
Indian H-1B visa crisis: H-1B व्हिसा विलंबाचा फटका; अमेरिकेतील भारतीयांची नोकरी धोक्यात
Indian H-1B visa crisis: अमेरिकेतील H-1B व्हिसाधारक भारतीयांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. भारतात आलेल्या आणि व्हिसा स्टॅम्पिंगला विलंब होत असलेल्या अनेक भारतीयांची नोकरी धोक्यात आली असून पगार कपात होण्याची शक्यता आहे. काही प्रकरणांमध्ये तर भारतात राहिल्यामुळे त्यांना येथेच आयकर भरावा लागू शकतो. ट्रम्प प्रशासनाकडून व्हिसा अर्जदारांच्या सोशल मीडिया अॅक्टिव्हिटीची कठोर तपासणी सुरू असल्याने व्हिसा स्टॅम्पिंग प्रक्रियेला मोठा विलंब होत आहे. त्यामुळे अनेक भारतीय भारतातच अडकले असून व्हिसा मुलाखतींच्या तारखा मार्च, एप्रिल किंवा त्यानंतर ढकलल्या जात आहेत. याचा थेट परिणाम अमेरिकेत काम करणाऱ्या भारतीयांच्या नोकऱ्यांवर होत आहे.
राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या या निर्णयामुळे कंपन्यांसाठीही मोठी अडचणी निर्माण झाली आहे. या परिस्थितीत काही अमेरिकी कंपन्या आपल्या मर्यादित कर्मचाऱ्यांना भारतातून रिमोटली काम करण्याची परवानगी देत आहेत, तर काही त्यांना भारतातील सहयोगी कंपन्यांकडे पाठवत आहेत. मात्र, तज्ज्ञांच्या मते नियोक्त्यांच्या दृष्टीनेही भारतातील वाढलेली उपस्थिती त्यांना कॉर्पोरेट टॅक्सच्या कक्षेत आणू शकते. ज्यामुळे शिक्षित बेरोजगारीचा धोका वाढण्याची म्हणजेच नोकर कपात होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ज्यामुळे भारतीय कर्मचाऱ्यांमध्ये चिंतेची लाट उसलळी आहे. १८२ दिवसांहून अधिक वास्तव्य, आयकराचा धोका असेल.
काही अमेरिकी कंपन्या ज्यांचे कर्मचारी अद्याप अमेरिकेत परतू शकलेले नाहीत, त्या कम्प्लायन्स आणि टैक्सेशन संदर्भातील बाबी समजून घेण्यासाठी इमिग्रेशन तज्ज्ञ, वकील आणि कन्सल्टिंग फम्र्सशी संपर्क साधतआहेत. काही कंपन्या बेट अमेरिकी दूतावास आणि कॉन्सुलेटशी देखील ही संपर्क करून कर्मचाऱ्याच्या व्हिसा मुलाखती लवकर घेण्याची विनंती करत आहेत, लॉ फर्म सर्वांक असोसिएट्स’च्या संस्थापक अंकिता सिंह यानी सांगितले की, एखादा H-1B व्हिसाधारक आर्थिक वर्षात १८२ दिवस किंवा त्याहून अधिक काळ भारतात राहिला, तर तो आयकरासाठी रेसिडेंट ठरतो.
डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.