
फोटो सौजन्य सोशल मीडिया
ओमानच्या अधिकाऱ्यांच्या मदतीने जखमी कर्मचाऱ्यांना सुरक्षितपणे बाहेर काढून रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेमुळे आधीच तणावपूर्ण असलेल्या हॉर्मुझमधील सागरी वाहतुकीवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
ओमानच्या किनाऱ्याजवळून हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतून जहाज जात असताना त्याला प्रक्षेपक धडकल्याची माहिती समोर आली आहे. जहाजावरील 19 कर्मचाऱ्यांपैकी 12 जण जखमी झाले. जखमींमध्ये 11 भारतीयांचा समावेश आहे. ओमानच्या मदतीने त्यांना बाहेर काढून उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणत्याही संघटनेने स्वीकारलेली नाही.
Russia-Ukraine : धक्कादायक ;युक्रेनवर रशियाचा मोठा मिसाईल-ड्रोन हल्ला ;२४ जणांचा मृत्यू
गेल्या काही दिवसांत हॉर्मुझ परिसरात तेल, LNG आणि LPG वाहून नेणाऱ्या जहाजांशी संबंधित हल्ले आणि हल्ल्याचे प्रयत्न वाढले आहेत. 28 सप्टेंबर ते 5 ऑक्टोबरदरम्यान किमान 12 घटना नोंदवण्यात आल्या आहेत. ड्रोनद्वारे नजर ठेवणे, जहाजांना रेडिओवरून इशारे देणे आणि प्रत्यक्ष हल्ल्यांचाही यामध्ये समावेश आहे. त्यामुळे या महत्त्वाच्या जलमार्गातून जहाजांची वाहतूक करणाऱ्या कंपन्यांची चिंता वाढली आहे.
World News: तेलाचा भाव १०० डॉलरपार,जगाला महागाईचा झटका; पेट्रोल-डिझेलपासून वाहतुकीपर्यंत वाढणार दबाव
हॉर्मुझची सामुद्रधुनी ही जागतिक ऊर्जा पुरवठ्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. जगातील तेल आणि गॅसच्या मोठ्या प्रमाणातील वाहतुकीसाठी या मार्गाचा वापर केला जातो. त्यामुळे या भागातील हल्ले वाढल्यास जहाजांचा विमा, वाहतूक खर्च आणि कच्च्या तेलाच्या किमती वाढण्याची शक्यता आहे. हॉर्मुझमधील परिस्थिती आणखी बिघडल्यास त्याचा थेट परिणाम आशियासह जगभरातील इंधन बाजारावर होऊ शकतो.