Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘मी लवकरच परत येईन’; शेख हसीना यांचा बांगलादेशच्या मोहम्मद युनूस सरकारला इशारा

बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी (17 फेब्रुवारी) एका सार्वजनिक कार्यक्रमात मोहम्मद यूनुस यांच्या नेतृत्त्वात असलेल्या अंतरिम सरकारवर तीव्र टिका केली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Feb 18, 2025 | 12:55 PM
I'll Come back Soon, Shaikh Hasina warns Bangladesh Muhummad Yunus Government

I'll Come back Soon, Shaikh Hasina warns Bangladesh Muhummad Yunus Government

Follow Us
Close
Follow Us:

ढाका: सध्या बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या देश सोडून जाण्यानंतर देशात हिंसाचार सुरुच होता. यामुळे हसीना यांनी (17 फेब्रुवारी) एका सार्वजनिक कार्यक्रमात मोहम्मद यूनुस यांच्या नेतृत्त्वात असलेल्या अंतरिम सरकारवर तीव्र टिका केली आहे. त्यांनी म्हटले की, त्या बांगलादेशात लवकरच परत येतील आणि बांगलादेशातील पीडित कुटूंबीयांना न्याय मिळवून देतील.

तसेच, “मी प्रत्येक पीडित कुटुंबाला मदत करेन आणि त्यांच्या हत्याऱ्यांना कायद्याचा सामना करायला लावेन. मला वाटते की अल्लाहने मला याच उद्देशासाठी जिवंत ठेवले आहे.” असे त्यांनी म्हटले.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या-  Toronto Plane Crash: कॅनडात मोठी दुर्घटना; टोरंटो विमानतळावर लॅंडिंगदरम्यान विमान उलटलं अन्…, VIDEO

आंदोलनातील लोकांचा मृत्यू पोलिसांमुळे झालेला नाही 

शेख हसीना पदावर असताना जुलै-ऑगस्चमध्ये मोठ्या प्रमाणात विद्यार्थी आंदोलन झाले. या आंदोलनात मोठ्या प्रमाणात हिंसाचार घडला. यावर भाष्य करताना त्यांनी म्हटले की, आंदोलनातील अनेक लोक पोलिसांच्या गोळीबारात मरण पावलेले नाहीत. हसीना यांनी दावा केला आहे की, जर आता पोस्टमार्टम केले गेले, तर हे सिद्ध होईल की मृत्यू पोलिसांच्या गोळीबारामुळे नव्हता.

त्यांनी पोलिस अधिकाऱ्यांची बाजू घेतली आणि म्हटले की, “पोलिसांनी फार संयम दाखवला. त्यांच्यावर हल्ला झाल्यावरच त्यांनी कारवाई केली.” अबू सईद प्रकरणाचा संदर्भ देताना त्या म्हणाल्या की, पोलिसांवर हल्ला झाल्यावरच त्यांनी कृती केली. हसीना यांनी पोलिसांच्या संयमाचे समर्थन करत, पोलिसांच्या हत्यांना एक पूर्वनियोजित कट असल्याचे म्हटले.

मोहम्मद युनूस सरकारवर आरोप

शेख हसीना यांनी मोहम्मद यूनुस यांच्या नेतृत्त्वात असलेले अंतरिम सरकार देश चालविण्यास अयोग्य असल्याचे म्हटले. त्यांनी आरोप केला की, “यूनुस यांनी स्वतः मान्य केले आहे की त्यांना देश चालवता येत नाही. तरीही ते सत्तेवर आहेत. सरकारी अधिकाऱ्यांवर होणारे हल्ले त्यांच्या अक्षमतेचे उदाहरण आहे.”

त्यांनी युनुस यांच्यावर ढाका येथील पूर्वजांच्या घराला जाळण्याचा कट रचल्याचा आरोप केला. त्या म्हणाल्या, “बंगबंधूचे घर जाळण्यात आले. मी ते घर लोकांना देऊ केले होते, पण तेही नष्ट करण्यात आले. हे त्यांचे षडयंत्र होते.”

बांगलादेशला दहशतवादी राष्ट्र बनवले

हसीना यांनी, यूनुस सरकारने बांगलादेशला दहशतवादी राज्यात बदलले आणि मानवाधिकारांचे उल्लंघन केले असल्याचे म्हटले आहे. त्यांना एक दिवस कायद्याचा सामना करावा लागेल, असेही त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले. त्यांनी सरकारच्या आर्थिक आणि सुरक्षाविषयक धोरणांवरही तीव्र टीका केली. बांगलादेश अर्थव्यवस्था अडचणीत आहे, कायदा-सुव्यवस्था ढासळत आहे आणि सार्वजनिक सुरक्षा धोक्यात आली आहे, तसेच सहा महिन्यांपासून हिंसाचार सुरुच असल्याचे त्यांनी म्हटले.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- ‘Father Of Nutella’ फ्रान्सेस्को रिवेला यांचे निधन; वयाच्या 97 वर्षी घेतला अखेरचा श्वास

Web Title: I will come back soon shaikh hasina warns bangladesh muhummad yunus government

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 18, 2025 | 12:23 PM

Topics:  

  • Bangladesh
  • Muhammad Yunus
  • shaikh hasina

संबंधित बातम्या

ढाकाच्या रुग्णालयात हसीनाच्या मंत्र्याने घेतला शेवटचा श्वास, मेल्यानंतरही युनूसच्या पोलिसांनी ठेवल्या हातात बेड्या; Photo Viral
1

ढाकाच्या रुग्णालयात हसीनाच्या मंत्र्याने घेतला शेवटचा श्वास, मेल्यानंतरही युनूसच्या पोलिसांनी ठेवल्या हातात बेड्या; Photo Viral

Bangladesh Eelection : बांगलादेशच्या निवडणुकीवर दुनियेचा डोळा; EU आणि ब्रिटन करणार आंतरराष्ट्रीय निरीक्षण
2

Bangladesh Eelection : बांगलादेशच्या निवडणुकीवर दुनियेचा डोळा; EU आणि ब्रिटन करणार आंतरराष्ट्रीय निरीक्षण

बांगलादेशात पुन्हा हिंसाचार! आदिवासी विद्यार्थिनीवरील अत्याचारानंतर तीव्र संघर्ष; 3 ठार, अनेक जखमी
3

बांगलादेशात पुन्हा हिंसाचार! आदिवासी विद्यार्थिनीवरील अत्याचारानंतर तीव्र संघर्ष; 3 ठार, अनेक जखमी

‘ते आम्हाला तालिबानसारखे दाखवत आहेत’ ; मोहम्मद युनूस यांचे भारतावर गंभीर आरोप
4

‘ते आम्हाला तालिबानसारखे दाखवत आहेत’ ; मोहम्मद युनूस यांचे भारतावर गंभीर आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.