Houthis wreak havoc in the Red Sea, Attack on two cargo ships within a week
पश्चिम आशियामध्ये लाल समुद्रात पुन्हा एकदा युद्धाचा भडका उडाला आहे. इराण समर्थित हुथी बंडखोरांनी पुन्हा एकदा लाल समु्द्रात मालवाहू जहाजांवर हल्ला केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 9 जुलै रोजी हुथी बंडखोरांनी लाल समुद्रात इटर्निटी सी नावाच्या जहाजावर हल्ला केला. यामध्ये ४ जणांचा मृत्यू झाला असून ११ क्रू मेंमबर्स अद्यापही बेपत्ता आहेत. याच हल्ल्याच्या दोन दिवस आधीच ६ जुलै रोजी देखील हुथी बंडखोरांनी लायबेरियाच्या मालवाहू जहाजावर हल्ला केला होता.
सध्या या हल्ल्यामुळे पश्चिम आशियाई देशांमध्ये युद्धाचा भडका उडण्याची शक्यता आहे. गेल्या काही काळापासून हुथी बंडखोर लाल समुद्रात मालवाहू जहाजांना लक्ष्य करत आहे. इस्रायलविरोधी ही कारवाई करण्यात येत असून, गेल्या आठवड्यात हुथींनी इस्रायल बंदराकडे जाणाऱ्या मालवाहू जहाजांवर आणि विमानांवर हल्लाची घोषणा केली होती. गाझातील इस्रायलच्या कारवाईला विरोध करण्यासाठी म्हणून हुथींनी इस्रायलविरोधी बंड पुकारले आहे.
६ जुलै आणि ९ जुलै रोजी झालेल्या हल्ल्यामुळे लाला समुद्रातील जहाजांना हुथींना एक संदेश जारी करावा लागत आहे. क्रू मेंबर्सला आपली धार्मिक ओळख पटवून द्यावी लागत आहे. जहाजांच्या ट्रकिंग प्रोफाईलवर एक संदेश जारी केला जात आहे. यामध्ये, जहाजांवरील सर्व क्रू मेंबर्स मुस्लिम आहे, यामुळे कोणत्याही प्रकारचा हल्ला करु नये.
तसेच या जहाजाचा इस्रायलशी कोणताही संबंध नसल्याचेही संदेशात सांगण्यात येत आहे. जहाजांवरील लोकांनी सुरक्षितपणे जाऊ देण्याची विनंती हुथी विद्रोह्यांकडे केली जात आहे. हुथीं बंडखोर लाल समुद्रातील इस्रायलशी संबंधित जहाजांना लक्ष्य करत आहे. यामुळे अनेक जहाजे इस्रायलशी कोणताही प्रकारचा संबंध नसल्याचे दाखवत आहे. यामुळे हुथी बंडखोर हल्ला करणार नाही असे म्हटले जात आहे.
सध्या लाल समुद्रात हुथींच्या हल्ल्यांचा धोका वाढत आहे. यामुळे जागतिक व्यापारी जहाजांसाठी भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. लाल समुद्रातून दरवर्षी १ ट्रिलियन डॉलरचे व्यापारी मालवाहू जहाज जातात. हे जगाच्चा एकूण समुद्री व्यापाराच्या १५% आहे. भारत, युरोप, आणि अरब देशांसाठी हा समुद्री मार्ग अत्यंत महत्त्वाचा आहे.
हा मार्ग बंद झाल्यास वाहतूक खर्चात पाच पटीने वाढ होण्याची शक्यता आहे. याला पर्यायी मार्ग म्हणून आफ्रिकेच्या दश्रिण टोकावरील ‘केप ऑफ गुड होप’ मार्ग आहे. परंतु यामुळे इंधन खर्च आणि वेळ दोन्ही प्रचंड प्रमाणात वाढेल. सध्या इस्रायलने हुथींना रोखण्यासाठी ऑपरेशन ब्लॅक प्लॅग सुरु केले आहे. यामुळे हुथी आणि इस्रायलमध्ये मोठ्या संघर्षाची शक्यता तज्ञांनी व्यक्त केली आहे.