How are the Popes appointed, what are their duties Learn about the highest office of Christianity
सध्या कॅथोलिक ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांची प्रकृती अजूनही गंभीर आहे. व्हॅटिकने दिलेल्या माहितीनुसार, पोप यांना दोन्ही फुफ्फुसांमध्ये न्यूमोनिया आणि श्वसनमार्गाच्या संसर्ग झाला होता. गेल्या एका आठवड्यापासून त्यांना रोमच्या गेमेली रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांची प्रकृती पुन्हा स्थिर झाल्याचेही सांगण्यात आले होते. मात्र, दम्याच्या झटक्यानंतर त्यांची प्रकृती पुन्हा ढासळली आहे.
युरोप खंडातील सर्वात लहान देशाचे प्रशासक
पण तुम्हाला माहिती आहे का रोमन कॅथलिक चर्चच्या सर्वोच्च धर्मगुरुची नियुक्ती कशी केली जाते. या पदाचे कर्तव्य आणि महत्त्व काय आहे? तर पोप हा रोमन कॅथोलिक चर्चचा सर्वोच्च धर्मगुरु आणि व्हेटिकन सिटीचा राष्ट्रप्रमुख असतो. युरोप खंडातील सर्वात लहान देशाचे पोप प्रशासक असतात पोप यांना “होली फादर” असेही संबोधले जाते.
कशी केली जाते निवड?
पोपची नियुक्ती करण्यासाठी 80 वर्षापेक्षा कमी वयाच्या कार्डिनल्सना मतदानाचा हक्क असतो. साधरणत: 115 कार्डिनल्स पोपच्या निवड प्रक्रियेचा भाग असतात. पोप पदावर निवडून येण्यासाठी एका उमेदवाराल दोन-तृतीयांश मते मिळणे आवश्यक असते, म्हणजे किमान 77 कार्डिनल्सचे मत मिळणेगरजेचे असते. ही निवड प्रक्रिया व्हेटिकन सिटीच्या स्टिस्टीन चॅपेलमध्ये आयोजित करण्यात येते. या निवडणुकीसाठी गुप्त पद्धतीने मतदान केले जाते.
यासाठी मतपत्रिकेचा वापर करण्यात येतो. मतदानाच्या प्रत्येक टप्प्यानंतर मतपत्रिका एका भट्टीत जाळल्या जातात आणि काळा धूर बाहेर आला, तर त्याचा अर्थ निवड प्रक्रिया सुरू आहे. मात्र, पांढरा धूर निघाला, तर याचा अर्थ नवीन पोपची निवड झाली आहे. निवडीनंतर नव्या पोपला आपले नाव निवडण्याचा अधिकार असतो. त्यानंतर पोप सेंट पीटर बॅसिलिकाच्या बाल्कनीतून उपस्थित जनतेला दर्शन देतो आणि आशीर्वाद देतो.
पोपची कर्तव्ये
पोप हे जगभरातील 1.2 अब्ज रोमन कॅथोलिक ख्रिस्ती धर्मीयांचे आध्यात्मिक नेते असतात. त्यांचे मुख्य कार्य चर्चच्या धोरणांचे पालन करणे, धर्मसंबंधित शिकवण देणे, आणि चर्चच्या काय्द्यांचे पालन सुनिश्चित करणे असते. पोप दर रविवारी व्हेटिकन श्रद्धालूंना संबोधित करतात आणि त्यांना आशीर्वाद देतात. तसेच, विविध देशांना भेट देभन आंतरराष्ट्रीय संबंध मजबूत करण्याचे काम करतात.
पोप होण्यासाठी पात्रता
कोणताही रोमन कॅथोलिक ख्रिस्ती असेल, तो पोप होऊ शकतो. पोपची निवड साधारणतः आयुष्यभरासाठी होते, परंतु काही पोप स्वतःहून राजीनामा देतात. उदा. पोप सेलेस्टीन पंचम आणि पोप बेनेडिक्ट यांनी स्वतःच्या इच्छेने पदाचा राजीनामा दिला होता. पोप हे केवळ धार्मिक नेते नसून, जागतिक पातळीवरील एक महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व असते, जे सामाजिक आणि धार्मिक क्षेत्रात प्रभाव टाकतात.