H-1B Visa Shock Indians in the U.S Face Deportation Notices Before 60-Day Grace Period Ends
America News Marathi : वॉशिंग्टन : अमेरिकेचे (America) राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) सध्या एकामागून एक धडाकेबाज निर्णय घेत आहेत. टॅरिफच्या आणि बेकायदेशीर स्थलांतरितांना (Illegal Immirgration) देशातून हाकलण्याच्या त्यांच्या निर्णयाने तर संपूर्ण जगाला हादरवून टाकले आहे. याचा सर्वात जास्त फटका भारतीयांना बसला आहे. अमेरिकेत सर्वाधिक भारतीय स्थलांतरित आहे.
ट्रम्प यांनी परदेशी नागरिकांच्या नियमांमध्ये अनेक कठोर बदल केले आहे. यामुळे अनेक भारतीयांचे अमेरिकेत स्थायिक होण्याचे स्वप्न भंगले आहे. विशेष करुन H-1B व्हिसा धारकांसाठीचे नियम अत्यंत कडक करण्यात आले आहे. यामुळे परिस्थिती अत्यंत चिंताजनक झाली आहे. H-1B व्हिसावर नोकऱ्या करणाऱ्या अमेरिकेतील भारतीयांना मायदेशी परतावे लागत आहे.
ट्रम्प यांना मोठा झटका! अलास्कामध्ये बैठकपूर्वी पुतिन यांनी किम जोंग उनशी केली चर्चा
H-1B व्हिसावर अमेरिकेत नोकऱ्या करणाऱ्या भारतीयांना नुकतेच हद्दपारीची नोटिस मिळाली आहे. H-1B व्हिसाच्या नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत. नवीन नियमांनुसार, नोकरी गेल्यानंतर व्हिसा धारकाला नवी नोकरी शोधण्यासाठी ६० दिवसांची मुदत देण्यात आली आहे. या काळात नवी नोकरी शोधून संबंधित व्यक्तीला व्हिसा वाढवण्याची प्रक्रिया पूर्ण करायची आहे. परंतु गेल्या काही महिन्यात मुदत संपण्याच्या आधीच लोकांना निर्वासनाची नोटिस मिळाली आहे.
अनेक प्रकरणांमध्ये संबंधित व्यक्तीला दोन आठवड्यांतच नोटिस पाठवण्यात आली आहे. यामुळे अमेरिकेतील भारतीय समुदायामध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाली आहे. नोकरी गमवल्यामुळे लोकांत्या उत्पन्नामध्ये घट होत आहे, तसेच दैनंदिन जीवनावरही याचा परिणाम होत आहे. यामुळे अनेक भारतीयांचे अमेरिकेत स्थायिक होण्याचे स्वप्न अपूर्ण राहिले आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, अमेरिकेतील ४५% भारतीयांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. यातील २६% लोकांनी नोकरीच्या शोधात इत देशांमध्ये स्थलांतर केले आहे. परंतु उरलेले लोकांना भारतात परतण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. परंतु या लोकांच्या मते, भारतात परतल्यावर त्यांच्या पगारात मोठी घट होण्याची शक्यता आहे. यामुळे त्यांच्या सामाजिक आणि वैयक्तिक जीवनावर परिणाम होईल. यामुळे अमेरिकेत राहून नोकरी शोधण्याचा लोक प्रयत्न करत आहे. मात्र नोटिस मिळाल्यावर मायदेशी परतण्याशिवया पर्याय नाही.
ही परिस्थिती केवळ भारतीयांपुरतीच मर्यादित राहिलेली नाही. ट्रम्प यांनी जगभरातून अमेरिकेत येणाऱ्यांना हाकलण्याचा निर्णय घेतला आहे. पण H-1B व्हिसा धारकांमध्ये भारतीयांची संख्या अधिक आहे. यामुळे भारतीयांवर याचा मोठ्या प्रमाणात परिणाम होत आहे. यामुळे अमेरिकेत राहून करियर घडवण्याचे आणि उच्च जीवनमानाचे स्वप्न भंगल्याने अनेकांना धक्का बसला आहे. लोकांच्या भविष्याबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे.
FAQs (संबंधित प्रश्न)
काय आहे H-1B व्हिसा?
H-1B व्हिसा परदेशी कामगारांना तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि अर्थशास्त्र क्षेत्रात काम करण्यासाठी मर्यादित काळासाठी परवानगी देतो. म्हणजेच भारतीयांना या व्हिसामुळे अमेरिकेत नोकरीसाठी, शिक्षणासाठी व्यवसायासाठी राहण्याची परवानगी मिळते.
काय आहेत H-1B व्हिसाचे नवीन नियम?
नवीन नियमांनुसार, संबंधित व्यक्तीला ६० दिवसांत नोकरी शोधायची आहे, तसेच व्हिसाचा दर्जा बलण्याची प्रक्रिया देखील पूर्ण करायची आहे. तरच अमेरिकेत राहता येणार आहे.
याचा भारतीयांवर काय होत आहे परिणाम?
सध्या ४५% भारतीयांच्या नोकऱ्या गेल्या आहे. यातील २६% लोकांना इतर देशांमध्ये स्थलांतर केले आहे. तर अनेकांकडे भारतात परतण्याशिवाय पर्याया उरलेला नाही.
कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडंच! ४८ तासांत पाकिस्तानी नेत्यांची तिसऱ्यांदा भारताला पोकळ धमकी