बांगलादेशमधील आंदोलक तरुणींना मिळणार आंतरराष्ट्रीय साहस पुरस्कार; अमेरिकेची मोठी घोषणा (फोटो सौजन्य: सोशल मीडिया )
ढाका: व्हाईट हाउसने दिलेल्या माहितीनुसार, 2025 चा आंतरराष्ट्रीय साहसी महिला (IWOC) पुरस्कार बांगलादेशातील महिला आणि विद्यार्थ्यांना प्रदान करण्यात येणार आहे. हा पुरस्कार ‘मॅडेलीन अल-ब्राईट मानद समूह पुरस्कार म्हणून ओळखला जातो. जगभरातील धाडसी महिलांना हा पुरस्कार देण्यात येतो. गेल्या वर्षी बांगलादेशात शेख हसीनांच्या विरोधात झालेल्या आंदोलनात मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांचा सहभाग होता.
यामध्ये महिला आणि विद्यार्थीनींनीही सहभाग घेतला होता. त्यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. यामुळे या महिलांच्या धैर्य आणि संघर्षाच्या समर्थनार्थ अमेरिकेने महिला कार्यकर्त्यांना IWOC पुरस्कार देण्याची घोषणा केली आहे.
Congratulations! @StateDept has announced the recipients of the 2025 International Women of Courage (#IWOC) Award. Honoring fearless women worldwide, we are proud and delighted that the brave women of Bangladesh’s July-August 2024 student movement have received the Madeleine… pic.twitter.com/aNs2kw8XH8
— Amb. Mushfiqul Fazal (Ansarey) (@MushfiqulFazal) March 29, 2025
अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, पुरुष विद्यार्थी कार्यकर्त्यांना अटक करण्यात आल्यानंतर महिलांनी आंदोलनाची जबाबदारी स्वीकारली होती. प्रशानाच्या सेंसरशिप आणि इंटरनेट बंदीला विरोधत करत महिलांनी नवीन मार्ग शोधले आणि आंदोलन सुरु ठेवले. हे या महिलांचे शौर्य आणि निस्वार्थीपणा काम करणे साहसाचे प्रतीक आहे.
तसेच बांगलादेशच्या महिलांसह हा IWOC पुरस्कार बुर्किना फासो, इस्त्रायल, पापुआ न्यू गिनी, फिलिपाइन्स, रोमानिया, दक्षिम सुदान, श्रीलंका आणि येमेन येथील महिलांनाही देण्यात येणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या वर्षी 1 एप्रिल 2025 रोजी अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयात हा पुरस्कार सोहळा होणार आहे. यासाठी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो आणि प्रथम महिला मेलानिया ट्रम्पही उपस्थिती राहणार आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, 2007 मध्ये आंतरराष्ट्रीय साहसी महिला (IWOC) पुरस्काराची स्थापना करण्यात आली. आतापर्यंत90 हून अधिक देशांतील 200 पेक्षा जास्त महिलांना त्यांच्या धाडसासाठी, नेतृत्वगपणांसाठी या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. या महिलांनी सामाजिक अन्याय, अत्याचार आणि अन्य अडचणींना सामोरे जात आपल्या कार्याने समाजात परिवर्तन घडवून आणले आहे. अमेरिकेच्या या पुरस्कारामुळे बांगलादेशी महिला कार्यकर्त्यांचे धैर्य आणि संघर्ष जागतिक पातळीवर अधोरेखित होते.