Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

हूथी अतिरेक्यांनी पुन्हा एकदा इस्रायलवर केला मोठा हल्ला; आतापर्यंत 320 हून अधिक ड्रोन आणि 40 बॅलेस्टिक मिसाइल डागल्या

येमेनमधील हुथींनी इस्रायलवर 3 ड्रोन उडवले. त्यापैकी फक्त एक ड्रोन इस्रायलच्या हद्दीत पोहोचण्यात यशस्वी ठरले, तर उर्वरित दोन ड्रोन इस्रायलने आधीच पाडले आहेत.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Jan 10, 2025 | 12:54 PM
Houthi militants once again launch major attack on Israel So far more than 320 drones and 40 ballistic missiles have been fired

Houthi militants once again launch major attack on Israel So far more than 320 drones and 40 ballistic missiles have been fired

Follow Us
Close
Follow Us:

येमेन : इस्त्रायली हवाई दलाने येमेनच्या इराण समर्थित हुथी अतिरेक्यांनी उडवलेले 3 ड्रोन पाडले आहेत. इस्रायली संरक्षण दलाने (IDF) सांगितले की, गुरुवारी (9 जानेवारी) संध्याकाळी हुथी ड्रोन पाडण्यात आले. तथापि, अलीकडच्या काही दिवसांत इराण समर्थित हुथी अतिरेक्यांनी इस्रायलवर केलेला हा पहिला हल्ला होता. येमेनमधून हौथींनी डागलेल्या तीन ड्रोनपैकी फक्त एक ड्रोन इस्रायलच्या हद्दीत पोहोचण्यात यशस्वी झाला, तर उर्वरित दोन ड्रोन इस्रायलने आधीच पाडले आहेत. आयडीएफने 7 ऑक्टोबर 2023 पासून येमेनमधून डागलेल्या ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचा डेटा जाहीर केल्यानंतर काही तासांतच हौथींचा हा हल्ला करण्यात आला आहे.

इस्रायल हुथी क्षेपणास्त्र रोखू शकले नाही

आयडीएफने गुरुवारी (9 जानेवारी) सांगितले की 7 ऑक्टोबर 2023 हमासच्या हल्ल्यापासून, येमेनच्या हुथी अतिरेक्यांनी 40 बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे आणि 320 हून अधिक ड्रोनसह इस्रायलवर हल्ला केला आहे. यापैकी बहुतेक हल्ले इस्त्रायली हवाई संरक्षण प्रणाली आयर्न डोमने आधीच नष्ट केले आहेत. पण इस्त्रायली हवाई संरक्षण यंत्रणा फक्त एक हुथी क्षेपणास्त्र पाडण्यात अपयशी ठरली. त्याच वेळी, इतर सर्वांना रोखण्यात आले.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : बांगलादेशने भारत आणि इस्रायलच्या ‘या’ शत्रूला केले जवळ; लष्करी सामर्थ्यासाठी करणार करार

इस्रायलमध्ये फक्त दोन ड्रोन हल्ले प्रभावी ठरले

इस्रायली लष्कराने सांगितले की, आयडीएफने युद्धादरम्यान येमेनमधून इस्रायलवर गोळीबार केलेल्या 320 हून अधिक ड्रोनचा डेटा रेकॉर्ड केला आहे. ज्यामध्ये 100 हून अधिक ड्रोन हल्ले इस्रायली हवाई दलाने जमिनीवरील हवाई संरक्षण यंत्रणा, लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टरद्वारे पाडले. इस्त्रायली नौदलाने अनेक ड्रोन नष्ट केले. पण इस्रायलमध्ये फक्त 2 ड्रोन हल्ले प्रभावी ठरले.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : इस्रायली राजकारणी नेतन्याहूंना अटक करायची की नाही? अमेरिकेच्या ‘या’ निर्णयामुळे इतर देशही बुचकळ्यात

या आठवड्याच्या सुरूवातीस, आयडीएफने येमेनमधून डागलेल्या क्षेपणास्त्राला इस्रायली हद्दीत प्रवेश करण्यापूर्वी खाली पाडले. इस्रायलचा सर्वात मोठा पॉवर प्लांट ओरोट राबिनला लक्ष्य करणे हा त्यांच्या हल्ल्याचा उद्देश होता, असे हौथींनी म्हटले होते. येमेनच्या इराण-समर्थित हुथी अतिरेक्यांनी पॅलेस्टाईन-2 मॉडेल हायपरसोनिक बॅलिस्टिक क्षेपणास्त्र प्रक्षेपित करण्याचा दावा केला होता.

इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्याविरोधातही काढण्यात आले अटक वॉरंट

इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्याविरोधात जारी करण्यात आलेल्या अटक वॉरंटवर अमेरिकेने आंतरराष्ट्रीय फौजदारी न्यायालयात निर्बंध घालण्याची मागणी केली आहे. यासंबंधीचे विधेयक लोकप्रतिनिधी सभागृहात मंजूर करण्यात आले आहे. गाझामधील युद्ध आणि मानवतेविरुद्धच्या गुन्ह्यांबद्दल ICC ने नेतान्याहू आणि माजी संरक्षण मंत्री गॅलेंट यांच्याविरुद्ध अटक वॉरंट जारी केले होते.

अमेरिकन संसदेचे कनिष्ठ सभागृह प्रतिनिधीगृहाने गुरुवारी आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयावर (आयसीसी) बंदी घालणारे विधेयक मंजूर केले. खरं तर, 2023 मध्ये, ICC ने इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू आणि माजी संरक्षण मंत्री योव गॅलंट यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी केले होते. याला प्रत्युत्तर म्हणून अमेरिकेच्या प्रतिनिधीगृहाने हे विधेयक मंजूर केले आहे.

 

 

Web Title: Houthi militants once again launch major attack on israel so far more than 320 drones and 40 ballistic missiles have been fired nrhp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 10, 2025 | 12:54 PM

Topics:  

  • benjamin netanyahu
  • Houthi
  • Israel

संबंधित बातम्या

हमासने टेकले गुडघे? युद्धबंदी आणि ओलिसांना सोडण्याची इस्रायलची अट केली मान्य; पण…
1

हमासने टेकले गुडघे? युद्धबंदी आणि ओलिसांना सोडण्याची इस्रायलची अट केली मान्य; पण…

‘Operation Gideon’s Chariots’ इस्रायलची गाझा बळकावण्यासाठी नवी खेळी;  हजारो जीव धोक्यात
2

‘Operation Gideon’s Chariots’ इस्रायलची गाझा बळकावण्यासाठी नवी खेळी; हजारो जीव धोक्यात

‘पुन्हा हल्ला केल्यास विनाश…’ ; इराणच्या धर्मगुरुंची अमेरिका आणि इस्रायलला चेतावणी
3

‘पुन्हा हल्ला केल्यास विनाश…’ ; इराणच्या धर्मगुरुंची अमेरिका आणि इस्रायलला चेतावणी

इस्रायलची ‘गाझावर’ नियंत्रणाची तयारी सुरु; नेतन्याहूंनी पॅलेस्टिनींना दिला युद्धभूमी सोडण्याचा आदेश
4

इस्रायलची ‘गाझावर’ नियंत्रणाची तयारी सुरु; नेतन्याहूंनी पॅलेस्टिनींना दिला युद्धभूमी सोडण्याचा आदेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.