Global uncertainty hits champagne producers Sales drop by 10% percent
नवी दिल्ली: जागतिक मंदी आणि ग्राहकांच्या बदलत्या सवयींमुळे फ्रेंच शॅम्पेनच्या विक्रीला फटरा बसला आहे. शॅम्पने उत्पादक संघटनेने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षी जवळपास 10 टक्क्यांची शॅम्पेन विक्रीत घट झाली आहे. आर्थिक आणि राजकीय अनिश्चिततेमुळे फ्रान्स आणि अमेरिकेसारक्या प्रमुळे बाजारांतील ग्राहक निरुत्साही झाले आहेत. यामुळे या लक्झरी पेयावर होणार खर्च कमी झाला असल्याचे उत्पादक संघटनेने म्हटले आहे.
“शॅम्पेन ग्राहकांच्या मानसिकतेचे खरे बारोमीटर आहे,” असे सिंडिकट जनरल डेस विग्नेरॉनचे अध्यक्ष आणि कोमिटे शॅम्पेनचे सह-अध्यक्ष मॅक्सिम तुबार्ट यांनी सांगितले. महागाई, जागतिक संघर्ष, आर्थिक अनिश्चितता आणि राजकीय स्थिती यामुळे सध्या कोणताही आनंद साजरे करण्याची वेळ नाही. यामुळे शॅम्पनेच्या निर्यातीत घट झाली आहे.
इतर पेयांची वाढती लोकप्रियता
शॅम्पेनच्या उच्च किमतींऐवजी ग्राहक प्रॉसेको, इंग्लिश स्पार्कलिंग वाइन आणि क्रेमाँट यासारख्या स्वस्त पर्यायांकडे वळत आहेत. तसेच, किफायतशीर किंमतीतील अल्कोहोलिक पेयांना अधिक चांगली गुणवत्ता मिळत असल्याने त्यांची लोकप्रियता वाढत आहे. याशिवाय, अमेरिकेसारख्या प्रमुख बाजारांतील जनरेशन Z आणि मिलेनियल्स अल्कोहोलिक पेय टाळून मॉकटेल्स आणि गांजाकडे वळत आहेत. तसेच, निवृत्तीनंतर बेबी बूमर्स वाईनवरील खर्च कमी करत आहेत.
निर्यातीतील मोठी घट
उत्पादत संघटनेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षी, फ्रेंच शॅम्पेन उत्पादकांनी विक्रीत 15 टक्क्यांहून अधिक घसरण झाल्याने द्राक्ष कापणी कमी केली होती. 2023 च्या तुलनेत 2024 च्या पहिल्या सहामाहीत विक्रीत 9.2 टक्क्यांची घट नोंदवली गेली. कोविडनंतर 2022 मध्ये शॅम्पेनची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली होती, तेव्हा विक्री 326 दशलक्ष बाटल्यांपर्यंत पोहोचली होती. मात्र, त्यानंतर विक्रीत सातत्याने घट होत आहे.
2023 मध्ये 299 दशलक्ष बाटल्या वितरित केल्या गेल्या, यामध्ये 2022 च्या तुलनेत 8 टक्क्यांपेक्षा जास्त घट झाली. फ्रान्समधील विक्री बाजारात 2023 मध्ये 118.2 दशलक्ष बाटल्यांची विक्री झाली असून 7.2 टक्क्यांनी घटली. तसंच, 2024 मध्ये शॅम्पेन क्षेत्राला हवामान बदलामुळे दुष्काळ, गारपीट, ओलसर हवामान आणि मिल्ड्यू फंगसच्या वाढत्या प्रादुर्भावाचा फटका बसला आहे.
राजकीय पातळीवर, फ्रान्समध्ये वाढत्या संसदीय संकटामुळे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी एका वर्षात चौथे पंतप्रधान फ्रँस्वा बायरू यांची नियुक्ती डिसेंबर २०२४ मध्ये केली. “कठीण काळात पर्यावरणीय मानके राखत, नवीन बाजारपेठा व ग्राहक जिंकण्यासाठी आम्हाला पुढील वाटचाल करावी लागेल,” असे कोमिटे शॅम्पेनचे सह-अध्यक्ष डेव्हिड चॅटिलॉन यांनी सांगितले.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- फक्त 35 शब्दात डोनाल्ड ट्रम्प घेणार शपथ; जाणून घ्या काय बोलतील?