पुतिनचा पारा चढला! अलास्का बैठकीपूर्वी ट्रम्प यांनी दिली मोठी चेतावणी; म्हणाले... (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
गेल्या अनेक महिन्यांपासून युद्धबंदीवर प्रयत्न सुरु आहे, परंतु सर्व अपयशी ठरले आहे. यामुळे उद्याच्या ट्रम्प आणि पुतिन यांच्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ही बैठक रशियासाठी अत्यंत मानली जात आहे. शिवाय या बैठकीमध्ये युक्रेनचा सहभाग नसणार आहे. पण अलास्का बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतिन यांना कडक इशारा दिला आहे. यामुळे पुतिन यांचा पारा चढण्याची शक्यता आहे.
ट्रम्प यांनी, रशियाला धमकी दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, युक्रेनसोबतच्या शांतता चर्चेत अडथळा आणण्याचा प्रयत्न केला तर त्यांना याचे गंभीर परिणा भोगावे लागतील. पत्रकारांशी बोलताना ट्रम्प यांनी स्पष्ट सांगितले की, उद्याच्या पुतिन यांच्यासोबतच्या बैठकीत जर युद्धावर कोणताही ठोस निकाल न लागल्यास रशियाविरोधात कडक पावले उचलण्यात येतील. त्यांच्यावर कडक निर्बंध लादले जातील असे ट्रम्प यांनी म्हटले. काल जर्मीनमध्ये एक व्हर्च्युअल उच्चस्तरीलय बैठक पार पडली. युरोपिय युनियन, युक्रेन आणि ट्रम्प यांच्यात ही बैठक झाली. यानंतर ट्रम्प यांनी पुतिन यांना हा इशारा दिला.
याच ट्रम्प यांनी माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्यावरही निशाणा साधत, रशिया युक्रेन युद्धासाठी त्यांना जबाबादार धरले आहे. ट्रम्प यांनी स्वत:चे गुणगाण करत मी राष्ट्राध्यक्ष असतो तर संघर्ष कधीच सुरु होऊ दिला नसता असे त्यांनी म्हटले आहे. परंतु बाडेनमुळे त्यांना आता सगळा पसारा आवरावा लागत आहे, असे ट्रम्प म्हणाले.
या देशातील युद्धबंदीचा उल्लेख
शिवाय डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तान, इस्रायल आणि इराण, आर्मेनिया आणि अझरबैजानमधील, थायलंड आणि कंबोडिया, मधील युद्ध संपवल्याचा उल्लेख केला.
अमेरिकेला झटका! टॅरिफमुळे भारत-चीन आले एकत्र; दोन्ही देशांत थेट विमान सेवा लवकरच सुरु






