Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

जगावर संकट! ‘या’ कारणामुळे 2030 पर्यंत होणार 30 लाख लोकांचा मृत्यू, शास्त्रज्ञांनी दिला इशारा

एचआयव्ही प्रतिबंध आणि उपचारांसाठी आंतरराष्ट्रीय निधी कपात होण्यामुळे जगभरातील आरोग्य व्यवस्थेसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. युरोप आणि अमेरिकेतील प्रमुख देणगीदार देशांनी निधी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Mar 27, 2025 | 02:29 PM
HIV funding cuts risk millions of lives and infections by 2030

HIV funding cuts risk millions of lives and infections by 2030

Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली : एचआयव्ही प्रतिबंध आणि उपचारांसाठी आंतरराष्ट्रीय निधी कपात होण्यामुळे जगभरातील आरोग्य व्यवस्थेसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. युरोप आणि अमेरिकेतील प्रमुख देणगीदार देशांनी निधी कमी करण्याचा निर्णय घेतल्याने 2030 पर्यंत 10 दशलक्षाहून अधिक नवीन संसर्ग आणि 30 लाख मृत्यू होऊ शकतात, असा धक्कादायक अहवाल प्रसिद्ध झाला आहे. हा अभ्यास लॅन्सेट एचआयव्ही जर्नल मध्ये प्रकाशित झाला असून, ऑस्ट्रेलियातील मेलबर्न येथील बर्नेट इन्स्टिट्यूट मधील संशोधकांनी या संभाव्य धोक्याचा सखोल अभ्यास केला आहे.

एचआयव्ही निधी कपातीचा गंभीर परिणाम

एचआयव्ही/एड्सच्या जागतिक निधीमध्ये 2026 पर्यंत 24% कपात होण्याची शक्यता असल्याचे या संशोधनातून स्पष्ट झाले आहे. अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी आणि नेदरलँड्स हे प्रमुख देश जागतिक एचआयव्ही निधीच्या 90% पेक्षा अधिक मदत पुरवतात, मात्र त्यांनी आपल्या देणग्यांमध्ये 8 ते 70 टक्के कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. संशोधनानुसार, 2025 ते 2030 या कालावधीत 4.4 ते 10.8 दशलक्ष अतिरिक्त नवीन संसर्ग आणि 7.7 लाख ते 29 लाख अतिरिक्त मृत्यू होऊ शकतात.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : अमेरिकेत शिकणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांवर टांगती तलवार; कॉलेज आंदोलकांना भोगावे लागणार गंभीर परिणाम

अमेरिकेच्या निधी कपातीचा सर्वाधिक फटका

एचआयव्ही प्रतिबंध आणि उपचारांसाठी सर्वाधिक मदत करणाऱ्या अमेरिकेने 20 जानेवारी रोजी नवीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधीनंतर सर्व मदतीला स्थगिती दिली. विशेष म्हणजे, अमेरिकेची PEPFAR (राष्ट्रपतींची एड्ससाठी आपत्कालीन मदत योजना) ही योजना 2003 पासून सुरू होती आणि तिने लाखो लोकांचे प्राण वाचवले आहेत. मात्र, या निधी कपातीमुळे अँटीरेट्रोव्हायरल थेरपी (ART), एचआयव्ही चाचण्या, कंडोम आणि प्रतिबंधात्मक औषधे यांची उपलब्धता घटणार आहे, असे संशोधकांचे मत आहे.

आफ्रिका आणि दुर्लक्षित समूहांवर सर्वाधिक परिणाम

या निधी कपातीचा सर्वाधिक परिणाम उप-सहारा आफ्रिकेतील गरीब देशांवर आणि दुर्लक्षित गटांवर होणार आहे.

  • ड्रग इंजेक्शन करणारे व्यसनी लोक, सेक्स वर्कर्स, समलिंगी पुरुष आणि लहान मुले हे सर्वाधिक प्रभावित होणार आहेत.
  • कंडोम वितरण, प्री-एक्सपोजर प्रोफिलॅक्सिस (PrEP) औषधे आणि आरोग्य सुविधा कमी होण्याची भीती आहे.

