
Greece to Preparing to buy More Rafael jets
Turkey-Greece Conflict : इस्तंबूल/अथेंस : भारताच्या शेजारी देश तुर्की (Turkey) आणि ग्रीसमध्ये (Greece) पुन्हा एकदा वातावरण तापले आहे. कारण ग्रीसने आता फ्रान्सकडून आणखी राफेल खरेदीची योजना आखली आहे. यामुळे एजियान समुद्रात पुन्हा एकदा युद्ध धगधगणार अशी भीती व्यक्त केली जात आहे.
पूर्वी तुर्की आणि ग्रीसमध्ये सीमासुरक्षा, हवाई हद्द आणि नैसर्गिक संपत्ती यांवरुन स्पर्धी सुरु होती, परंतु आता यामध्ये शस्त्रास्त्र स्पर्धेची देखील वाढ झाली आहे. तुर्कीच्या युरोफायरजेटच्या खरेदीला प्रत्युत्तर म्हणून ग्रीसने देखील फ्रान्सकडून आणखी राफेल F-4 जेट खेरदी करण्याची तयारी केली आहे. यापूर्वी ग्रीसने फ्रान्सकडून २४ राफेल जेट्स आपल्या हवाई दलात सामील केले होते.
हे राफेल अधिक प्रगत आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे. तसेच ग्रीस नवीन राफेल्समध्ये F-4 कॉन्फिगरेशन जेट्स घेण्याचा विचार करत आहे. यामुळे ग्रीसच्या हवाई ताकदीत प्रचंड वाढ होणार आहे. एवढेच नव्हे, तर तुर्कीविरोधात इलेक्ट्रिक वॉरफेयरमध्येही मोठी आघाडी ग्रीसला मिळणार आहे.
तुर्कीच्या युरोफाटर जेटमध्येही Meteor लॉंग रेंज मिसाइल बसवण्यासाचा विचार सुरु आहे, परंतु ग्रीसच्या ताफ्यात ही मिसाइल पहिल्यापासूनच राफेल मध्ये आहे. यामुळे दोन्ही देशात तीव्र हवाई स्पर्धा सुरु होण्याची शक्यता
निर्माण झाली आहे. सध्या ग्रीस तुर्कीच्या तुलनेत तांत्रिक आणि सामरिकदृष्ट्या पुढे आहे. शिवाय फ्रान्सकडून राफेल खरेदीनंतर ग्रीसची ताकद अधिक निर्णयाक ठरणार आहे. ही बाब तुर्कीसाठी अत्यंत धोकादायक मानली जात आहे.
ग्रीसच्या या निर्णयामुळे भारतासोबचे त्यांचे संबंध अधिक बळकट होती. कारण भारताने देखील आपल्या हवाई दलात राफेल जेट्स सामील केली आहे. शिवाय तुर्की हा पाकिस्तानचा समर्थक देश राहिल्याने भारत आणि तुर्कीमध्ये तणावाचे वातावरण आहे.
परंतु सध्या ग्रीसच्या या पावलामुळे एजियान समुद्रातील तणाव वाढण्याची शक्यता आहे. एकीकडे एर्दोगान तुर्कीला प्रादेशिक शक्ती बनवण्याच्या प्रयत्नात आहेत, तर दुसरीकडे ग्रीसची राफेल खरेदी तुर्कीचे स्वप्न तोडणार आहे. यामुळे तीव्र स्पर्धेची चाहूल लागली आहे.