Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 2 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bangladesh Elections : बांगलादेशाच्या सत्तेची चावी कोणाकडे? ४७% मतदानांतर काऊंटडाऊन सुरु

Bangladesh Elections 2026 : बांगलादेशात संसदीय निवडणुकीसाठी मतदान पूर्ण झाले आहे. आता देशभरात मतमोजणीला सुरुवात झाली असून रात्री आठ वाजता निकाल जाहीर करण्यात येणार आहे. संपूर्ण जगाचे लक्ष निवडणुक निकालाकडे लागलेले आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Feb 12, 2026 | 05:19 PM
Bangladesh elections 2026

Bangladesh elections 2026

Follow Us
Follow Us:
  • बांगलादेशात संसदीय निवडणुकीसाठी मतदान पूर्ण
  • देशभरात मतमोजणीसाठी सुरुवात
  • आठ वाजता जाहीर होणार निकाल
Bangladesh Elections News in Marathi : ढाका : बांगलादेशात संसदीय निवडणुकीसाठी मतदान पूर्ण झाले आहे. देशभरात मतमोजणी सुरु करण्यात आली आहे. आज रात्री आठ वाजता निवडणुकीचे निकाल जाहीर करण्यात येतील. मिळालेल्या माहितीनुसार, देशभरात ३६,००० मतदान केंद्रांवर ४७.९१ टक्के मतदान झाले आहे. सध्या भारतासह संपूर्ण जगाचे लक्ष बांगलादेशच्या संसदीय निवडणुकीच्या निकालाकडे लागले आहे. भारत यावर बारकाईने लक्ष ठेवून आहे.

Bangladesh Elections : मतदानानंतर युनूस यांचे खळबळजनक वक्तव्य; शेख हसीनाला दिला ‘हा’ इशारा

BNP कडून निकाल लवकर घोषित करण्याची मागणी

याच वेळी बांगलादेशात BNP चे अध्यक्ष तारिक रहमान यांवी निवडणूक निकाल लवकरात लवकर जाहीर करण्याची मागमी केली आहे. तर दुसरीकडे जमात-ए-इस्लामीने निवडणुकीत गोंधळाचा आरोप करत कुमिल्ला-८, शरीयतपूर-२ आणि पटुआखली-१ मतदारसंघात मतदान पुढे ढकलण्याची मागणी केली आहे. बांगलादेश निवडणुक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, ४७.९१% मतदान झाले आहे. परंतु मीडिया रिपोर्टनुसार, अजूनही काही मतदान केंद्रांवर मतदार रांगेत उभे आहेत.

निवडणुकीदरम्यान हिंसाचार

निवडणुकांसाठी मतदान सुरु असताना मात्र अनेक ठिकाणी संघर्ष झाला आहे. बांगलादेश नॅशनल पार्टी (BNP)आणि जमात-ए-इस्लामीमध्ये खुलाना येथील मतदान केंद्रांवर चकामक झाली होती. BNP ने जमातवर मतांमध्ये हेराफेरी केल्याचा आरोप केला होता. या आरोपानंतर दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये चकामक झाली होती. ज्यामध्ये BNPचे नेते मोहबुझ्झमान कोची यांची मृत्यू झाला होता. याच वेळी दुसरकीडे बांगलादेशच्या मुन्शींगज-३ आणि गोपालगंज सदर भागातही मतदान केंद्रांबाहेर बॉम्ब स्फोट करण्यात आले होते. यामध्ये एक सुरक्षा अधिकारी आणि एक १४ वर्षांची चिमुलकी गंभीर जखमी झाली होती.

भारतासाठी निकाल का महत्वाचा? 

सध्या बांगलादेशच्या निवणुक निकालांकडे भारत बारकाईने लक्ष ठेवून आहे. बांगलादेशच्या निकालावर भारताची दक्षिण आशियाईतील पुढील धोरणे ठरणार आहे. देशात कट्टरपंथीयांची सत्ता आल्यास भारतासाठी सीमेवर मोठी आव्हाने निर्माण होण्याची शक्यता आहे. जमात-ए-इस्लामीचा विजय भारतासाठी धोक्याचा ठरु शकतो.

जमातचा पाकिस्तानकडे झुकाव आणि इस्लामिक विचारसणीमुळे भारताचा बांगलादेशातील प्रभाव कीम होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे भारताच्या अनुकूल पक्ष सत्तेत आल्यास भारताला बांगलादेशसोबत पुन्हा संबंध प्रस्थापित करण्यावर लक्ष्य केंद्रित करण्याची गरज आहे. तसेच तारिक रहमान सत्तेत आल्यास सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही परिणाम होण्याची शक्यता आहे. यामुळे भारत याकडे बारकाईने लक्ष ठेवून आहे.

Bangladesh Elections : बांगलादेशात सत्तेच्या संघर्षात पहिला बळी! BNP च्या नेत्याचा जमातशी संघर्षात मृत्यू, नेमकं काय घडलं?

💡

Frequently Asked Questions

  • Que: बांगलादेशात किती टक्के मतदान झाले आहे?

    Ans: बांगलादेश निवडणुक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, ४७.९१% मतदान झाले आहे.

  • Que: BNP चे नेते तारिक रहमान यांनी काय मागणी केली आहे?

    Ans: बांगलादेशात मतदान प्रक्रिया पूर्ण झाली असून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. याच पार्श्वभूमीवर BNP चे नेते तारिक रहमान यांनी निकाल लवकरात लवकर जाहीर करण्याची मागणी केली आहे.

Web Title: Bangladesh elections 2026 47 percent voting done who will form government

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 12, 2026 | 05:02 PM

Topics:  

  • Bangladesh
  • Muhammad Yunus
  • World news

संबंधित बातम्या

US Iran Negotiations : ५७,००० कोटींची मालमत्ता इराणला परत मिळणार? दोहामधील अमेरिका-इराण चर्चा यशस्वी
1

US Iran Negotiations : ५७,००० कोटींची मालमत्ता इराणला परत मिळणार? दोहामधील अमेरिका-इराण चर्चा यशस्वी

BrahMos:  UAEसोबतचा ब्रह्मोस करार भारताला जागतिक सामरिक पटलावर कसे बनवणार ‘किंगमेकर’? तज्ज्ञांचा मोठा खुलासा
2

BrahMos: UAEसोबतचा ब्रह्मोस करार भारताला जागतिक सामरिक पटलावर कसे बनवणार ‘किंगमेकर’? तज्ज्ञांचा मोठा खुलासा

Panama Canal: जगातील ‘या’ दोन महासत्ता पुन्हा भिडल्या; हजारो भारतीयांच्या बलिदानाची साक्ष देणारा पनामा कालवा बनला रणभूमी
3

Panama Canal: जगातील ‘या’ दोन महासत्ता पुन्हा भिडल्या; हजारो भारतीयांच्या बलिदानाची साक्ष देणारा पनामा कालवा बनला रणभूमी

Venezuela Red Sky : मोठ्या संकटाचा इशारा? भूकंपानंतर रक्तासारखे लाल झाले व्हेनेझुएलाचे आकाश; नागरिकांची उडाली झोप, नेमकं काय घडलं?
4

Venezuela Red Sky : मोठ्या संकटाचा इशारा? भूकंपानंतर रक्तासारखे लाल झाले व्हेनेझुएलाचे आकाश; नागरिकांची उडाली झोप, नेमकं काय घडलं?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.