
नागूपर शहर आणि परिसरात विजांच्या कडकडाटासह पाऊस; सुरुवातीच्या काही तासांतच...
नागपूर : नागपूर शहर आणि परिसरात शनिवारी (दि.12) विजांच्या कडकडाटासह पावसाने जोरदार हजेरी लावली. यामुळे गणरायाचे आगमन पावसातच करावे लागले. दुपारपर्यंत आकाश निरभ्र होते. दुपारी दोननंतर ढग जमा झाले. त्यानंतर काही मिनिटांतच पावसाने हजेरी लावली. पहिले काही तास पावसाने चांगलाच जोर धरला. त्यानंतर सायंकाळपर्यंत रिमझिम हजेरी सुरू होती. रात्री २ अंशाने जास्त होते. किमान तापमान २४.२ अंश सेल्सिअस नोंदविले गेले.
सरासरीपेक्षा हे १ अंशाने जास्त व सरासरीपेक्षा ०.८ अंशाने अधिक असल्याचे विभागाने कळवले. पुढील दोन दिवस तापमानात २ ते ४ अंशाने वाढेल. पुढील २ ते ३ दिवसांत काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल. काही ठिकाणी हलकी व मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. मुसळधार पाऊस पडणाऱ्या भागांत नागरिकांनी सुरक्षेच्या उपाययोजना कराव्यात असे आवाहन हवामान विभागाने केले आहे.
अनेक ठिकाणी साचले पाणी
शनिवारी दुपारनंतर पडलेल्या पावसाने अनेक सखल भागांत पाणी साचले. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पावसाचा जोर जास्त होता. विजांचा प्रचंड कडकडाट सुरू होता. दुपारी २.३० ते ४.३० पर्यंत चांगलाच पाऊस पडला. शहराच्या सर्वदूर पावसाने हजेरी लावली. रस्त्यांवरही पाणी साचले होते. मात्र, सायंकाळी ५ नंतर पावसाने विश्रांती घेत रिमझिम बरसण्यास सुरुवात केली. रात्रीपर्यंत थंडमय वातावरण तयार झाले.
वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस
सप्टेंबर महिना सुरु झाल्यापासून पावसाची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत. ऑगस्ट महिन्यातही पुरेसा पाऊस पडलेला नाही. त्यानंतर आता पुन्हा एकदा महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. बंगालच्या उपसागरातील कमी दाब क्षेत्र पूरक ठरल्याने पुढील दोन दिवस राज्यात जोरदार वारे, मेघगर्जना, विजांसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. राज्यात शनिवारी (दि.12) वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा हवामान विभागाने दिला होता.
11 जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’
गेल्या काही दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल पाहिला मिळत आहे. त्यातच राज्यातील 11 जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. विदर्भात हलका ते मध्यम, तसेच जोरदार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. अनेक भागांमध्ये अपेक्षित पाऊस झालेला पाहायला मिळत नाही. मात्र, आता हवामानात बदल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली असून, राज्यातील विविध भागांमध्ये पावसाच्या सरी पाहायला मिळण्याचा अंदाज आहे.