Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मंगळावरील ‘सोन्याची खाण’! नासाच्या पर्सिव्हरन्स रोव्हरचा अद्भुत शोध; अब्जावधी वर्षे जुने खडक आणि सूक्ष्मजीवनाचे संकेत

अंतराळ संशोधनाच्या क्षेत्रात नासाने पुन्हा एकदा ऐतिहासिक यश मिळवले आहे. नासाच्या पर्सिव्हरन्स रोव्हरने मंगळावरील "विच हेझल हिल" या ठिकाणी अत्यंत दुर्मिळ आणि प्राचीन खडकांचा शोध घेतला आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Apr 21, 2025 | 10:35 AM
'Gold mine' on Mars Amazing discovery by NASA's Perseverance Rover

'Gold mine' on Mars Amazing discovery by NASA's Perseverance Rover

Follow Us
Close
Follow Us:

वॉशिंग्टन / मंगळ : अंतराळ संशोधनाच्या क्षेत्रात नासाने पुन्हा एकदा ऐतिहासिक यश मिळवले आहे. नासाच्या पर्सिव्हरन्स रोव्हरने मंगळावरील “विच हेझल हिल” या ठिकाणी अत्यंत दुर्मिळ आणि प्राचीन खडकांचा शोध घेतला असून, या खडकांच्या अभ्यासातून मंगळ ग्रहाच्या प्राचीन इतिहासाची दारे उघडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. काही शास्त्रज्ञांनी तर या शोधाला ‘मंगळावरील सोन्याची खाण’ असेही संबोधले आहे.

५ नमुने, ८३ लेसर चाचण्या आणि अनमोल माहिती

गेल्या चार महिन्यांपासून, पर्सिव्हरन्स रोव्हरने “विच हेझल हिल” परिसरात ५ महत्त्वपूर्ण खडकांचे नमुने गोळा केले आहेत. तसेच ७ खडकांची सखोल तपासणी करण्यात आली असून, ८३ वेळा लेसरने त्यांच्यावर विश्लेषणात्मक चाचण्या करण्यात आल्या आहेत. हे रोव्हरचे आतापर्यंतचे सर्वाधिक विस्तृत आणि सखोल वैज्ञानिक संशोधन मानले जात आहे.

या खडकांपैकी काही खडक सुमारे ३.९ अब्ज वर्षांपूर्वीचे आहेत. हा तो काळ होता जेव्हा मंगळावर प्रचंड उल्कापात, ज्वालामुखींचे उद्रेक आणि कदाचित पाण्याचा प्रवाहही अस्तित्वात होता. हे खडक बहुधा मंगळाच्या आतल्या भागात बनलेले असून, त्यानंतरच्या स्फोटांमुळे पृष्ठभागावर आले असावेत, असे शास्त्रज्ञांचे मत आहे. त्यामुळे मंगळाच्या आतील रचना आणि त्याच्या उत्क्रांतीचा अभ्यास करण्याची ऐतिहासिक संधी मिळाली आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : ‘जर मला मृत्यू आला तर असाच हवा…’ गाझातील धाडसी फोटो पत्रकार फातिमा हसौनाची हृदयद्रावक कहाणी

‘अमूल्य मंगळाचा खजिना’ पोत आणि वयाची अनोखी रचना

या सर्व खडकांमध्ये एक विशिष्ट खडक आहे ज्यात शास्त्रज्ञांना पोत आणि वयाच्या स्पष्ट खुणा आढळून आल्या आहेत. या खडकाच्या अभ्यासातून मंगळ ग्रहाच्या भूगर्भातील उत्क्रांतीचा मागोवा घेता येईल. Space.com च्या अहवालानुसार, हा खडक “अमूल्य मंगळाचा खजिना” मानला जात आहे.

The first reaction from the @NASAPersevere team when they saw this rock was, “Whoa, what is that? What could have caused that?” Learn all about the rover’s 25th rock sample, dubbed Sapphire Canyon, and the clues it offers about possible past life on Mars. pic.twitter.com/uaELIkxFkp

— NASA Mars (@NASAMars) April 10, 2025

credit : social media

सर्पेंटाइनचे अस्तित्व, सूक्ष्मजीवनाचा संकेत?

