रोम : पृथ्वीवर अशा अनेक गोष्टी आहेत, ज्यांचा शोध मानवाला आश्चर्यचकित करत आहे. अनेक अशा रहस्यमयी गोष्टींचा उलगडा होत आहे, ज्याची मानवाने कल्पना देखील केली नसेल. दरम्यान इटलीमध्ये पुरातत्व संशोधकांना आणखी एक महत्वपूर्ण शोध लागला आहे. इटलीत दोन हजार वर्षापूर्वी एक शहर समुद्राने गिळंकृत केले होते. हे इटलीचे ऐतिहासिक शहर होते. आता ऐनारिया नावाचे हे शहर पुन्हा एकदा जगासमोर येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, इ. स. पूर्व 180 मध्ये क्रेटिओ ज्वालामुखीचा उद्रेक झाला होता. या ज्वामुखीच्या उद्रेकामुळे हे शहर समुद्रात बुडाले होते. दरम्यान या शहराचा इस्चिया बेटाजवळील कार्टारोमाना उपसारगात स्थित एका प्राचीन रोमन बंदर नगरीचा भाग होता. आता हा पुरातत्व उत्खननाचा भाग जलपर्यटनाच्या माध्यमातून पाहता येतो.
बीबीसीने दिलेल्या वृत्तानुसार, या शहराचे अवशेष आता पाण्याखालून पाहत येणार आहेत. पर्यटक काचेच्या तळाच्या नावेतून किंना स्नार्कलिंगद्वारे हे पाहू शकणार आहेत. प्राचीन घाट, रोमन स्थापत्यकला, कलाकृती, आणि समुद्रतळाशी असलेली इमारत काचेच्या बोटीतून पाहता येणार आहे. विशेष करुन इतिहासप्रेमी लोकांसाठी ही ठिकाण साहसी आणि आकर्षक अनुभव ठरत आहे.
१९७० च्या दशकात या शहराच्या काही अवशेष गोताखोरांना सापडले होते. यामध्ये किनाऱ्यावर मातीची भांडी आणि पिंड सापडले होते. २०११ मध्ये अधिक पुरावे शोधले गेले. यामध्ये रोमन घाट, मोजेतक, अम्फोरा, जुनी नाणी आणि लाकडी जहाजे सापडली. यातून अनेक भूमध्यसागरी व्यापार झाले असल्याचे पुरावे देखील सापडले. यामुळे येथे खऱ्या अर्थाने आर्थिक आणि ऐतिहासिक संशोधनाला चालना मिळाली. सध्या या शोधांवरुन रोमन लष्करी मोहिमांमध्ये ऐनारियाची भूमिका असल्याचे पुरावे मिळाले आहेत.
बीबीसीने दिलेल्या अहवालानुसार, हे शहर ग्रीस वसाहतींसाठी प्रसिद्ध होते. त्यानंतर रोमन साम्राज्यात या बेटाला सामील करण्यात आले आणि ऐनारिया असे नाव ठेवण्यात आले. परंतु या ठिकाणी रोमन शहराच्या अस्तित्वाबद्दल शंका व्यक्त केली जात होती. संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार, कोणत्याही रोमन लेखनात या शहराचा उल्लेख नव्हता. केवळ ज्वालामुखीच्या राखेखाली एक दबलेले शहर म्हणून याचा उल्लेख मिळाला आहे.
पुरातत्व शास्त्रज्ञ डॉ. अलेस्सांद्रा बेनिनी यांनी म्हटले की, ऐनारिया केवळ एक व्यापारी आणि रहिवासी केंद्र होते. सध्या येथील जलपर्यटनाद्वारे नवे शिकण्याची आणि पुरातत्व उत्खनन पाहण्याची संधी मिळणार आहे.तसेच ३डी व्हिडिओद्वारे देखील हे शहर पाहता येणार आहे.