Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 14 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Himalayan Crisis : हिमालयाचा ‘काऊंटडाऊन’ सुरू? हिमनद्या वेगाने वितळल्याने लाखो लोक धोक्यात

Himalayan Crisis : हिमालयातील हिमनद्या वेगाने वितळत असल्याने भविष्यात जलसुरक्षेला मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. या बदलाचा परिणाम पिण्याचे पाणी, शेती, जलविद्युत आणि लाखो लोकांच्या उपजीविकेवर होऊ शकतो. हिमालय निर्णायक टप्प्याकडे जात असल्याने आता दीर्घकालीन जलनियोजन आणि हवामान बदलावर नियंत्रणाची गरज वाढली आहे.

  • By Chaitanya Pisal
Updated On: Sep 14, 2026 | 07:27 PM
फोटो सौजन्य सोशल मीडिया

फोटो सौजन्य सोशल मीडिया

Follow Us
Follow Us:
  • हिमनद्या वितळण्याचा वेग वाढला
  • लाखो लोकांच्या उपजीविकेवर संकट
  • टिपिंग पॉईंट नंतर काय होणार? 
Himalayan Crisis : हिमालयाला पृथ्वीचा ‘तिसरा ध्रुव’ म्हटलं जातं. कारण या पर्वतरांगांमध्ये मोठ्या प्रमाणात बर्फ आणि हिमनद्या साठलेल्या आहेत. याच हिमनद्यांमधून वितळणाऱ्या पाण्यावर भारतासह आशियातील अनेक देशांमधील कोट्यवधी लोक अवलंबून आहेत. मात्र, नव्या अभ्यासातून हिमनद्या वेगाने वितळत असल्याचे आणि त्याचा थेट परिणाम भविष्यातील जलसुरक्षेवर होऊ शकतो, असा गंभीर इशारा देण्यात आला आहे. हिमालय एका निर्णायक टप्प्याकडे वाटचाल करत असल्याची चिंता यामुळे वाढली आहे.

हिमनद्या वितळण्याचा वेग वाढला

हिमालयातील वाढते तापमान आणि बदलतं हवामान यामुळे हिमनद्यांच्या वितळण्याचा वेग वाढत आहे. हिमनद्या म्हणजे केवळ बर्फाचे डोंगर नाहीत, तर त्या आशियातील अनेक मोठ्या नद्यांसाठी पाण्याचा महत्त्वाचा स्रोत आहेत. उन्हाळ्यात बर्फ आणि हिम वितळल्यामुळे नद्यांमध्ये पाण्याचा प्रवाह कायम राहण्यास मदत होते.

मात्र हिमनद्या सातत्याने कमी होत गेल्या तर सुरुवातीच्या काळात नद्यांमध्ये पाण्याचे प्रमाण वाढू शकते. त्यानंतर बर्फाचा साठा कमी झाल्यावर पाण्याचा नैसर्गिक पुरवठाच घटण्याचा धोका निर्माण होईल. त्यामुळे भविष्यात पिण्याचे पाणी, शेती आणि जलविद्युत प्रकल्पांवर मोठा परिणाम होऊ शकतो.

Arctic Tension : बर्फ वितळला, महासत्ता भिडल्या! आर्क्टिकसाठी १२ युरोपीय देशांची रणशिंग फुंकली

लाखो लोकांच्या उपजीविकेवर संकट

हिमालयातील पाण्यावर पर्वतीय भागांपासून मैदानी प्रदेशांपर्यंत मोठ्या लोकसंख्येचे जीवन अवलंबून आहे. शेती, पशुपालन, जलविद्युत निर्मिती आणि स्थानिक उद्योगांसाठी नद्यांचे पाणी अत्यंत महत्त्वाचे आहे. हिमनद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घट झाली तर या सर्व क्षेत्रांसमोर पाण्याचे संकट उभे राहू शकते.

विशेषतः हिमालयाच्या पायथ्याशी आणि नदीखोऱ्यांमध्ये राहणाऱ्या समुदायांना याचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. पाण्याची उपलब्धता कमी झाली तर शेतीचे उत्पादन घटू शकते आणि अनेक कुटुंबांच्या उत्पन्नावर परिणाम होऊ शकतो.

Breaking News : सौदी अरेबियावर हुतींचा जोरदार मिसाइल-ड्रोन हल्ला! ‘लष्करी कारवाया थांबवा, नाहीतर हल्ले आणखी वाढवू’

टिपिंग पॉईंट नंतर काय होणार?

सर्वात मोठी चिंता म्हणजे हिमालयातील काही हिमनद्या अशा टप्प्यावर पोहोचू शकतात, जिथून त्यांचा ऱ्हास वेगाने वाढू शकतो. यालाच ‘टिपिंग पॉईंट’ म्हणून संबोधले जाते. हा टप्पा गाठल्यानंतर हिमनद्यांचा बर्फाचा साठा कमी होत गेल्यास भविष्यात पाण्याचा प्रवाह नियंत्रित ठेवणे अधिक कठीण होऊ शकते.

यामुळे हिमालयातील पर्यावरणीय बदलांचा परिणाम केवळ पर्वतीय भागापुरता मर्यादित राहणार नाही. भारतासह संपूर्ण दक्षिण आशियाच्या जलसुरक्षेवर त्याचे परिणाम होऊ शकतात. त्यामुळे हिमनद्यांचे सातत्याने निरीक्षण, पाण्याचे योग्य नियोजन आणि हवामान बदलाचा वेग कमी करण्यासाठी तातडीच्या उपाययोजना करणे आवश्यक बनले आहे. हिमालयाचा बर्फ वितळण्याची ही घंटा भविष्यातील मोठ्या जलसंकटाचा इशारा ठरू शकते.

Web Title: Himalayan crisis has the himalayas countdown begun millions at risk as glaciers melt rapidly

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 14, 2026 | 07:27 PM

Topics:  

  • Climate Change
  • global warming effect
  • himalaya

संबंधित बातम्या

राज्यात पावसाचा पुन्हा जोर वाढणार; विदर्भ, मराठवाड्यासह कोकणातही मुसळधार बरसणार
1

राज्यात पावसाचा पुन्हा जोर वाढणार; विदर्भ, मराठवाड्यासह कोकणातही मुसळधार बरसणार

नागपूर शहर आणि परिसरात विजांच्या कडकडाटासह पाऊस; सुरुवातीच्या काही तासांतच…
2

नागपूर शहर आणि परिसरात विजांच्या कडकडाटासह पाऊस; सुरुवातीच्या काही तासांतच…

Weather Update : राजधानी दिल्ली, उत्तर प्रदेशसह महाराष्ट्रातही मुसळधार पावसाचा इशारा; हवामान विभागाने म्हटले…
3

Weather Update : राजधानी दिल्ली, उत्तर प्रदेशसह महाराष्ट्रातही मुसळधार पावसाचा इशारा; हवामान विभागाने म्हटले…

Weather Update : राज्यातील अनेक भागांत मुसळधार पाऊस होणार; हवामान विभागाकडून 11 जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’
4

Weather Update : राज्यातील अनेक भागांत मुसळधार पाऊस होणार; हवामान विभागाकडून 11 जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.