India, Saudi Arabia sign Hajj agreement for 2025 1.75 lakh pilgrims can go for Hajj
नवी दिल्ली: सध्या केद्रींय अल्पसंख्यांक मंत्री सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर असून भारताने हज यात्रेसाठी करार केला आहे. मिळालेलल्या माहितीनुसार, यावर्षी 1,75,025 भारतीय हज यात्रेकरूंना परवानगी देण्यात आली आहे. अल्पसंख्यांक कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी जेद्दा येथे सऊदी अरबचे हज आणि उमरा मंत्री तौफीक बिन फौजान अल-रबिया यांच्यासोबत या महत्त्वाच्या करारावर स्वाक्षरी केली. दरवर्षी सौदी अरेबियाकडून देशभरातील लोकांसाठी हज कोटा निश्चत केला जातो, त्यापैकी एक भारत देश आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- नायजेरियात 40 शेतकऱ्यांची अमानुष हत्या; ‘या’ दहशतवाद्यांनी केला कहर
Haj Agreement 2025 signed with H.E. Tawfiq Bin Fawzan Al-Rabiah, Minister for Hajj and Umrah of Kindom of Saudi Arabia. Finalized a quota of 1,75,025 pilgrims from India for #Haj2025 🕋 We are committed to provide best possible services to all our Haj Pilgrims. pic.twitter.com/YdzxEdZLjJ
— Kiren Rijiju (@KirenRijiju) January 13, 2025
या करारानुसार, 70% भारतीय यात्रेकरू हज समितीच्या माध्यमातून, तर उर्वरित 30% खासगी टूर ऑपरेटरद्वारे हज यात्रेला जाऊ शकतील. अल्पसंख्याक कार्यमंत्र्यांनी म्हटले आहे की, “भारतीय हज यात्रेकरूंना उत्कृष्ट सुविधा देण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. हा करार त्यांचा प्रवास अधिक सुलभ आणि आनंददायी करेल.” याशिवाय,हज 2025 कराराच्या निमित्ताने दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांनी महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा केली. यात्रेकरूंच्या सोयीसाठी नवीन उपाययोजना करण्यात येत आहेत. यामुळे भारत आणि सऊदी अरेबियामधील धार्मिक आणि सामाजिक सहकार्य अधिक दृढ होईल.
I welcome this agreement, which is wonderful news for Hajj pilgrims from India. Our Government is committed to ensuring improved pilgrimage experiences for devotees. https://t.co/oybHXdyBpK
— Narendra Modi (@narendramodi) January 13, 2025
काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या कराराचे स्वागत केले आहे. त्यांनी आपल्या सोशल मीडियावरील पोस्टमध्ये नमूद केले आहे की, “हा करार भारतीय हज यात्रेकरुंसाठी आनंदाची बातमी देणार आहे. तसेच आमचे सरकार त्यांच्या प्रवासाचा अनुभव सर्वोत्तम करण्यासाठी कटिबद्ध आहे.” मोदींनी सऊदी अरेबियाचे आभार मानले आणि या सहकार्यामुळे भारताच्या तीर्थयात्रेकरूंना फायदा होईल, असे नमूद केले.
हज यात्रेच्या कोट्याबाबत 2024 प्रमाणेच 2025 साठीही समान संख्या राखण्यात आली आहे. दरवर्षी लाखो भारतीय मुस्लिम भाविक हज यात्रेसाठी सऊदी अरेबियाला जातात. यावर्षीच्या करारामुळे यात्रेचा अनुभव अधिक सुव्यवस्थित होईल. हा करार फक्त धार्मिक प्रवासापुरता मर्यादित नसून, भारत आणि सऊदी अरेबियामधील सांस्कृतिक, सामाजिक आणि आर्थिक संबंध वाढवण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावेल. भारत सरकारचा हा प्रयत्न देशातील हज यात्रेकरूंसाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.