Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

शेकडो अमेरिकन विद्यार्थ्यांना आले सेल्फ डिपोर्टचे आदेश; F-1 व्हिसा करण्यात आले रद्द, कारण काय?

अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या विभागाकडून शेकडो आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना एक धक्कादायक इ-मेल पाठवण्यात आले आहेत. यामध्ये विद्यार्थ्यांना 'सेल्फ-डिपोर्ट म्हणजेच स्व-निर्वासनाचे आदेश देण्यात आले आहेत.

  • By स्वराली शहा
Updated On: Mar 30, 2025 | 05:23 PM
Hundreds of American students were ordered to self-deport; F-1 visas were canceled

Hundreds of American students were ordered to self-deport; F-1 visas were canceled

Follow Us
Close
Follow Us:

वॉशिंग्टन: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी देशातून अवैध स्थलांतरितांना हाकलून लावण्यासाठी अध्यक्षपदाची सुत्रे हाती घेताच आदेश जारी केले . यानंतर त्वरित अवैध नागरिकांवर कारवाई करण्यात आली. याअंतर्गत अनेक विद्यार्थ्यांवरही कारवाई होत आहे. दरम्यान अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या विभागाकडून शेकडो आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना एक धक्कादायक इ-मेल पाठवण्यात आले आहेत. यामध्ये विद्यार्थ्यांना ‘सेल्फ-डिपोर्ट म्हणजेच स्व-निर्वासनाचे आदेश देण्यात आले आहेत. यामुळे अनेक विद्यार्थी आणि त्यांच्या कुटुंबीयांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही कारवाई विशेष करुन कॅम्पसमधील देशविरोधी किंवा संस्थाविरोधी आंदोलनात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांवर करण्यात आले आहे. केवळ निषेधांमध्येच सहभागी झालेले नव्हे तर सोशल मीडियावहर राजकीय पोस्ट करणाऱ्या लाईक करणाऱ्या किंवा त्यावर टीका करणाऱ्या विद्यार्थ्यांवरही कारवाई केली जात आहे. या विद्यार्थ्यांचा F-1 व्हिसा रद्द करण्यात आला आहे.

काय आहे F-1 व्हिसा ?

F-1 व्हिसा हा एक नॉन-इमिग्रंट (अस्थायी) व्हिसा आहे. हा व्हिसा आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना अमेरिकेत उच्च शिक्षण घेण्यासाठी देण्यात येतो. या व्हिसासाठी विद्यार्थ्यांना मान्यता प्राप्त संस्थेत पूर्णवेळ शिक्षण घ्यावे लागते. विद्यार्थ्यांकडे शिक्षम व खर्च भागवण्यासाठी पुरेसे आर्थिक संसाधने असावी लागतात.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- बांगलादेशमधील आंदोलक तरुणींना मिळणार आंतरराष्ट्रीय साहस पुरस्कार; अमेरिकेची मोठी घोषणा

व्हिसा रद्द करण्याचे नेमकं कारण काय?

अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे मंत्री मार्को रुबियो यांनी अनेक विद्यार्थ्यांचे व्हिसा रद्द करण्याचे आदेश दिले आहे. मार्क रुबियो यांनी म्हटले आहे की, काही विद्यार्थ्यांनी अमेरिकेतली विविध राजकीय घडामोडींवर सोशल मीडियावर टीका केली होती, यामध्ये पोस्ट शेअर करणे, लाईक करणे किंवा टीप्पणी करण अशा प्रकरणांमध्ये या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. तसेच काही विद्यार्थ्यांनी विरोधी आंदोलनांमध्ये सहभाग घेतला होता. अमेरिकेच्या सरकारने याला राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने गंभीर म्हटले आहे. यामुळे संबंधित विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात येते आहे.

विद्यार्थ्यांना मिळालेला ई-मेल

विद्यार्थ्यांना मिळालेल्या ई-मेलमध्ये परराष्ट्र विभागाने स्पष्ट केले आहे की, F-1 व्हिसा अमेरिकेच्या इमिग्रेशन आणि नॅशनॅलिटी कायद्याच्या कलम 221 (i) अंतर्गत करण्यात आला आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना सुचित करण्यात आले आहे की, त्यांनी स्वत:हून वेळेत देश सोडला नाही, तर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल. त्यांना ताब्यात घेऊन जबरदस्तीने देशाबाहेर पाठवले जाईल.

विद्यार्थ्यांची प्रतिक्रिया

अनेक विद्यार्थ्यांनी सोशल मीडियावर या ई-मेलनंतर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. काहींनी केवळ राजकीय मीम्स किंवा पोस्ट शेअर केल्या आहेत, यामुळे याचा परिणाम व्हिसा रद्द करणे का? असा प्रश्न अनेकांनी विचारला आहे.हा निर्णय कठोर असल्याचे अनेकांनी म्हटले आहे.

अमेरिका आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाचे एक मोठे केंद्र आहे. मात्र, अमेरिकेच्या ट्रम्प प्रशासनाच्या या कारवाईमुळे अनेक विद्यार्थ्यांच्या भविष्याबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- नेपाळमध्ये राजेशाही समर्थनार्थ हिंसक निदर्शने; माजी राजा ज्ञानेंद्र शाह यांना लाखोंचा दंड

Web Title: Hundreds of american students were ordered to self deport f 1 visas were canceled what is the reason

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 30, 2025 | 05:23 PM

Topics:  

  • America
  • Donald Trump
  • Illegal immigration

संबंधित बातम्या

Trump Threatens Iran: अमेरिका हल्ला करण्यास तयार! ट्रम्प यांची ‘ती’ पोस्ट आणि इराणमधील झाला आंदोलनाचा भडका
1

Trump Threatens Iran: अमेरिका हल्ला करण्यास तयार! ट्रम्प यांची ‘ती’ पोस्ट आणि इराणमधील झाला आंदोलनाचा भडका

धर्म बदलून घेतली होती कुराणवर शपथ; Joharan Mamdani पूर्वी ‘या’ नेत्याने रचला इतिहास
2

धर्म बदलून घेतली होती कुराणवर शपथ; Joharan Mamdani पूर्वी ‘या’ नेत्याने रचला इतिहास

India Diplomacy : पाकिस्तानची उलटी गिनती सुरू! ट्रम्प आता भारताच्या प्रेमात; 2026 मध्ये बदलणार जगाचा नकाशा
3

India Diplomacy : पाकिस्तानची उलटी गिनती सुरू! ट्रम्प आता भारताच्या प्रेमात; 2026 मध्ये बदलणार जगाचा नकाशा

Trump Travel Ban : जशास तसे उत्तर! अमेरिकेच्या ‘ट्रॅव्हल बॅन’ला भीक न घालता ‘या’ दोन देशांनीही घातली US citizensवर बंदी
4

Trump Travel Ban : जशास तसे उत्तर! अमेरिकेच्या ‘ट्रॅव्हल बॅन’ला भीक न घालता ‘या’ दोन देशांनीही घातली US citizensवर बंदी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.