बांगलादेशने भारत आणि इस्रायलच्या 'या' शत्रूला केले जवळ; लष्करी सामर्थ्यासाठी करणार करार ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
ढाका : बांगलादेशने अलीकडेच भारत आणि इस्रायलचा शत्रू तुर्किये यांच्याशी हातमिळवणी केली आहे. अलीकडे, बांगलादेशचे मुख्य सल्लागार मोहम्मद युनूस यांनी तुर्कियेचे व्यापार मंत्री प्राध्यापक डॉ. उमर बोलात यांची भेट घेतली. यादरम्यान दोन्ही देशांनी लष्करी, व्यापार आणि आर्थिक स्तरासह अनेक क्षेत्रात संबंध दृढ करण्यासाठी चर्चा केली.
बांगलादेश भारत आणि इस्रायल या दोन्ही देशांच्या शत्रूंना सामावून घेत आहे. बांगलादेशने आपले लष्करी सामर्थ्य मजबूत करण्यासाठी हे पाऊल उचलले आहे. तुर्कियेचा पाकिस्तानकडे कल असल्यामुळे, तुर्कियेच्या भारतासोबतच्या संबंधांमध्ये तणाव कायम आहे. तसेच, इस्रायल आणि हमासमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे, तुर्कीने मे 2024 मध्ये इस्रायलसोबत कोणत्याही प्रकारच्या आयात आणि निर्यातीवर बंदी घातली होती. बांगलादेश आता स्वत:ला बळकट करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे आणि त्यासाठी त्यांनी तुर्कियेशी हातमिळवणी केली आहे.
तुर्कीचे व्यापार मंत्री प्रोफेसर डॉ. उमर बोलात 9 जानेवारी रोजी त्यांच्या शिष्टमंडळासह ढाका येथे पोहोचले. जिथे त्यांनी बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार मोहम्मद युनूस यांची भेट घेतली.
अनेक क्षेत्रात सहकार्य मजबूत करण्यासाठी चर्चा
या भेटीत बांगलादेश आणि तुर्कस्तानने व्यापारापासून लष्करापर्यंत अनेक मुद्द्यांवर संबंध मजबूत करण्यावर चर्चा केली. बांगलादेश आणि तुर्कीने संरक्षण उद्योगात सहकार्याच्या शक्यतेवर चर्चा केली. या बैठकीदरम्यान मुख्य सल्लागार प्राध्यापक युनूस यांनी तुर्कीने आपले तंत्रज्ञान बांगलादेशात आणावे आणि येथे शक्य तितकी गुंतवणूक करावी, असे आवाहन केले. इथे तुमचा कारखाना उभारा आणि त्यात बांगलादेशातील लोकांना सहभागी करा.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : इस्रायली राजकारणी नेतन्याहूंना अटक करायची की नाही? अमेरिकेच्या ‘या’ निर्णयामुळे इतर देशही बुचकळ्यात
या भेटीत प्रोफेसर युनूस यांनी तुर्कस्तानचे व्यापार मंत्री प्रोफेसर डॉ.ओमर बोलात यांना सांगितले, तुमचा देश तंत्रज्ञानात अग्रेसर आहे, तुम्ही तुमचा संरक्षण उद्योग येथे उभारू शकता. चला नवीन सुरुवात करूया. तुम्हाला जे काही हवे आहे, आम्ही तुम्हाला मदत करण्यासाठी येथे आहोत. युनूस म्हणाले, बांगलादेश आणि तुर्किये यांच्यात विविध क्षेत्रात परस्पर सहकार्याद्वारे मजबूत संबंध निर्माण करण्याची ताकद आहे. बांगलादेशच्या मुख्य सल्लागारांनी तुर्कस्तानच्या व्यापार मंत्र्यांना सांगितले की, आता खूप गोष्टी करायच्या आहेत, आम्हाला तुमची साथ, तुमचे तंत्रज्ञान आणि तुमच्या गुंतवणुकीची गरज आहे.
Türkiye dostu Bangladeş Geçici Hükümeti Başdanışmanı Prof. Muhammad Yunus ile Dakka’da Türk iş dünyasının önde gelen çatı kuruluşlarının temsilcilerinin de katılımı ile kapsamlı ve samimi bir görüşme gerçekleştirdik.
Türkiye olarak Bangladeş’in reform sürecinde her türlü katkıyı… pic.twitter.com/WEnoQo8CxV
— Prof. Dr. Ömer Bolat (@omerbolatTR) January 9, 2025
credit : social media
बैठकीत भारताचाही उल्लेख करण्यात आला
बांगलादेशला जगातील 8 वा सर्वात जास्त लोकसंख्या असलेला देश म्हणून वर्णन करताना, मोहम्मद युनूस म्हणाले, अंतरिम सरकार देशातील तरुणांसाठी अधिक रोजगार निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्यासाठी तुर्कीच्या मदतीची आवश्यकता आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधीपूर्वीच का घाबरला पाकिस्तान? वाचा तज्ञांचे मत
तुर्कीचे मंत्री प्रोफेसर ओमर बोलात म्हणाले की बांगलादेश आणि तुर्किये वस्त्रोद्योगाच्या पलीकडे इतर गोष्टींपर्यंत आपले सहकार्य वाढवू शकतात. संरक्षण उद्योग, आरोग्य सेवा फार्मास्युटिकल्स आणि कृषी यंत्रसामग्री या क्षेत्रात तुर्किए आणि बांगलादेश यांच्यात आर्थिक सहकार्य होऊ शकते, असे ते म्हणाले. तसेच, भारताचा उल्लेख करताना तुर्की मंत्री म्हणाले की, बांगलादेशच्या आयातीमध्ये आम्ही भारत आणि इतर बाजारपेठांची जागा घेऊ शकतो. आर्थिक आणि सामाजिक क्षेत्रात प्रत्येक स्तरावर सहकार्य होऊ शकते. बांगलादेश आणि तुर्किए विद्यापीठ स्तरावरही सहकार्य करू शकतात, असेही ते म्हणाले.
दोन्ही देशांमधील व्यापार कसा आहे?
2023-24 मध्ये, बांगलादेशने तुर्कियेला 581 दशलक्ष रुपयांची निर्यात केली. त्याच वेळी, देशातून 424 दशलक्ष रुपयांची आयात करण्यात आली. आता सुमारे 20 मोठ्या तुर्की कंपन्या बांगलादेशमध्ये कापड आणि उपकरणे, रसायन, अभियांत्रिकी, बांधकाम आणि ऊर्जा क्षेत्रात काम करत आहेत. तुर्कीच्या व्यापार मंत्र्यांच्या भेटीदरम्यान, मुख्य सल्लागार युनूस यांनी ऑगस्टमध्ये तुर्कीचे अध्यक्ष रेसेप तय्यिप एर्दोगान यांच्याशी झालेल्या त्यांच्या टेलिफोन संभाषणाची आठवण करून दिली, त्यानंतर आठ सदस्यीय तुर्की शिष्टमंडळाने ऑक्टोबरमध्ये बांगलादेशला भेट दिली.