हिजबुल्लाहने इस्त्रायलवर डागली 250 रॉकेट्स; तेल-अवीवच्या तळांना लक्ष्य करत दिले चोख प्रत्युत्तर
जेरुसेलम: इस्त्रायल-हिजबुल्ल्ह संघर्ष अधिकच तीव्र होत चालला आहे. एकीकडे या युद्धविरामाच्या बातम्या समोर येते होत्या मात्र, आता हिजबुल्लाहने इस्त्रायलवर हल्ला केला असून हे युद्ध सुरू केले आहे. हिजबुल्लाहने म्हटले आहे की, एक आठवडाभर इस्त्रायलने केलेल्या हल्ल्यांचे हे प्रत्युत्तर आहे. इस्त्रायलवर हिजहुल्लाहने 250 रॉकेट्स डागली असून हा सर्वात मोठा हल्ला असल्याचे म्हटले जात आहे. हिजहुल्लाहने 7 ऑक्टोंबर 2023 नंतर हा सर्वात मोठा हल्ला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हिजबुल्लाहने इस्त्रायलच्या तेल-अवीवमधील इस्त्रायलच्या गुप्त स्थळांवर देखील हल्ले केले आहेत. इस्त्रायच्या सैन्याने दिलेल्या माहितीनुसार, तेव-अवीवच्या पूर्वेकडील भागांमध्ये पेताह टिक्क्वा येथे हिजबुल्लाहने हल्ले केले आहेत. मात्र, कोणतेही गंभीर नुकसाने झालेले नाही असे इस्त्रायली सैनिकांनी म्हटले आहे. त्यांनी सांगितले की हिजबुल्लाहने तेल-अवीव आणि दोन लष्करी तळांना लक्ष्य केले आहे.
इस्त्रायच्या हल्ल्यांचे चोख प्रत्युत्तर
गेल्या आठवड्याभरापासून इस्त्रायल लेबनॉनची राजधानी बेरूतमध्ये हिजबुल्लाहच्या ठिकाणांवर हल्ले करत होते. या हल्ल्यांच्या प्रत्युत्तरात इस्त्रायलवर हल्ले करण्यात आले आहेत. इस्त्रायलने केलेल्या हिजबुल्लाहच्यावरील हलल्यांत त्यांच्या प्रवक्ता प्रवक्ता मोहम्मद अफिफसह आणि इतर 63 हून अधिक लोक मारले गेले आहेत. दोन दिवसांपूर्वीच इस्त्रालने बेरुतमध्ये हल्ले केले होते. यामध्ये 269 लेबनीज नागरिक मारले गेले असून 65 हून अधिक लोक जखमी झाले आहेत.
हिजबुल्लाहच्या हल्ल्यांमुळे इस्रायली रणगाड्यांना माघार घ्यावी लागली
इस्त्रायलवर हिजबुल्लाहने केलेला हल्ला इतका भयंकर होता की यामुळे दक्षिण-लेबनॉनमधील अल-बायदा भागातील मोक्याच्या टेकडीवरून इस्रायली रणगाडे आणि लैन्याला माघार घ्यावी लागली आहे. तसेच हिजबुल्लाहने अनेक टँकविरोधी क्षेपणास्त्रांनेही डागली आहेत. हैफा शहराजवळील इस्त्रायली लष्करी कळालाही लक्ष्य करण्यात आले आहे.
या शहराच्या उत्तरेकडील ज्वालुन मिलिटरी बेसवसही क्षेपणास्त्र हल्ले करण्यात आली असल्याची माहिती मिळाली आहे. दक्षिण इस्रायलच्या अश्दोद नौदल तळावर ड्रोन हल्ले केल्याचा दावा देखील हिजबुल्लाहने केला आहे. याशिवाय, इराणेनही इस्रायलला हल्ल्यांची धमकी दिली आहे.
इस्त्रायलच्या हैफा शहराजवळ हिजबुल्लाहचा हल्ला (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
इस्त्रायलने गाझा शहर रिकामे करण्याचे आदेश दिले
इस्रायली लष्कराने गाझा शहरातील शुजैया परिसर रिकामा करण्याचे आदेश दिले असून, त्यानंतर शेकडो पॅलेस्टिनी स्थलांतरित झाले आहेत. 7 ऑक्टोबर 2023 पासून गाझामध्ये 44,211 पॅलेस्टिनी मृत्युमुखी पडले आहेत आणि 104,567 जखमी झाले आहेत. लेबनॉनमधून 12 लाख लोक विस्थापित झाले आहेत. इस्रायल-हिजबुल्ला संघर्षामुळे सुमारे 3,500 लेबनीज मरण पावले आहेत. इस्रायलने युद्धविराम घोषित केल्यास हिजबुल्लाने हल्ले थांबवण्याची तयारी दर्शवली आहे.
इस्त्रायलच्या दूतावासाजवळ गोळीबार
जॉर्डनच्या राजधानी अम्मानमध्ये इस्रायली दूतावासाजवळ गोळीबार झाला, ज्यात एक व्यक्ती ठार झाली तर तीन पोलीस जखमी झाले. ही घटना अम्मानच्या रबीह भागात घडली, जिथे गस्ती पथकावर गोळीबार करण्यात आला. हल्लेखोराला सुरक्षा दलांनी घेरले आणि चकमकीत तो ठार झाला.