China-Taiwan Conflict: ड्रॅगनची मोठी चाल! तैवानच्या उंबरठ्यावर ३४ लढाऊ विमाने आणि ११ युद्धनौका तैनात; चीन कोणत्याही क्षणी हल्ला करणार? जग धास्तावले ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया )
Taiwan Air Defense Identification Zone (ADIZ) violation : जगाच्या पाठीवर सध्या युद्धाचे ढग दाटून आले आहेत. मध्य-पूर्वेतील तणाव शांत होत नाही तोच आता आशियात ‘ड्रॅगन’ने आपले पंख पसरण्यास सुरुवात केली आहे. चीन (China) आणि तैवानमधील (Taiwan) संबंध पुन्हा एकदा टोकाला पोहोचले असून, चिनी लष्कराने (PLA) तैवानला चारही बाजूंनी घेरल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तैवानच्या संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या अधिकृत वृत्तानुसार, अलिकडच्या काही तासांत चीनची ३४ लढाऊ विमाने आणि ११ युद्धनौका तैवानच्या अत्यंत जवळ आढळल्या आहेत.
चीनच्या या लष्करी हालचाली केवळ सराव नसून ती एक थेट चिथावणी मानली जात आहे. तैवान आणि चीनमधील अनधिकृत सीमा मानली जाणारी ‘मध्यरेषा’ (Median Line) चीनच्या १८ लढाऊ विमानांनी ओलांडली आहे. ही विमाने तैवानच्या हवाई संरक्षण ओळख क्षेत्रात (ADIZ) घुसली. उत्तर, मध्य, नैऋत्य आणि पूर्व अशा चारही दिशांनी चीनने तैवानची कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे. चीन सातत्याने या सीमेला ओळखण्यास नकार देत आला आहे, परंतु इतक्या मोठ्या प्रमाणावर विमाने आणि जहाजे तैनात करण्याची ही अलिकडच्या महिन्यांतील पहिलीच वेळ आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Iran US Conflict: ‘थांबा, नका करू हल्ला!’ इराणवरील अमेरिकन हल्ला रोखण्यासाठी रात्रभर या देशांमध्ये चाललं ‘राजनैतिक युद्ध’
चीनच्या या आक्रमक पवित्र्यानंतर तैवानचे राष्ट्राध्यक्ष प्रशासन सतर्क झाले आहे. तैवानच्या हवाई दलाने (ROCAF) तात्काळ आपली लढाऊ विमाने हवेत झेप घेण्यासाठी सज्ज केली आहेत, तर नौदलाने आपल्या युद्धनौका चिनी जहाजांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी तैनात केल्या आहेत. तैवानच्या संरक्षण मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की, “आम्ही रडार, इलेक्ट्रॉनिक पाळत ठेवणे आणि प्रगत क्षेपणास्त्र प्रणालीद्वारे चीनच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवून आहोत. आमच्या राष्ट्रीय सुरक्षेशी आम्ही कोणतीही तडजोड करणार नाही.”
JUST IN: Taiwan pledges $500 billion to support US operations Odds China invades Taiwan by the end of 2026 are priced at 13.5% pic.twitter.com/AelcdFpZ4w — Bullpen (@BullpenFi) January 15, 2026
credit – social media and Twitter
चीन तैवानला आपलाच एक भाग मानतो आणि “गरज पडल्यास बळाचा वापर करून तैवानला चीनमध्ये विलीन करू,” अशी उघड धमकी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी अनेकदा दिली आहे. जाणकारांच्या मते, अमेरिकेचे लक्ष सध्या इराण आणि रशियावर असताना, चीन या संधीचा फायदा घेऊन तैवानवर लष्करी कारवाई करण्याची शक्यता नाकारता येत नाही. तैवान हा लोकशाही देश असून तो स्वतःला स्वतंत्र मानतो, पण चीनची ही ‘लष्करी दादागिरी’ आता नव्या युद्धाला निमंत्रण देणारी ठरू शकते.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Poseidon Drone: पुतिनकडे आहे पाण्याखालील प्रलयकाळाचा अग्रदूत; जो कुठेही आणू शकतो 500 फूट उंचीची त्सुनामी, वाचा खासियत
जर चीनने तैवानवर हल्ला केला, तर त्याचा परिणाम केवळ आशियावरच नाही, तर संपूर्ण जगावर होईल. तैवान हा जगातील सेमीकंडक्टर चिप्सचा सर्वात मोठा उत्पादक आहे. युद्ध सुरू झाल्यास जगातील स्मार्टफोन, लॅपटॉप आणि ऑटोमोबाईल उद्योगाला मोठा फटका बसेल. म्हणूनच, अमेरिका आणि जपान यांसारख्या महासत्ता चीनच्या या हालचालींवर बारीक लक्ष ठेवून आहेत.
Ans: चीन तैवानला आपला प्रांत मानतो, तर तैवान स्वतःला एक स्वतंत्र लोकशाही देश मानतो. हाच वैचारिक आणि राजकीय संघर्ष वादाचे मूळ आहे.
Ans: ADIZ म्हणजे हवाई संरक्षण ओळख क्षेत्र आणि मध्यरेषा ही चीन-तैवानमधील अनधिकृत सागरी सीमा आहे. चीनने या दोन्ही मर्यादांचे उल्लंघन केले आहे.
Ans: आशियात युद्ध सुरू झाल्यास जागतिक पुरवठा साखळी विस्कळीत होईल, ज्याचा परिणाम भारताच्या तंत्रज्ञान आणि अर्थव्यवस्थेवर होऊ शकतो.






