Hindu Minister Kheal Das Kohistani attacked by radicals in Sindh, Pakistan.
इस्लामाबाद: पाकिस्तानमध्ये पुन्हा एकदा हिंदू समुदायच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. आता केवळ सामान्य हिंदू नागरिकत नाही, तर पाकिस्तानमध्ये हिंदू मंत्रीही सुरक्षित नाहीत. मिळालेल्या माहितीनुसार, सिंध प्रांतातील थट्टा जिल्ह्यात एका आंदोलनात पाकिस्तान सरकारचे राज्यमंत्री आणि पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाजचे खासदार दास कोहिस्तानी यांच्या वाहनांच्या ताफ्यावर हल्ला करण्यात आला आहे. नवीन कालव्यांच्या योजनांविरुद्ध रॅली काढणाऱ्या आंदलोकांनी हा हल्ला केला आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, शनिवारी (19 एप्रिल) ही घटना घडली. सिंधमध्ये नवीन कालव्यांच्या (नहर) योजनांविरुद्ध निदर्शने सुरु होती. यादरम्या राज्यमंत्री दास कोहिस्तानी या परिसरातून जात होते. यावेळी आंदोलकांनी त्यांच्या वाहनांच्या ताफ्यावर टोमॅटो आणि बटाटचे फेकले. तसेच सरकारविरोधात घोषणाही दिल्या. पाकिस्तान सरकारने दिलेल्या माहितीनुसार, या हल्ल्यात कोहिस्तानी यांना कोणतीही शारिरीक इजा झालेली नाही.
وزیر مملکت مذہبی امور کھیل داس کوہستانی پر ٹھٹھہ میں حملہ کس نے کیا خود ان کی اپنی زبانی سنیے۔ 👇👇 pic.twitter.com/qtRseTaHaM
— WAQAR SATTI 🇵🇰 (@waqarsatti) April 19, 2025
मीडिया रिपोर्टनुसार, पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी या घटनेची गंभीर्य लक्षात घेते चौकशीचे आदेश दिले आहेत. तसेच त्यांनी दास कोहिस्तानी यांना फोनवरुन त्यांची विचारपूस केली आणि संपूर्ण घटनेची सखोल चौकशीचे आश्वासन दिले. पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी म्हटले की, “जनप्रतिनिधींवर होणारे हल्ले अस्वीकार्य आहेत. यामध्ये सहभागी असलेल्या दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल.”
तसे दास कोहिस्तानी यांच्यावरील हल्ल्याच्या निषेधार्थ अनेक नेत्यांनी आवाज उठवला आहे. माहिती मंत्री अत्ता तरार यांनी सिंध प्रांताचे पोलीस महासंचालक (IGP) गुलाम नबी मेमन यांच्याकडून संपूर्ण घटनेची माहिती मागवली आहे. तसेच केंद्रीय गृह सचिवांनीही अहवाल सादर करण्यास सांगितला आहे. तसेच सिंधचे सैय्यद मुराद अली शाह यांनी तीव्र शब्दांत हल्लाचा निषेध केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, “कोणालाही कायदा हातात घेण्याचा अधिकार नाही.” त्यांनी हैदराबाद विभागाच्या पोलीस उपमहानिरिक्षकांना दोषींना तात्काळ उटक करण्याचे आदेश दिले आहेत.
दास कोहिस्तानी हे सिंधमधील जमशोरो जिल्ह्याचे रहिवासी आहेत. 2018 मध्ये ते PML-N तर्फे प्रथच सदस्य झाले. त्यांनी पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला. 2024 मध्ये ते कोहिस्तानी पुन्हा निवडून आले होते. यंदा त्यांची राज्य मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. हिंदू समाजातील एक प्रभावशाली चेहरा म्हणून कोहिस्तानी यांना ओळखले जाते. सध्या कोहिस्तानी धार्मिक व्यवहार मंत्रालयाची जबाबदारी पाहत आहेत.