संशोधकांचे म्हणणे आहे की, एचआयव्हीवरील आंतरराष्ट्रीय मदतीत घट झाल्यास साथीचा रोग पुन्हा नियंत्रणाबाहेर जाऊ शकतो.

शाश्वत निधी मिळाल्याशिवाय संकट अटळ!

बर्नेट इन्स्टिट्यूटच्या डॉ. डेब्रा टेन ब्रिंक यांच्या मते, एचआयव्ही प्रतिबंधासाठी शाश्वत निधी मिळाल्याशिवाय ही महामारी पुन्हा उग्र स्वरूप धारण करू शकते. संशोधनात असेही नमूद करण्यात आले आहे की, जर निधी कपात पूर्ववत केली गेली नाही, तर 2030 पर्यंत “एचआयव्ही निर्मूलन” करण्याचे उद्दिष्ट अयशस्वी ठरेल.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : दुबईच्या राजघराण्यात जन्मलेल्या नवजात राजकुमारीचे नाव ‘हिंद’ का ठेवले? वाचा यामागचे रंजक कारण

 जागतिक आरोग्यासाठी मोठे आव्हान

एचआयव्ही प्रतिबंधासाठी जागतिक स्तरावर निधी कपात केल्यास कोट्यवधी लोकांना जीव गमवावा लागेल. गरीब देश आणि दुर्लक्षित गट यावर सर्वाधिक परिणाम होईल. त्यामुळे, आंतरराष्ट्रीय समुदायाने एकत्र येऊन हा निधी पुनर्संचयित करणे अत्यावश्यक आहे, अन्यथा 2030 पर्यंत एचआयव्ही संसर्ग आणि मृत्यूच्या संख्येत प्रचंड वाढ होईल.

Web Title: Hiv funding cuts risk millions of lives and infections by 2030 nrhp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 27, 2025 | 02:29 PM

Topics:  

  • Health News
  • HIV
  • international news

संबंधित बातम्या

Germany lithium: भारताच्या ‘या’ मित्रराष्ट्राला सापडला 43 दशलक्ष टन लिथियम; ऊर्जा आणि तंत्रज्ञान क्षेत्रात वाढणार भागीदारी
1

Germany lithium: भारताच्या ‘या’ मित्रराष्ट्राला सापडला 43 दशलक्ष टन लिथियम; ऊर्जा आणि तंत्रज्ञान क्षेत्रात वाढणार भागीदारी

Rare Disease : जगातील सर्वात दुर्मिळ आजार ज्यात भीतीच मरते; ‘या’ दोन व्यक्तींनी जगाला सांगितली त्यांची अद्भुत कहाणी
2

Rare Disease : जगातील सर्वात दुर्मिळ आजार ज्यात भीतीच मरते; ‘या’ दोन व्यक्तींनी जगाला सांगितली त्यांची अद्भुत कहाणी

अणुऊर्जा क्षेत्रात गेम-चेंजर ‘SMR’ मुळे तेलावरचा खर्च कायमचा संपणार; भारताला जागतिक ऊर्जा महासत्ता बनवणारा गुप्त महामंत्र
3

अणुऊर्जा क्षेत्रात गेम-चेंजर ‘SMR’ मुळे तेलावरचा खर्च कायमचा संपणार; भारताला जागतिक ऊर्जा महासत्ता बनवणारा गुप्त महामंत्र

ISIRun : पाकिस्तानचा भारताविरुद्ध नवा हेरगिरीचा कट; कराचीतील आयएसआयचे युनिट 412 सक्रिय
4

ISIRun : पाकिस्तानचा भारताविरुद्ध नवा हेरगिरीचा कट; कराचीतील आयएसआयचे युनिट 412 सक्रिय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.