Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

हज यात्रेकरुंसाठी दिलासादायक बातमी; ‘या’ प्रकरणांमध्ये रिफंडची सुविधा मात्र अटींसह

Hajj 2025: सौदी अरेबियाने 2025च्या हज यात्रेसाठीच्या नियमांमध्ये मोठे बदल केले असून यामध्ये यात्रेत मुलांचा प्रवेशास बंदी आहे, तसेच सिंगल एन्ट्री व्हिसा देखील लागून केला आहे, सरकारने पुन्हा एकदा नियमांमध्ये बदल केला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Feb 17, 2025 | 02:21 PM
Hajj 2025 Hajj pilgrims will get Refund facility in reservation and accident conditions know how to cancel and get refund

Hajj 2025 Hajj pilgrims will get Refund facility in reservation and accident conditions know how to cancel and get refund

Follow Us
Close
Follow Us:

रियाध: सौदी अरेबियाने 2025च्या हज यात्रेसाठीच्या नियमांमध्ये मोठे बदल केले असून यामध्ये यात्रेत मुलांचा प्रवेशास बंदी आहे, तसेच सिंगल एन्ट्री व्हिसा देखील लागून केला आहे, सरकारने पुन्हा एकदा नियमांमध्ये बदल केला आहे. सौदी अरेबियाने हजच्या आरक्षणाची रक्कम काही विशिष्ट प्रकरणांमध्ये प्रवाशांना परत देण्याची घोषणा जाहीर केले आहेत. सौदी अरेबियाने याबाबत एक मार्गदर्शक तत्वे जाहीर केली आहेत.

बदलले नियम

या मार्गदर्शक तत्त्वानुसार, जर एखाद्या हज यात्रेकरुचा (पुरुष/महिला) मृत्यू हज यात्रेच्या आधी झाला किंवा ट्रॅफिक अपघातामुळे प्रवास अशक्य झाला, तर संपूर्ण रक्कम त्याच्या पत्नीला परत केली जाईल. तसेच, अपघात झाल्यानंतर शारीरिक अडचणींमुळे हज करता येत नसेल, तर अशा प्रवाशांना देखील रिफंड मिळेल. मात्र, ही योजना केवळ सौदी अरेबियामधील हज यात्रेकरता लागू असेल.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- मुलांसोबत हज यात्रेला जाण्याचा विचार करताय तर थांबा! सौदी अरेबियाचे नियम एकदा वाचा

वैद्यकीय रिपोर्ट दाखवावा लागेल

मात्र, यासाठी यात्रेकरुला किंवा त्याच्या कुटूंबीयांना सरकारी रुग्णालयाचा वैद्यकीय रिपोर्ट अनिवार्य असेल. खाजगी रुग्णालयाचा रिपोर्ट असेल, तर तो सौदी आरोग्य प्राधिकरणाकडून प्रमाणित असावा आणि अरबी भाषेत असावा अशी अट ठेवण्यात आली आहे. तसेच आरक्षण रद्द करण्यासाठी हज प्रवासी सौदी सरकारच्या अधिकृत वेबसाइटवर किंवा नुसुक ॲपद्वारे अप्लाय करु शकतात.

डोमेस्टिक हज आरक्षण

डोमेस्टिक हजसाठी, सौदी सरकारने प्रथमच हज करणाऱ्या नागरिकांना प्राधान्य देण्याचे घोषित केले आहे. मात्र, मागील यात्रेत एस्कॉर्ट म्हणून गेलेल्या व्यक्तींना ही अट लागू होणार नसल्याचे सौदीने म्हटले आहे. डोमेस्टिक हज आरक्षणासाठी, प्रवाशांचे नॅशनल कार्ड किंवा रेसिडेन्सी परमिट इस्लामिक कॅलेंडरच्या धुल-हिज्जा महिन्याच्या 10 तारखेपर्यंत वैध असणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले आहे.

अशी केली जाते हज यात्रा

दरवर्षी धुल-हिज्जा महिन्याच्या सातव्या दिवसापासून हजा यात्रेस सुरुवात होते. या दिवशी हज प्रवासी मक्का शहरात येतात, इहराम परिधान करतात आणि काबाच्या पवित्र परिक्रमा करतात. नंतर सफा आणि मरवा या दोन पवित्र टेकडयांदरम्यान सात वेळा परिक्रमा करतात आणि मीना येथे जाऊन प्रार्थना करतात.

यात्रेच्या दुसऱ्या दिवशी प्रवासी अराफात पर्वतावर जाऊन प्रार्थना करुन केलेल्या पापांची क्षमा मागतात. त्यानंतर मुजदलिफा येथे रात्रभर विश्रांती घेतात. यात्रेच्या तिसऱ्या दिवशी जमारात येथे शैतानाचे प्रतीक असलेल्या तीन खांबांवर दगड फेकले जातात.मग पुन्हा मक्काला परत येऊन अंतिम परिक्रमा केली जाते. हजच्या शेवटच्या दिवशी ईद-अल-अजहा म्हणजेच बकरीद साजरी केली जाते.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- ‘या’ देशांसाठी Multiple Visa Entry बंद; हज यात्रेच्या पार्श्वभूमीवर सौदी अरेबियाचा निर्णय

Web Title: Hajj 2025 hajj pilgrims will get refund facility in reservation and accident conditions know how to cancel and get refund

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 17, 2025 | 02:21 PM

Topics:  

  • Hajj Pilgrimage
  • Saudi Arabia
  • World news

संबंधित बातम्या

गाझामधे पसरतोय खतरनाक व्हायरस, तब्बल १०० हून अधिक लहान मुलांना लागण.. काय आहे प्रकरण?
1

गाझामधे पसरतोय खतरनाक व्हायरस, तब्बल १०० हून अधिक लहान मुलांना लागण.. काय आहे प्रकरण?

मध्यपूर्वेत युद्धाची चाहूल! अमेरिका-इस्रायलकडून मिळाले इराणवर हल्ल्याचे संकेत; तेहरानमध्येही लष्करी हालचाली
2

मध्यपूर्वेत युद्धाची चाहूल! अमेरिका-इस्रायलकडून मिळाले इराणवर हल्ल्याचे संकेत; तेहरानमध्येही लष्करी हालचाली

सुरक्षा हमीच्या बदल्यात अमेरिकेकडून तब्बल ८ लाख कोटींची शस्त्रे खरेदी करणार युक्रेन? काय आहे करार?
3

सुरक्षा हमीच्या बदल्यात अमेरिकेकडून तब्बल ८ लाख कोटींची शस्त्रे खरेदी करणार युक्रेन? काय आहे करार?

चीनचे परराष्ट्र मंत्री आज पंतप्रधान मोदींना भेटणार; दोन्ही देशांमधील संबंध सुधारण्यावर देणार भर
4

चीनचे परराष्ट्र मंत्री आज पंतप्रधान मोदींना भेटणार; दोन्ही देशांमधील संबंध सुधारण्यावर देणार भर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.