अमेरिकेच्या 'मोस्ट वॉन्टेड' यादीत पाकच्या इराणी राजदूताचे नाव; FBI एजंटच्या अपहरणाचा गंभीर आरोप (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
वॉशिंग्टन: एक मोठी माहिती समोर आली आहे. अमेरिकेची तपास यंत्रणा FBI ने मंगळवारी एका इराणी राजदूताला ‘मोस्ट वॉन्डेट’ यादीत समाविष्ट केले आहे. पाकिस्तानी राजनियक रेझा अमीरी मोघदम यांना या यादीत समाविष्ट करण्यात आले आहे. याबाबत FBI ने अलर्ट जरी केला आहे. मोगदम यांच्यावर FBIच्या निवृत्त एजंट रॉबर्ट लेव्हिंसन यांच्या अपहरणाच्या कटात सामील असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
रॉबर्ट लेव्हिंसन ८ मार्च २००७ मध्ये इराणच्या किश बेटावरुन फिरायला गेले होते. या बेटावरुन त्यांचे अपहरण करण्यात आले होते. त्यांच्या अचानक गायब होण्याने मोठी खळबळ उडाली होती. त्यांच्याबाबत अद्याप कोणतीही ठोस माहिती मिळालेली नाही. दरम्यान FBI ने दावा केला आहे की, मोगदम यांनी अपहरणाच्या संपूर्ण ऑपरेशनवर पाळत ठेवली होती. तसेच या प्रकरणासंबंधी खरी माहिती लपवण्याचाही प्रयत्न मोगदम यांनी केला असल्याचे FBI ने म्हटले आहे.
सध्या लेव्हिंसन यांच्याबाबत कोणतीही ठोस माहिती मिळालेली नाही. यामुळे सध्या त्यांना नेमकं कसे आणि कुठे गायब करण्यात आले याचा शोध FBI घेत आहे. अद्याप त्यांच्या अपहरणाचे गूढ उलगडलेले नाही. मिळालेल्या माहितीनुसार, रॉबर्ट लेव्हिंसन यांना २०११ मध्ये शेवटचे जिंवत पाहिले गेले होते. त्यांच्या संबंधी एक व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. परंतु याबाबत कोणताही ठोस पुरावा FBI ला मिळालेला नाही. FBI ने दावा केला आहे की, त्यांना कैद करुन ठेवले असण्याची शक्यता आहे किंवा त्यांचा मृत्यूही झाला असल्याची शक्यता आहे.
FBI Washington Field Office Releases Seeking Information Posters for Senior Iranian Intelligence Officers Involved in the Abduction of Robert A. Levinson https://t.co/b6sttuzU3G pic.twitter.com/O6r9NKAxJW
— FBI Washington Field (@FBIWFO) July 15, 2025
दरम्यान रेझा मोगदम यांच्यावर लेव्हिंसन यांच्या अपहरमात सामील करण्याचा आरोप करण्यात आला आहे. रेझा मोगदम यांना अहमद अमीरिनिया म्हणूनही ओळखले जाते. सध्या ते पाकिस्तानचे राजनिक आहेत. यापूर्वी त्यांनी इराणच्या गुप्तचर मंत्रालयात वरिष्ठ अधिकारी मह्णून काम पाहिले होते. त्यांच्या देखेरेखीखाली युरोपमध्ये देखील इराणचे गुप्तचर एजंट काम करत होते.
सध्या FBI ने मोगदमसह आणखी दोन इराणी अधिकाऱ्यांवरही लेव्हिंसन यांच्या अपहरणात सामील असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तागी दानेश्वर आणि गुलामहुसैन मोहम्मदनिया, आणि रेझा मेगदम या तिंघांवर रॉबर्ट लेव्हिंसन्या अपहरणात थेट सहभाग असल्याचा आरोप FBI ने केला आहे. तसेच यामध्ये इराणी सरकारची भूमिका असल्याचेही FBI ने म्हंटले आहे.