'Good Trouble lives On' Anti protests will be held across the country today against Trump in US
वॉशिंग्टन : अमेरिकेत पुन्हा एकदा मोठा गोंधळ निर्माण होण्याची शक्यता आहे. पुन्हा एकदा हजारो लोक अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प विरोधात रस्त्यावर उतरमार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार आज संपूर्ण अमेरिकेत ‘गुड ट्रबल लाईव्हज ऑन’ निषेधाचे आयोजन केले जाणार आहे. हा निषेध दिवंगत अमेरिकेन कॉंग्रेसनमन जॉन लुईस यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी काढण्यात येत आहे. तसेच ट्रम्प यांच्या नागरी हक्कांवर परिणाम करणाऱ्या धोरणांविरोधातही हे आंदोलन होत आहे.
संपूर्ण अमेरिकेत देशव्यापी निदर्शने होणार आहे. जवळपास १,६०० हून अधिक ठिकाणी आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे. सुमारे १.२५ लाख लोक यामध्ये सहभागी होण्याची अपेक्षा आहे. जॉन लुईस यांचा आज पुण्यतिथी निमित्त हे निदर्शने केली जात आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, ‘गुड ट्रबल लाईव्हज ऑन’ निदर्शने न्यूयॉर्क, लॉस एंजलिस, वॉशिंग्टन डीसीस शिकागो ह्यूस्टन, डलास, ऑस्टिन, कोलंबस, आणि शार्लोट सारख्या प्रमुख शहरांमध्ये आयोजन करण्यात आले आहे.
जॉन लुईस यांना अमेरिकेतील एक प्रतिष्ठित नेते आणि नागरी हक्कांचा कार्यकर्ते म्हणून ओळखले जाते. त्यांनी अमेरिकेच्या नागरी हक्क चळवळीमध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. लुईस यांनी १९८७ ते २०२० पर्यंत जॉर्जियाच्या ५ व्या कॉंग्रेसनल डिस्ट्रिक्टचे अमेरिकन प्रतिनिधी सभागहाचे सदस्य म्हणून कामकाज पाहिले. त्यांनी नागरीकांच्या हक्कांसाठी लढा दिला. देशभरात त्यांना नागरीकांच्या हक्कांना आळा घालणाऱ्या धोरणांविरोधात त्यांनी शांततापूर्ण निदर्शने केले. त्यांनी गुड ट्रबल च्या भावनेने नागरीकांवरील अन्यायाला तीव्र विरोध केला.
जॉन लुईस यांना कॉंग्रेसमध्ये नागरी हक्क आंदोलनातील एक प्रमुख व्यक्तिमत्व म्हणून कार्य केले होते. लुईस यांनी शांतातापूर्ण आंदोलनांनी देशामध्ये सकारात्मक बदल घडवून आणण्याच्या उद्देशाने गुड ट्रबल चळवळ सुरु केली होती. आयोजकांनी दिलेली माहितीनुसार, या वेळी निदर्शने डोनाल्ड ट्रम्प यांच्या नागरी हक्कांवर परिणाम करणाऱ्या धोरणांविरोधात काढली जदात आहे.
जॉन लुईस यांनी गुड ट्रबल कल्पनेने लोकांना प्रेरणा दिली. त्यांच्या म्हणण्यानुसार, समाजात अन्याय होत असतात, शांत राहणे योग्य नाही. अन्याविरोधात आवाज उठवणे आणि त्यासाठी लढा देणे अत्यंत महत्वाचे असते. यासाठी त्यांनी गुड ट्रबल म्हणजे चांगला त्रास च्या चळवळीची सुरुवात केली. या गुड ट्रबल आंदोलनात शांततापूर्ण निदर्शने काढली जातात. समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी लुईस यांनी ही मूव्हमेंट सुरु केली होती. यामुळे आज अमेरिकेत देशभरात शांततापूर्ण निदर्शने होणार आहेत.