिस्थितीत जर्मनीसारख्या बड्या देशाने माघार घेतल्यामुळे जागतिक स्तरावर तेलाच्या किमती आणि पुरवठ्यावर काय परिणाम होतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

💡

Frequently Asked Questions

  • Que: जर्मनीने अमेरिकेच्या होर्मुझ मोहिमेत सहभागी होण्यास का नकार दिला?

    Ans: जर्मनीच्या मते ही समस्या लष्करी बळापेक्षा राजनैतिक संवाद आणि कूटनीतीने सोडवणे गरजेचे आहे, तसेच त्यांना सध्याच्या परिस्थितीत नवीन लष्करी धोका पत्करायचा नाही.

  • Que: ऑपरेशन अ‍ॅस्पाइड्स (Operation Aspides) काय आहे?

    Ans: हे युरोपियन युनियनचे एक नौदल अभियान आहे, जे लाल समुद्रात व्यापारी जहाजांना हुथी बंडखोरांच्या हल्ल्यांपासून वाचवण्यासाठी सुरू करण्यात आले आहे.

  • Que: ट्रम्प यांनी सात देशांकडून कोणती मदत मागितली आहे?

    Ans: ट्रम्प यांनी तेलावर अवलंबून असलेल्या देशांना होर्मुझच्या सुरक्षेसाठी एक लष्करी युती (Coalition) बनवण्याचे आवाहन केले आहे.

Web Title: Germany rejects donald trump hormuz strait military coalition iran war marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 16, 2026 | 09:43 AM

Topics:  

  • Donald Trump
  • Germany
  • iran
  • US-Israel Iran War
  • World War 3

संबंधित बातम्या

Masoud Pezeshkian : ‘मी स्वतः 7 तास चर्चा केली’; मोजतबा खामेनी जिवंत असल्याचा अमेरिकेत इराणी अध्यक्षांनी सादर केला पुरावा
1

Masoud Pezeshkian : ‘मी स्वतः 7 तास चर्चा केली’; मोजतबा खामेनी जिवंत असल्याचा अमेरिकेत इराणी अध्यक्षांनी सादर केला पुरावा

US-China Trade War: ‘प्रतिस्पर्धी नाही, भागीदार बना’; शी जिनपिंग यांच्या अमेरिका दौऱ्यामुळे व्यापार करार दोन महिने पुढे
2

US-China Trade War: ‘प्रतिस्पर्धी नाही, भागीदार बना’; शी जिनपिंग यांच्या अमेरिका दौऱ्यामुळे व्यापार करार दोन महिने पुढे

Breaking News : ट्रम्प-शी भेटीत तैवानचा मुद्दा पेटला; जिनपिंगांचा अमेरिकेला स्पष्ट संदेश!
3

Breaking News : ट्रम्प-शी भेटीत तैवानचा मुद्दा पेटला; जिनपिंगांचा अमेरिकेला स्पष्ट संदेश!

Trump vs US Media : डोनाल्ड ट्रम्प यांना न्यायालयाचा मोठा धक्का; CNN सह 3 माध्यम संस्थांवरील बंदी अखेर उठवली
4

Trump vs US Media : डोनाल्ड ट्रम्प यांना न्यायालयाचा मोठा धक्का; CNN सह 3 माध्यम संस्थांवरील बंदी अखेर उठवली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.