या शोधातील आणखी एक महत्त्वपूर्ण टप्पा म्हणजे एका खडकामध्ये ‘सर्पेंटाइन’ नावाचा खनिज पदार्थ आढळून आला आहे. हा पदार्थ पृथ्वीवर ज्या ठिकाणी गरम पाणी आणि खडकांची रासायनिक प्रतिक्रिया होते, तिथे आढळतो. या प्रतिक्रियेमुळे हायड्रोजन वायू तयार होतो, जो प्राचीन काळी सूक्ष्मजीवांसाठी ऊर्जा स्रोत ठरू शकतो. ही बाब अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे, कारण यामुळे मंगळावर प्राचीन सूक्ष्मजीवन अस्तित्वात होते का? या प्रश्नाचे उत्तर मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. तरीही, आत्तापर्यंत जीवनाचे कोणतेही थेट पुरावे सापडलेले नाहीत.

‘ग्रीन गार्डन्स’  पृथ्वीवर परतवला जाणार नमुना

पर्सिव्हरन्सने मिळवलेला ‘ग्रीन गार्डन्स’ नावाचा खडकही वैशिष्ट्यपूर्ण आहे. नासाने या नमुन्याला भविष्यात पृथ्वीवर परत आणण्याचे लक्ष्य ठेवले आहे. मात्र, या नमुन्यांची पृथ्वीवर परतफेड करणारी मोहीम विलंब आणि वाढत्या खर्चामुळे २०४० पर्यंत किंवा त्याही पुढे ढकलली जाऊ शकते.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :  227 दिवसांनंतर ‘Soyuza cpsule’ प्रवाशांसह पृथ्वीवर परतले; नासाने केले अभिनंदन

मंगळाचा गूढ इतिहास उलगडण्याची नवी आशा

पर्सिव्हरन्स रोव्हरने केलेल्या या ऐतिहासिक शोधामुळे मंगळाच्या भूगर्भातील प्राचीन इतिहास, त्यावरील वातावरणीय घडामोडी आणि संभाव्य जीवसृष्टीबाबत नवे संकेत मिळू शकतात. हे खडक जणू “मंगळाच्या काळ्या पेटाऱ्याचे झाकण” उघडत असल्यासारखे आहेत. आजही हे नमुने मंगळावरच आहेत, परंतु त्यातील गूढ माहितीचा मानवजातीच्या अंतराळ संशोधनात फार मोठा वाटा असणार आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या साहसाच्या या प्रवासात पर्सिव्हरन्स रोव्हरने एक नवा मैलाचा दगड गाठला आहे, हे निश्चित!

Web Title: Gold mine on mars amazing discovery by nasas perseverance rover

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 21, 2025 | 10:35 AM

Topics:  

  • mars rover
  • NASA
  • NASA Space Agency
  • Space News

संबंधित बातम्या

खरंच चंद्रावर जमीन खरेदी करता येते का? जाणून घ्या आंतरराष्ट्रीय नियम, करार आणि खरी वस्तुस्थिती
1

खरंच चंद्रावर जमीन खरेदी करता येते का? जाणून घ्या आंतरराष्ट्रीय नियम, करार आणि खरी वस्तुस्थिती

वधू जमिनीवर आणि तिचा वर अवकाशात…! ‘अशा’ प्रकारे झाले होते जगातील पहिले अंतराळातील लग्न
2

वधू जमिनीवर आणि तिचा वर अवकाशात…! ‘अशा’ प्रकारे झाले होते जगातील पहिले अंतराळातील लग्न

महासत्तांचा नवा डावपेच! चंद्रावर अणुऊर्जा तळ उभारण्यासाठी ‘या’ देशांमध्ये सुरु झालीये अनोखी अंतराळ स्पर्धा
3

महासत्तांचा नवा डावपेच! चंद्रावर अणुऊर्जा तळ उभारण्यासाठी ‘या’ देशांमध्ये सुरु झालीये अनोखी अंतराळ स्पर्धा

पृथ्वीची श्वास रोखू शकते सूर्याची वाढती उष्णता; नासाच्या अभ्यासानुसार जवळ आली ‘ऑक्सिजनच्या शेवटाची तारीख’?
4

पृथ्वीची श्वास रोखू शकते सूर्याची वाढती उष्णता; नासाच्या अभ्यासानुसार जवळ आली ‘ऑक्सिजनच्या शेवटाची तारीख’?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.