Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Israel-Iran War: इराणला मोठा धक्का! खामेनेईंच्या निधनानंतर पत्नीचाही मृत्यू; इस्रायली हल्ल्यात झाल्या होत्या गंभीर जखमी

इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनेई यांच्या पत्नी मंसूरे बागेरज़ादेह यांचे रुग्णालयात निधन झाले आहे. इस्रायल आणि अमेरिकेच्या संयुक्त हवाई हल्ल्यात त्या गंभीर जखमी झाल्या होत्या.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Mar 02, 2026 | 08:04 PM
खामेनेईंच्या निधनानंतर पत्नीचाही मृत्यू (Photo Credit- X)

खामेनेईंच्या निधनानंतर पत्नीचाही मृत्यू (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:

 

  • इराणला मोठा धक्का!
  • खामेनेईंच्या निधनानंतर पत्नीचाही मृत्यू
  • इस्रायली हल्ल्यात झाल्या होत्या गंभीर जखमी
Israel-Iran War: मध्य पूर्वेतील युद्ध आता अधिक भीषण आणि वैयक्तिक स्तरावर पोहोचले आहे. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांच्या निधनानंतर आता त्यांच्या पत्नी मंसूरे खोजस्ते बागेरज़ादेह यांचेही उपचारादरम्यान निधन झाले आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी अमेरिका आणि इस्रायलने संयुक्तपणे केलेल्या हवाई हल्ल्यात त्या गंभीर जखमी झाल्या होत्या. इराणच्या अधिकृत ‘तसनीम’ वृत्तसंस्थेने या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

हल्ल्यावेळी पतीसोबत होत्या उपस्थित

७९ वर्षीय मंसूरे बागेरज़ादेह यांचा जन्म इराणमधील मशहद येथे झाला होता. त्या इराणच्या सरकारी ब्रॉडकास्टिंग (IRIB) चे माजी उपसंचालक हसन खोजस्ते बगेरज़ादेह यांच्या भगिनी होत्या. ज्यावेळी अमेरिका आणि इस्रायलने तेहरानमधील खामेनेई यांच्या मुख्य कार्यालयावर (कॉम्प्लेक्स) हल्ला केला, त्यावेळी मंसूरे या पतीसोबत तिथेच उपस्थित होत्या. या भीषण हल्ल्यात खामेनेई यांचा जागीच मृत्यू झाला होता, तर त्यांच्या पत्नीला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, डॉक्टरांचे शर्थीचे प्रयत्न अयशस्वी ठरले आणि आज त्यांचा मृत्यु झाला.

🇮🇷⚡-Breaking: The wife of Ayatollah Khamenei, Mansoureh Khojaste Bagherzadeh, was martyred as a result of her injuries from the same strike that killed her husband. pic.twitter.com/A98Sskoeud — ALERT X (@ALERTX360) March 2, 2026

‘कुवेत Air Force च्या चुकीमुळे…’; F-15 फायटर प्लेन कोसळल्याच्या घटनेवर अमेरिकेचे विधान काय?

कुटुंब उद्ध्वस्त; इराणमध्ये आक्रोशाचे वातावरण

या एकाच हल्ल्यात केवळ अयातुल्ला खामेनेईच नव्हे, तर त्यांची कन्या आणि जावई यांचाही मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. खामेनेईंच्या संपूर्ण कुटुंबाचा या संघर्षात अंत झाल्यामुळे इराणमधील जनतेमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या घटनेचे पडसाद आता संपूर्ण आखाती देशांमध्ये उमटत असून, इराणने अनेक शेजारील राष्ट्रांविरुद्ध लष्करी मोर्चा उघडला आहे.

अमेरिका-इस्रायलची संयुक्त कारवाई आणि ट्रम्प यांचा इशारा

शनिवारी आणि रविवारी झालेल्या या मोठ्या कारवाईत अमेरिका आणि इस्रायलने इराणच्या अनेक संवेदनशील भागांना लक्ष्य केले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मते, इराण गुपचूपपणे अणू कार्यक्रमावर काम करत असून अमेरिकेपर्यंत पोहोचू शकणारी क्षेपणास्त्रे विकसित करत आहे. ही कारवाई इराणची अणू क्षमता नष्ट करण्यासाठीच करण्यात आल्याचे अमेरिकेने स्पष्ट केले आहे. एका व्हिडिओ संदेशाद्वारे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी इराणच्या जनतेला आवाहन केले आहे की, “इराणी जनतेने आता खामेनेईंच्या जुलमी राजवटीविरुद्ध उभे राहावे आणि स्वतःचे लोकशाही सरकार स्थापन करावे.”

मध्य पूर्वेतील तणाव शिगेला

सर्वोच्च नेत्याच्या कुटुंबाचा अंत झाल्यामुळे इराणचे ‘रिव्होल्युशनरी गार्ड्स’ (IRGC) आता अधिक आक्रमक झाले आहेत. दुसरीकडे, अमेरिकेने या युद्धाला अण्वस्त्रांच्या धोक्याशी जोडल्यामुळे हे युद्ध केवळ दोन देशांपुरते मर्यादित न राहता जागतिक युद्धाचे स्वरूप धारण करण्याची भीती निर्माण झाली आहे.

Iran Israel युद्धात भारताचा बळी! ओमानच्या तेल टँकरवरील हल्ल्यात तरुणाचा दुर्दैवी मृत्यू, संपूर्ण देशात खळबळ

Web Title: After khameneis death his wife also dies she was seriously injured in the israeli attack

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 02, 2026 | 08:00 PM

Topics:  

  • iran
  • Iran-Israel War
  • Israel
  • US-Israel Iran War
  • World news
  • World War

संबंधित बातम्या

Iran Execution : इराणची मुलांच्या लैंगिक शोषणप्रकरणी मोठी कारवाई; ३ नराधमांना थेट फासावर चढवले
1

Iran Execution : इराणची मुलांच्या लैंगिक शोषणप्रकरणी मोठी कारवाई; ३ नराधमांना थेट फासावर चढवले

Typhoon Jangmi : मुसळधार पाऊस अन् वेगवान वारे…, जपानमध्ये चक्रीवादळ जांगमीचा धुमाकूळ; नागरिकांना सतर्कतेचा इशारा
2

Typhoon Jangmi : मुसळधार पाऊस अन् वेगवान वारे…, जपानमध्ये चक्रीवादळ जांगमीचा धुमाकूळ; नागरिकांना सतर्कतेचा इशारा

Hanwha Explosion : दक्षिण कोरियात भीषण दुर्घटना! संरक्षण कारखान्यातील स्फोटा पाच जणांचा मृत्यू, २ गंभीर जखमी
3

Hanwha Explosion : दक्षिण कोरियात भीषण दुर्घटना! संरक्षण कारखान्यातील स्फोटा पाच जणांचा मृत्यू, २ गंभीर जखमी

Operation Checkmate : अमेरिकेत अवैध स्थलांतरितांविरोधात कारवाईचा बडगा; ३० भारतीय ट्रक चालक अटकेत
4

Operation Checkmate : अमेरिकेत अवैध स्थलांतरितांविरोधात कारवाईचा बडगा; ३० भारतीय ट्रक चालक अटकेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.