'Father Of DNA' आणि नोबेल पारितोषिक विजेते जेम्स वॉट्सन यांचे निधन; वयाच्या ९७ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
‘Father Of DNA’ James Watson Death : नवी दिल्ली : अमेरिकेचे नोबेल पुरस्कार विजेते आणि DNA चे जनक म्हणून ओळखले जाणारे शास्त्रज्ञ जेम्स वॉट्सन यांचे निधन झाले आहे. वयाच्या ९७ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने विज्ञानातील संशोधन क्षेत्राला मोठा धक्का बसला आहे. वॉट्सन यांना २० व्या शतकातील सर्वात मोठ्या वैज्ञानिक संशोधकांपैकी एक म्हणून ओळखले जात असत.
१९५३ मध्ये जेम्स वॉट्सन आणि ब्रिटिश वैज्ञानिक फ्रांसिस क्रिक यांनी डीएनची डबल हेलिक्स (Double Helix) संरचनेचा शोध लावला होता. या शोधामुळे जीवनाची मूलभूत रचाना समजून घेणे मानवाला सोपे झाले. तसेच १९६२ मध्ये वॉट्सन, क्रिक, आणि मॉरिस विल्किन्स यांना एका ऐतिहासिक शोधासाठी नोबोल पुरस्कार मिळाला होता.
वंश, लिंग या विषयांवर देखील त्यांनी अनेक वादग्रस्त टिप्पण्या केल्या होत्या. ज्यामुळे त्यांची प्रतिष्ठा धोक्यात आली होती. २००७ मध्ये एका टीव्ही प्रोग्रामदरम्यान त्यांनी आफ्रिकन लोकांच्या बुद्धिमतेवर वादग्रस्त विधान केले होते, यामुळे ते चांगलेच गोत्यात आले होते. न्यूयॉर्कमधील कोल्ड स्प्रिंग हार्बर लॅबचे चान्सलर पद त्यांना गमवावे लागले होते.
२०१९ मध्येही वादग्रस्त विधानामुळे हार्बर लॅबने त्यांच्या पदव्या, चान्सलर एमेरिट्स आणि प्रोफेसर एमेरिट्स मागे घेतल्या होता. लॅबने यावर स्पष्टीकरण देताना, वॉट्सन यांची विधाने चुकीची आहेत आणि विज्ञान याला समर्थन करत नाही. वॉट्सन यांनी २०१४ मध्ये त्यांचे नोबेल गोल्ड मेडल नीलामीमध्ये विकले. ते त्यांच्या विवादीत विधानांमुळे वैज्ञानिक समुदायांपासून वेगळे पडले होते. यामुळे त्यांना हा निर्णय घेतला होता.
वॉट्सन यांचा जन्म शिकागोमध्ये १९२८ साली झाला. त्यांनी लहान वयातच विद्यापीठात प्रवेश मिळाला होता. त्यांनी कैम्ब्रिज विद्यापाठीत डीएनएच्या संरचनेवर संशोधन केले. यावेळी त्यांची भेट फ्रांसिस क्रिक यांच्याशी झाला. क्रिक यांच्या नेतृत्त्वाखालीच त्यांनी कोल्ड स्प्रिंग हार्बर लॅबचे प्रमुख वैज्ञानिक संशोधन केंद्र बनले. वॉट्सन त्यांच्या वंश, लिंगा यांवरील विधानांमुळे एक वादग्रस्त व्यक्तिमत्त्व ठरले, परंतु त्यांनी लावलेल्या डीएनए संरचनेच्या शोधामुळेच मानवी जीवन आणि जीवशास्त्रावर ठसा पडला.
‘बांगलादेश सरकार त्यांच्या नियंत्रणाखाली नाही…’ ; शेख हसीना यांचा मोहम्मद युनूसबद्दल मोठा दावा






