काय आहे ईशनिंदा प्रकरण? ज्यावरुन पाकिस्तानात पेटला वाद; न्यायालयाचे शाहबाज सरकारला चौकशीचे आदेश (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
इस्लामाबाद : सध्या पाकिस्तानमध्ये मोठा गोंधळ उडला आहे. पाकिस्तानमध्ये ईशनिंदा कायद्यावरुन वाद सुरु असून इस्लामाबादच्या उच्च न्यायालयाने या कायद्यांच्या दुरुपयोगांच्या चौकशीचे आदेश शाहबाज सरकारला दिले आहेत. ३० दिवसांत चौकशी आयोग स्थापन करुन प्रकरण मिटवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. हा आदेश इस्लामाबादच्या उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सरदार एजाज इशाक खान यांनी दिला आहे.
पाकिस्तानमध्ये गेल्या काही वर्षात अनेक धक्कादायक घटना समोर आल्या आहेत, ज्यामध्ये सरकारी अधिकारी, वकील, सामान्य निर्दोष नागरिकांना ईशनिंदा कायद्याच्या आरोपाखाली फसवत आहेत. नागरिकांवर खोटो गुन्हे दाखल केले जात आहेत. तसेच त्यांच्याकडून पैसे देखील उकळले जात आहे. कायदेशीर कारवाईची धमकी लोकांना दिली जात आहे. अशा अनेक प्रकरणे आतापर्यंत पाकिस्तानमध्ये समोर आली आहेत. यामुळे ईशनिंदा कायद्यांबद्दल अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे.
ईशनिंदा म्हणजे एखाद्या पवित्र देवतेबद्दल, पवित्र व्यक्तींबद्दल तिरस्कार, अनादर करणे आहे. सध्या पाकिस्तानात सरकारी अधिकारी सामान्य नागरिकांना या आरोपात शिक्षा देत आहेत.
आतापर्यंत या प्रकरणांतर्गत ४२ सुनावण्या गेल्या वर्षी २०२४ सप्टेंबर पासून झाल्या आहेत. दरम्यान या आकड्यात वाढ होत आहे. यामुळेच १५ जुलै २०२५ रोजी इस्लामाबादच्या उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एजाज इशाक खान यांनी चौकशी आयोग स्थापन करण्याचे आदेश शाहबाज सरकारला दिली आहे. तसेच चार महिन्यात ही चौकशी पूर्ण करण्याची अट ठेवली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १९८० च्या दशकात पाकिस्तानमध्ये लष्करी शासक झियाउल हक यांनी हा कायदा लागू केला होता. कुराणच्या पावित्र्याचे रक्षण करण्यासाठी त्यांनी ईशनिंदा कायदे अधिक कठोर केले होते. १९८६ नंतर यामध्ये मृत्यूदंडाची तरतूद करण्यात आली. तेव्हापासून या प्रकरणांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. थिंक टॅंक CRSS ने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, पाकिस्तानमध्ये १९४७ ते २०२१ च्या काळात ७०१ प्रकरणांमध्ये १४१५ आरोपींची नोंद करण्यात आली होती. यातील ८९ जणांना ठार करण्यात आले आहे.
सध्या या प्रकरणांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असून पाकिस्तानच्या न्यायव्यवस्था आणि धार्मिक सहिष्णुतेवर प्रश्न उपस्थित केले जात आहे. पाकिस्तानमध्ये सध्या दहशतदीचे वातावरण आहे. लोकांमध्ये पाकिस्तान शाहबाज सरकारविरोधा अविश्वास निर्माण होत आहे.