नेपाळमध्ये अराजकता! हिंसाचारातील सहभागींवर सरकारकडून कारवाई; राजेशाही समर्थकांना अल्टीमेटम (फोटो सौजन्य: सोशल मीडिया )
काठमांडू: नेपाळमध्ये गेल्या आठवड्यात शुक्रवारी (28 मार्च) राजेशाही समर्थनार्थ जबरदस्त हिंसाचार उफाळून आला. या हिसांचारात मोठ्या प्रमाणावर जाळपोळ, लुटमार आणि तोडफोड करण्यात आली. या मध्ये दोन जणांचा मृत्यू झाला आणि 100 हून अधिक लोक जखमी झाले. या घटनेनंतर केपी ओली शर्मा यांच्या सरकारने हिंसाचारात सहभागी असलेल्या व्यक्तींवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. नेपाळचे माजी राजा ज्ञानेंद्र शाह यांना दंड ठोठावण्यात आला आहे. तसेच राजेशाही समर्थकांना 3 एप्रिलपर्यंतचा अल्टीमेटम देण्यात आला आहे. सध्या या हिंसाचारामुळे राजेशाही समर्थक आणि सरकारमध्ये तणावाचे वातावरण आहे.
स्थानिक प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, माजी राजा ज्ञानेंद्र शाह यांच्या आदेशावरुन हिंसक आंदोलने करण्यात आली आहेत. यामुळे ज्ञानेंद्र शाह यांच्यावर निर्बंध लादण्यात आले आहे. ज्ञानेंद्र शाह यांनी फ्रेब्रुवारी महिन्यात देशभर दौरा करुन लोकांचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न केला असे सरकारचे म्हणणे आहे. यामुळे शुक्रवारी झालेल्या हिंसाचारानंतर ज्ञानेंद्र शाह यांच्या विरोधात सरकारकडून कठोर पावले उचलण्यात आली आहेत. ज्ञानेंद्र शाह यांचा पासपोर्ट जप्त करण्यात आला आहे.
तसेच त्यांच्या सुरक्षेसाठी नियुक्त जवानांची संख्या देखील कमी करण्यात आली आहे. शिवाय ज्ञानेंद्र शाह यांच्याकडून 7.93 लाख नेपाली रुपयांचा दंडाची भरपाई देण्याचा आदेश देण्यात आला आहे. 28 मार्च रोजी झालेल्या हिंसाचारात सरकारी मालमत्तेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. अनेक, घरे, कार्यालये वाहने आणि इमारतींना पेटवण्यात आले. यामुळे प्रशासनाने नुकसानीच्या भरपाईची मागणी ज्ञानेंद्र शाह यांच्याकडे केली.
🔴Violent clashes erupt in #Nepal
What happened❓❓❓
Nepal Police clashed with protestors as #DurgaPrasai, a key figure in the pro-#monarchy protest, attempted to break through a barricade set up by authorities.Injuries reported on both sides. pic.twitter.com/9EAOz3d3ym
— Levina🇮🇳 (@LevinaNeythiri) March 28, 2025
नेपळाच्या ओली शर्मा सरकारने स्पष्ट केले आहे की, हिंसाचारात सहभागी असलेल्यांना सोडण्यात येणार नाही, त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल. गृहमंत्रालयाने राजेशाही समर्थकांना अल्टीमेटम दिला आहे. सध्या हिंसेत सहभागी असलेल्या व्यक्तींचे ओळख पटवण्याचे काम सुरु आहे. सीसीटीव्ही फूटेज आणि गुप्तचर यंत्रणेच्या अहवालाचा वापर यासाठी केला जात आहे.
28 मार्च 2025 रोजी झालेल्या हिंसक आंदोलनामुळे शहराती परिस्थिती बिघडली होती. यामुळे सरकारने संपूर्ण परिसरात बंदी लागू केली होती. सामान्य नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आदेश देण्यात आले होती. दरम्यान शनिवारी 29 मार्च रोजी सकाळी संचार बंदी उठवण्यता आली. नंतर हळूहळू वाहतूक आणि बाजारपेठा सुरु झाल्या.
सध्या परिसरात भितीचे वातावरण पसरलेले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ज्ञानेंद्र शाह यांचा पासपोर्ट जप्त करण्यात आला आहे. तसेच त्यांच्या निवासस्थानी सुरक्षा संख्या कमी करण्यात आली आहे. सध्या राजेशाही समर्थक सरकाविरोधात आक्रमक झाले आहे. यामुळे पुढील काही दिवस नेपाळमध्ये अराजकत, मोठ्या प्रमाणात हिंसाचार घडण्याची शक्यता आहे.