२२७ दिवसांनंतर 'Soyuza cpsule' प्रवाशांसह पृथ्वीवर परतले; नासाने केले अभिनंदन, डॉन पेटिट यांचा वाढदिवस संस्मरणीय ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
कझाकस्तान – पृथ्वीभोवती तब्बल ३,५२० प्रदक्षिणा घालून, २२७ दिवसांचे अंतराळातील अभियान पूर्ण करत रशियन आणि अमेरिकन अंतराळवीरांचे ‘सोयुझ’ यान रविवारी (२० एप्रिल) सकाळी ६:२० वाजता कझाकस्तानच्या झेझकाझगान परिसरात सुरक्षितपणे उतरले. या मोहिमेत सहभागी असलेले रशियन अंतराळवीर अलेक्सी ओव्हचिनिन, इव्हान वॅग्नर आणि अमेरिकन अंतराळवीर डॉन पेटिट हे तिघेही सुखरूप आणि उत्तम आरोग्यासह पृथ्वीवर परतले.
रशियन अंतराळ संस्था रोस्कोसमॉसच्या माहितीनुसार, ‘सोयुझ’ कॅप्सूलचे लँडिंग पूर्णपणे नियोजित होते. पॅराशूटच्या सहाय्याने यान मोकळ्या मैदानावर अडथळ्यांशिवाय उतरले. नासाने देखील या लँडिंगचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला असून, त्यात तिन्ही अंतराळवीर यशस्वीरित्या जमिनीवर उतरतानाचे क्षण टिपले आहेत. हे तिन्ही अंतराळवीर २२७ दिवसांपासून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात (ISS) कार्यरत होते. त्यांच्या मिशनमध्ये पृथ्वीभोवती ३,५२० वेळा परिक्रमा करत विज्ञान, जैविक संशोधन, आणि अंतराळ अभियंत्रण याबाबत महत्वपूर्ण प्रयोग करण्यात आले.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : ‘जर मला मृत्यू आला तर असाच हवा…’ गाझातील धाडसी फोटो पत्रकार फातिमा हसौनाची हृदयद्रावक कहाणी
Happy birthday, @astro_Pettit! Many happy returns (including this one) 🥳
The MS-26 Soyuz spacecraft touched down in Kazakhstan at 9:20pm ET—or, in local time, 6:20am April 20, Pettit’s 70th birthday. pic.twitter.com/qFM5fAxnA0
— NASA (@NASA) April 20, 2025
credit : social media
या यशस्वी परतीचा योगायोग असा की डॉन पेटिट यांचा ७०वा वाढदिवस देखील याच दिवशी होता. त्यामुळे ही परतीची घटना त्यांच्या दृष्टीने अत्यंत संस्मरणीय आणि भावनिक ठरली. नासाने त्यांच्या वाढदिवसाचे विशेष व्हिडिओद्वारे आणि ट्विटद्वारे साजरे करत त्यांना शुभेच्छा दिल्या. डॉन पेटिट हे नासाचे ज्येष्ठ अंतराळवीर असून, त्यांनी आतापर्यंत विविध अंतराळ मोहिमांमध्ये सहभाग घेतलेला आहे. त्यांच्या अनुभवातून अनेक नवोदित अंतराळवीरांना मार्गदर्शन लाभले आहे.
पृथ्वीवर परतल्यावर सर्व अंतराळवीरांची सर्वंकष वैद्यकीय तपासणी करण्यात आली. अत्यंत यशस्वी आणि सुरक्षित मोहिमेनंतर, त्यांना कझाकस्तानमधील कारागांडा येथे रिकव्हरी झोनमध्ये हलविण्यात आले. येथून पुढे डॉन पेटिट यांना नासाच्या ह्युस्टन येथील जॉन्सन स्पेस सेंटरमध्ये नेण्यात येणार, तर अलेक्सी ओव्हचिनिन आणि इव्हान वॅग्नर हे रशियातील स्टार सिटी ट्रेनिंग बेसमध्ये परततील.
Happy birthday, @astro_Pettit! Many happy returns (including this one) 🥳
The MS-26 Soyuz spacecraft touched down in Kazakhstan at 9:20pm ET—or, in local time, 6:20am April 20, Pettit’s 70th birthday. pic.twitter.com/qFM5fAxnA0
— NASA (@NASA) April 20, 2025
credit : social media
या मोहिमेवरून परतीच्या आधी, ISS वरील कमांडची जबाबदारी औपचारिकपणे हस्तांतरित करण्यात आली. अलेक्सी ओव्हचिनिन यांनी जपानी अंतराळवीर ताकुया ओनिशी यांच्याकडे कमान सुपूर्त केली. या बदलाद्वारे, आंतरराष्ट्रीय सहकार्याचे सुंदर उदाहरण पुन्हा एकदा समोर आले.
या मोहिमेची यशस्वी समाप्ती केवळ तांत्रिक दृष्टीने नव्हे, तर मानवी अंतराळ प्रवासातील एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरली आहे. दीर्घकाळ अंतराळात राहून मानव शरीरावर होणारा परिणाम, विविध प्रयोगांच्या निष्कर्षांची नोंद आणि अंतराळ स्थानकावरील जीवनशैली हे सर्व घटक आगामी मोहिमांसाठी मार्गदर्शक ठरतील. नासाच्या म्हणण्यानुसार, अशा मोहिमा मंगल आणि चंद्र मोहिमांसाठी अत्यावश्यक प्रशिक्षण देतात आणि भविष्यात मानवजातीचा अंतराळातील वावर अधिक व्यापक बनवतील.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : जगाच्या नकाशावर ‘बोगनविले’ नवीन देश? पण अमेरिका-चीन यांच्यात संघर्षाची नवी ‘युद्धभूमी’ तयार होण्याची शक्यता
२२७ दिवसांची ही मोहिम केवळ वैज्ञानिकदृष्ट्या नव्हे, तर मानवी धैर्य, सहकार्य आणि आंतरराष्ट्रीय साखळीतील एकात्मतेचे उत्कृष्ट उदाहरण ठरली आहे. ‘सोयुझ’ यानाच्या सुरक्षित परतीनंतर, अंतराळ संशोधनात विश्वास अधिक दृढ झाला असून, मानवजातीसाठी नव्या अंतराळयुगाची पायाभरणी झाली आहे.