'ट्रम्प हिटलरपेक्षा अधिक मुर्ख....', अमेरिकेत पुन्हा एकदा राष्ट्राध्यक्षांविरुद्ध निदर्शने; लाखो लोक रस्त्यावर (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
वॉशिंग्टन: न्यूयॉर्क, वॉशिंग्टन आणि अमेरिकेतील शेकडो शहरांमध्ये पुन्हा एकदा हजारो निदर्शकांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या कठोर धोरणांविरोधात शनिवारी मोठे आंदोलन सुरु केले अस्ल्याची माहिती वृत्तसंस्था एएफपीने दिली आहे. अमेरिकेत कोणी राजा नाही, तानाशाहीचा विरोध करा अशा घोषण देत अमेरिकेत आंदोलन सुरु होते.
अमेरिकेच्या निदर्शक शहराच्या मुख्य ग्रंथालयाबाहेर जमले. त्यांनी ‘NO Kings In America’ (अमेरिकेत राजा नाही) आणि ‘Resist Tyranny’ (तानाशाहीचा विरोध करा) असे लिहिलेले पोस्टर आणि बॅनर हातात घेतले होते.
या निदर्शनांमध्ये बहुतांश लोकांचता संताप ट्रम्प यांच्या इमिग्रेशम धोरणाला होता. लोक मोठ्या मोठ्या घोषण देते होते. – ‘No ICE, no fear, immigrants are welcome here’ हा नारा अमेरिकेच्या हा नारा ICE (Immigration and Customs Enforcement) या एजन्सीविरोधात देण्यात येत होता. या संस्थेने बेकायदेशीर स्थलांतरितांना अटक केली होती.
याशिवाय, वॉशिंग्टन डी. सी मध्ये आंदोलकांनी ट्रम्प प्रशासनावर संविधानिक तत्वांवर, विशेष करुन, ‘न्यायप्रक्रिया’ (Due Process) अधिकारावर हल्ला केल्याचा आरोप केला.
व्हाइट हाऊसबाहेर निदर्शने करत असलेल्या 41 वर्षीय बेंजामिन डग्लस म्हणाले, “हे प्रशासन कायद्याच्या राज्यावर आणि नागरिकांवर अत्याचार न करण्याच्या मूलभूत संकल्पनेवर हल्ला करत आहे.”
आंदोलकांनी पॅलेस्टिनी समर्थक विद्यार्थी महमूद खलीलच्या सुटकेची मागणी केली. डग्लस म्हणाले की, काही व्यक्तींना जाणीवपूर्वक लक्ष्य केले जात आहे. यामुळे लोकांच्या मनात विरोधी भावना उत्पन्न होईल.
न्यूयॉर्कमधील ७३ वर्षांची निदर्शक कॅथी व्हॅली, ज्या होलोकॉस्टमधून वाचलेल्या एका महिलेने म्हटले की, “आम्ही खूप मोठ्या धोक्यात आहोत.” त्यांनी सांगितलं की, “माझ्या पालकांनी हिटलरच्या उदयाची जी वर्णने केली होती, ती आज ट्रम्प यांच्या कारकिर्दीत पुन्हा अनुभवायला मिळत आहेत. फरक इतकाच की ट्रम्प हिटलर आणि इतर फॅसिस्ट नेत्यांच्या तुलनेत अधिक मूर्ख आहेत. त्यांचा फक्त वापर केला जात आहे आणि त्यांच्या स्वतःच्या टीममध्येच फूट आहे.”
बाल्टिमोअरच्या जॉन्स हॉपकिन्स युनिव्हर्सिटीमधील इम्यूनोलॉजी विषयातील पीएचडी विद्यार्थिनी डॅनिएला बटलर (२६) यांनी ट्रम्प प्रशासनाच्या विज्ञान आणि सार्वजनिक आरोग्य निधी कपातीबाबत चिंता व्यक्त केली. त्या म्हणाल्या, “जेव्हा विज्ञानाकडे दुर्लक्ष केलं जातं, तेव्हा लोक मरतात.” त्यांच्या हातात टेक्सास राज्याचा नकाशा होता ज्यावर नुकत्याच घडलेल्या गोवरच्या साथीचे ठिकाण दर्शवले होते.
टेक्सासच्या गॅल्व्हेस्टनमध्ये एका लहान गटाने निदर्शन केलं. तिथल्या ६३ वर्षीय लेखिका पॅट्सी ऑलिव्हर म्हणाल्या, “हे माझं चौथं निदर्शन आहे. साधारणतः मी पुढील निवडणुकीची वाट पाहिली असती, पण आता आम्ही खूप काही गमावलं आहे, म्हणून गप्प राहणं शक्य नाही.”
सॅन फ्रान्सिस्कोच्या समुद्रकिनारी शेकडो लोकांनी वाळूत ‘IMPEACH + REMOVE’ (महाभियोग आणि हटवा) असं लिहिलं. काही निदर्शकांनी उलटा अमेरिकन झेंडा फडकावला, जो संकटाचं पारंपरिक चिन्ह मानला जातो.
‘50501’ नावाच्या गटाने या निदर्शनांचं आयोजन केलं होतं. या नावाचा अर्थ आहे – ५० राज्यांमध्ये ५० निदर्शने आणि एक आंदोलन. या गटाच्या माहितीनुसार, देशभरात सुमारे ४०० निदर्शनांची योजना होती. जरी आयोजकांनी लाखोंच्या सहभागाची अपेक्षा व्यक्त केली होती, तरी ५ एप्रिलला झालेल्या ‘Hands Off’ निदर्शनांच्या तुलनेत यावेळी गर्दी काहीशी कमी होती.