
Ian-Iraq border security deal endangering America Donald Trump's in concerns
इराणने दिलेल्या माहितीनुसार, बगदादमध्ये हा करार करण्यात आला. यावेळी इराकचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार कासिम अल अराजी आणि इराणच्या सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे महासचिव अली लारिजानी यासाठी उपस्थित होते. तसेच इराकचे पंतप्रधान मोहम्मद शिया अल सुदानीही यावेळी उपस्थित होते. या करारांतर्गत दोन्ही देशांनी १,४०० किमी लांबीच्या संयुक्त सीमारेषेच्या सुरक्षा मजबूत करणे आहे.
अमेरिकेला झटका! टॅरिफमुळे भारत-चीन आले एकत्र; दोन्ही देशांत थेट विमान सेवा लवकरच सुरु
बीबीसीने दिलेल्या वृत्तानुसार, मार्च २०२३ मध्ये झालेल्या कारावर हा करार आधारित आहे. मार्च २०२३ मध्ये इराण आणि इराकने सीमासुरक्षा अधिक कडक करण्यावर करार केला होता. पंरुत महसा अमिनी यांच्या मृत्यूमुळे इराणमध्ये मोठे आंदोलन सुरु होता. यामुळे तणाव वाढला होता. इराणी कुर्द आणि इराकी कुर्द सरकारने त्यांच्या देशातील दहशतवाद्यांना शस्त्र सोडून जाण्यास भाग पाडले. परंत इराणमध्ये आयआरजीसीविरोधात गुरिल्ला युद्ध सुरुच होते. यामुळे तणाव अधिक वाढत गेला.
सध्या इराण आणि इस्रायलमध्ये तणावपूर्ण वातावरण अद्यापही आहे. इराणला भीती आहे की अमेकिा आणि इस्रायलशी वाढता तणावामुळे कुर्द सैनिक पुन्हा सीमापार हल्ला करु शकतात. यामुळे इराणने इराकसोबत सीमा सुरक्षा करार केला आहे.
अमेरिका का आहे नाराज?
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी यावर नाराजी व्यक्त केली आहे. या करारामुळे इराणचा इराकमध्ये प्रभाव वाढेल असे अमेरिकेने म्हटले आहे.यामुळे इराण समर्थित मिलिशिया, कताइब, हिजबुल्लाह या संघटनांचा इराकमध्ये प्रभाव वाढेल, जे अमेरिकेला नको आहे. या संघटना भविष्यात अमेरिका आणि इस्रायलवर हल्ला करु शकतात अशी भीती अमेरिकेला आहे. यामुळे या संघटनांना संपवण्याची इच्छा अमेरिकेला आहे. यामुळे इराक आणि इराणमधील सीमा सुरक्षा करार हा अमेरिकेसाठी धोक्याचा ठरत आहेत.
पुतिनचा पारा चढला! अलास्का बैठकीपूर्वी ट्रम्प यांनी दिली मोठी चेतावणी; म्हणाले…