If India's Akashtir where in Russia's weapon fleet it would have been defeated Ukraine
मॉस्को: नुकतेच युक्रेनने रशियाच्या दोन महत्त्वपूर्ण लष्करी तळांवर ड्रोन हल्ला केला. यामध्ये रशियाची 40 लढाऊ विमाने नष्ट झाल्याचा दावा युक्रेनने केला आहे. रशियाच्या एस-४०० या प्रणालीला देखील युक्रेनने चकवा देत रशियाच्या लष्करी तळांना उद्ध्वस्त केले आहे. गेल्या दीड वर्षांपासून हल्ल्याची योजना युक्रेनध्ये आखली जात असल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान तज्ज्ञांनी एस-४०० प्रणालीमुळे भारताने पाकिस्तानचे सर्व हल्ले हाणून पाडले होते, मग रशियन सैन्य यामध्ये अयशस्वी कसे झाले.
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानसोबत झालेल्या लष्कतरी संघर्षादरम्यान भारताने रशियाच्या एस-४०० प्रणालीने पाकिस्तानचे सर्व हल्ले हाणून पाडले. पण भारत केवळ या प्रणालीवर अवलंबून नव्हता. तर भारताचे स्वदेशी आकाश हवाई प्रणाली देखील यावेळी पाकिस्तानविरोधात उपयोगी पडली. सध्या रशियाला भारताच्या या स्वदेशी हवाई प्रणालीचे महत्त्व समजले असेल. रशियाकडेही भारताची ‘आकाशतीर’ प्रणाली असती तर युक्रेनच्या प्रत्येक हल्ल्याला हाणून पाडण्यात रशिया यशस्वी झाला असता.
भारताच्या या आकाश प्रणालीचे पूर्णनाव ‘आकाशतीर’ आहे. ही भारताची स्वदेशी हवाई संरक्षण प्रणाली आहे. पाकिस्तानसोबतच्या युद्धात या प्रणालीची ताकद संपूर्ण जगाला झाली आहे. पाकिस्तानने तुर्की बनावटीचे रक्तार टीबी-२ ड्रोनने आणि चिनच्या पीएल-१५ ने भारतावर हल्ला केला होता. मात्र भारताने रशियाच्या एस-४०० आणि ‘आकाशतीर’च्या मदतीने पाकिस्तानचे प्रत्येक हल्ले हाणून पाडले. पाकिस्तानला गुडघे टेकण्यास मजबुर केले.
सध्या रशियाकडे त्यांची स्वदेशी एस-४०० प्रणाली आहे. पण रशियाकडे भारताचे घातक ‘आकाशतीर’ असते तर युक्रेनचे ड्रोन एका झटक्यात नष्ट झाले असते. युक्रेननेही पाकिस्तानप्रमाणे रशियापुढे गुडघे टेकले असते.
युक्रेनविरुद्धच्या युद्धात रशियाला निन्म-स्तरीय आणि घातक हवाई प्रणालीची आवश्यकता होती. यामध्ये भारताचे आकाशतीर रशियाच्या कामी आले असते असे तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे.
‘आकाशतीर’ ही भारताच्या इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, डीआरडीओ आणि इस्रोने संयुक्तपणे विकसित केली आहे. या प्रणालीमध्ये रजार, सेन्सर्स आणि कम्युनिकेशन सिस्टीम आहे. यामुळे भारताचे आकाशतीर हे लढाऊ विमाने रिअल-टाइममध्ये हवाई धोके शोधण्यास सक्षम आहे. यामुळे ‘आकाशतीर’ च्या मदतीने भारताला प्रत्येक हल्ले वेळेत हाणून पाडता येतता. ऑपरेशन सिंदूरमध्ये ‘आकाशतीर’मुळे ४००हून अधिक ड्रोन, कामिकाझे ड्रोन आणि लपलेले शस्त्र हाणून पाडण्यात यश आले.