
iran to execute protester earfan Soltani
मिळालेल्या माहितीनुसारस, ८ जानेवारी २०२६ रोजी आंदोलकांना ताब्यात घेण्याचे आदेश खामेनेई सरकारने दिले होते. यावेळी इराफा सोलतानी याला अटक करण्यात आली होती. दोन दिवसांतच त्याच्यावर खटला चालवला गेला आणि त्याला ११ जानेवारी २०२६ रोजी त्याला फाशी सुनावण्यात आली. या प्रकरणामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर खळबळ उडाली होती. जगभरातून मानवाधिकार संघटनांकडून इराणच्या या निर्णयाचा तीव्र निषेध केला होता.
इराणचा हा निर्णय मानवाधिकांंरांचे उल्लंघन करणारा असल्याचे म्हटले जात आहे. मानवाधिकार संघटनांनी दिलेल्या माहितीनुसार, सोलतानीला योग्य न्याय, वकील आणि निष्पक्ष सुनावणी मिळालेली नाही. त्याला आपली बाजू मांडण्याची संधीही देण्यात आले नसल्याचे मानवाधिकार संघटनांनी म्हटले आहे. त्याला कुटुंबाला फाशीपूर्वी केवळ १० मिनिटं भेटण्याची वेळ देण्यात आली आहे. सध्या या प्रकरणावर आंतरराष्ट्रीय स्तरावर तीव्र टीका केली जात आहे. हा अमानवीय आणि क्रूर हत्याकांड असल्याचे म्हटले जात आहे.
इरफान सोलतानीच्या या प्रकरणावर जागतिक पातळीवर तीव्र प्रतिक्रीया उमटत आहे. अमेरिका, युरोप, ब्रिटन, फ्रान्स या सर्व देशांतून इराणतच्या या क्रूर निर्णयाचा तीव्र विरोध केला जात आहे. अनेक मानवाधिकार संघटनांनीही याचा तीव्र निषेध केला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी देखील यावर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. जागतिक स्तरावर इराणमधील आंदोलकांच्या समर्थनार्थ रॅली काढल्या जात आहेत. सध्या इराणमध्ये मोठ्या प्रमाणात अस्थिरता निर्माण झाली आहे. इराणच्या या निर्णायमुळे असंतोष अधिक वाढण्याची शक्यता आहे.
इराणमधील उठावाचे पॅरीस कनेक्शन! कोण आहेत ‘Madam M’? ज्यांच्यामुळे उडाली खामेनी सरकारची झोप
Ans: इरफान सुल्तानी हा २६ वर्षीय तरुण असून त्याने इराणमधील खामेनेई सरकाविरोधातील आंदोलनात सहभाग घेतला आहे.
Ans: इराफन सुल्तानीवर इराणच्या न्यायालयाने मोहारेहेब म्हणजे अल्लाहविरुद्ध युद्ध पुकारल्याचा आरोप केला आहे.
Ans: या प्रकरणावर आंतरराष्ट्रीय स्तरावर ब्रिटन, फ्रान्स, युरोप, अमेरिकेतून तीव्र निषेध केला जात आहे. मानवाधिकार संघटनांनी देखील याला निषेध दर्शवला आहे.