Greenland's New prime minister says the US will not get the island
US-Greenland Relations: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दावा केला आहे की, त्यांना ग्रीनलँडवर नियंत्रण मिळाले आहे. त्यांच्या या दाव्याने ग्रीनलँडमध्ये मोठी खळबळ उडाली असून याच दरम्यान ग्रीनलँडचे पंतप्रधान जेन्स-फ्रेडरिक नेल्सन यांनी ट्रम्प यांना धमकी दिली आहे. नेल्सन यांनी डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा फेटाळून लावल आहे. त्यांनी म्हटले आहे की, “अध्यक्ष ट्रम्प यांना मी स्पष्टपण सांगू इच्छितो की, अमेरिकेला ग्रीनलँड मिळणार नाही. आम्ही कोणाच्याही अधीन नाही आणि आमचे भविष्य आम्ही स्वतः ठरवू.”
ग्रीनलँड हा अटलांटिक महासागरात स्थित असलेला एक बेट आहे. हे बेट नैसर्गिक संसाधनांनी समृद्ध आहे. डेन्मार्कचा हा स्वायत्त प्रदेश असण्यासोबतच, नाटोचाही सहयोगी भाग आहे. तसेच डोनाल्ड ट्रम्प यांच्या म्हणण्यांनुसार, ग्रीनलॅंड हा अमेरिकेसाठी राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने महत्वाचा आहे. यामुळे अमेरिकेचा भाग बनवण्यासाठी ग्रीनलँड खरेदीवर ट्रम्प यांनी इच्छा व्यक्त केली आहे.
NBC वृत्तसंस्थेला दिलेल्या एका मुलाखतीत ट्रम्प यानी ग्रीनलँड जबरदस्तीने ताब्यात घेण्याची शक्यता नाकारता येत नाही असे म्हटले आहे. त्यांनी हेही म्हटले आहे की,”मला वाटते की लष्करी बळाशिवायही मी ग्रीनलँडवर ताबा मिळवू शकतो.” जागतिक शांतता आणि आंतरराष्ट्रीय सुरक्षिततेचा हवाल देत ट्रम्प यांनी हे विधान केले आहे. परंतु ग्रीनलँड मिळवण्यासाठी कोणत्याही पर्यायला नाकरता येत नाही असे त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान ग्रीनलँडचे स्थानिक नेते आणि नागरिकांनी अमेरिकेच्या या दाव्याला अपमानास्पद आणि अस्वीकार्य म्हटले आहे. ट्रम्प यांच्या विधानामुळे ग्रीनलँड आणि डेन्मार्कमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
अमेरिकेला ग्रीनलँडच्या खरेदीमुळे आर्थिकदृष्ट्या मोठा फायदा होऊ शकतो, असा दावा ट्रम्प समर्थकांनी केला आहे. यामुळे नैसर्गिक संसाधनांचा मोठ्या प्रमाणावर वापर करता येईल आणि अमेरिकेच्या जागतिक सामर्थ्यामध्ये वाढ होईल असे अनेकांनी म्हटले आहे. डेन्मार्कच्या काही खासदारांनी अमेरिकेसोबत चर्चेची मागणी केली होती, याकडेही ट्रम्प समर्थक लक्ष वेधत आहेत. ग्रीनलँड खरेदीमुळे जागतिक राजकारणात मोठा बदल होण्याची शक्यता आहे. यावर पुढील काळात कायदेशीर व राजकीय चर्चा होईल. डोनाल्ड ट्रंप यांचे हे स्वप्न प्रत्यक्षात येईल का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.