अल्पसंख्यांकांना लक्ष्य केल्याबद्दल हिंदू-अमेरिकन गट संतप्त; बांगलादेशावर निर्बंध लादण्याची मागणी
नवी दिल्ली: बांगलादेशात हिंदू अल्पसंख्यांक लोकांवर सातत्याने हल्ले केले जात आहे. आत्तापर्यत अनेक हिंदू मंदिराचे लोकांच्या घरांचे नुकसान मोठ्या प्रमाणावर नुकसान करण्यात आले आहे. नुकतेच हिंदी समाजाचे नेते चिन्मय दास यांना अटक करण्यात आली होती. त्यांच्या अटकेनंतर बांगलादेशात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान हिंदू-अमेरिकन गटाने अल्पसंख्यांकांवर होणाऱ्या अत्याचाराचा तीव्र निषेध केला आहे. त्यांनी मागणी केली आहे की, दक्षिण आशियाई देशाला अमेरिकेने दिलेली मदत ही लोकसंख्येच्या संरक्षणासाठी वापरण्यात यावी.
हिंदूवरील अत्याचार सुरूच
बांगलादेशात वातावरण ताणापूर्ण बनलेले आहे. काही महिन्यांपूर्वी परिस्थिती अशी होती की यामुळे बांगदेशाच्या पंतप्रधान शेख हसीना यांना देश सोडून जावे लागले होते. त्यानंतरही हिंदूवरील अत्याचार सुरू होता. अनेक बांगलादेशी हिंदूंनी त्यांचे हक्क आणि सुरक्षिततेच्या मागणीसाठी चितगावमध्ये आंदोलने केली. मात्र तरीही हिंदूवर हल्ले सुरूच आहेत. 5 ऑग्स्टपासून आत्तापर्यंत 200हून अधिक हल्ले झाले आहेत. यामुळे अल्पसंख्यांवरील हल्ल्यामुळे हिंदू-अमेरिकन गट देखील संतप्त झाली आहे. याबाबत त्यांनी एक नवेदन जारी केले आहे.
काय म्हणाले व्हीएचपीए?
विश्व हिंदू परिषद अमेरिका (VHPA) आणि हिंदू फॉर ह्युमन राइट्स यांसारख्या संघटनांनी बांगलादेशातील अल्पसंख्याकांवर होणाऱ्या हल्ल्यांविरोधात आवाज उठवला आहे. VHPA अध्यक्ष अजय शाह यांनी बायडेन प्रशासनाला विचारले की, “मानवी हक्कांचे उल्लंघन करणाऱ्या देशाला मदत का दिली जाते?” याशिवाय त्यांनी बांगलादेशातील गुन्हेगारांवर आंतरराष्ट्रीय निषेधाचा अभाव असल्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. HFAF चे अध्यक्ष उत्सव संदुजा यांनी बांगलादेशी सरकारवर कठोर पावले उचलण्याची मागणी बायडेन प्रशासनाकडे केली आहे.
फोटो सौजन्य: सोशल मीडिया
उत्सव संदुजा यांनी अमेरिकेच्या निधी थांबवण्याची मागणी केले आहे. तसेच त्यांनी बांगलादेशी अधिकाऱ्यांचे अतिरेकी गटांसोबत असलेले संबंध अमेरिकेसाठी धोकादायक असल्याचे म्हटले. त्यांनी व्हिसा निर्बंध लादण्याची आणि कडक देखरेख ठेवण्याची मागणी केली आहे. बांगलादेशातील हिंदू, बौद्ध आणि ख्रिश्चन समाज हिंसेचा बळी ठरत आहे आंतरराष्ट्रीय समुदायाने या परिस्थितीकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले आहे. हिंदू-अमेरिकन गटांनी केलेल्या मागण्या यासाठी महत्त्वपूर्ण ठरू शकतात.
बांगलादेशातील परिस्थिती तणावपूर्ण
सध्या बांगला देशातील परिस्थिती आणखीनच बिघडले आहे. हिंदू समाजाचे नेतृत्व करणारे आणि ISKCON चे सचिव यांच्या अटकेनंतर हिंदू लोकांमध्ये तीव्र आक्राश निर्माण झाला आहे. त्यांच्या सुटकेच्या मागणीसाठी अनेक आंदोलने देखील करण्यात आली. या आंदोनलांदरम्यान देखील हिंदूवर हल्ले करण्यात आले. तसेच बांगलादेश न्यायालयाने दास यांचा जामीन अर्ज फोटाळाल्यामुळे वातावरण तापले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ढाका आणि चितगाव शहरामध्ये अल्पसंख्यांक हिंदू समुदायाच्या लोकांनी निदर्शने काढली.