नायजेरियात 40 शेतकऱ्यांची अमानुष हत्या; 'या' दहशतवाद्यांनी केला कहर(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
अबूजा: एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ईशान्य नायजेरियातील बोर्नो शहरात इस्लामिक दहशतवाद्यांनी ताबडतोब हल्ला केला. या हल्ल्यात 40 शेतकऱ्यांची अमानुष हत्या करण्यात आली आहे. बोर्नो राज्याचे गव्हर्नर बाबागाना उमरा जुलुम यांनी दिलेल्या माहितीनुसार, या हल्ल्याची जबाबदारी बोको हराम गट आणि इस्लामिक स्टेटशी संबंधित त्यांच्या अन्न गटाने घेतली आहे. या गटांनी हा हल्ला डुम्बा भागत केला असून नारिकांना सैन्याने सुरक्षित क्षेत्रात राहण्याचे आवाहन नायजेरियाच्या सरकारने केले आहे.
बोर्नो राज्याचे गव्हर्नर जुलुम याचा तीव्र निषेध
बोर्नो राज्याचे गव्हर्नर जुलुम यांनी या हिंसाचाराच्या घटनेचा तीव्र निषेध केला आहे. त्यांनी सशस्त्र दलांना या प्रकरणाची सखोल चौकशी करून आरोपींना कठोर शिक्षा करावी. त्यांनी म्हटले की, “बोर्नो राज्यातील नागरिकांना मी आश्वासन देतो की या हत्याकांडाची चौकशी केली जाईल. मी सशस्त्र दलांना निर्दोष नागरिकांच्या हत्येतील गुन्हेगारांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे आवाहन करतो.”
बोको हरमचा दीर्घकालीन संघर्ष
मिळालेल्या माहितीनुसार, बोको हरम या गटाने 2009 मध्ये नायजेरियामध्ये पश्चिमी शिक्षणाविरोधात लढा सुरू केला. या दहशतवादी गटाचा उद्देश देशात इस्लामिक शरीयात लागू करणे आहे. गेल्या 14 वर्षांपासून सुरू असलेल्या या संघर्षामुळे नायजेरियामध्ये मोठ्या प्रमाणावर हिंसाचारा झाला असून हा संघर्ष आता आफ्रिकेतील सर्वाधिक दीर्घकालीन उग्रवाद म्हणून ओळखण्यात येतो. संयुक्त राष्ट्रांच्या आकडेवारीनुसार, या संघर्षात आतापर्यंत 35,000 नागरिकांचा बळी गेला आहे, तर 20 लाखांहून अधिक लोक विस्थापित झाले आहेत.
यापूर्वीही शेतकऱ्यांवर हल्ले
नोव्हेंबर 2024 मध्ये बोको हरमच्या संशयित सदस्यांनी तीन गावांवर हल्ला केला होता. या हल्ल्यात 15 शेतकऱ्यांना ठार करण्यात आले होते. हा हल्ला कोशेबे, करकुट आणि बुलाबुलिन या गावांमध्ये झाला होता. ही गावे बोर्नो राज्यातील माफा परिसरात असून राजधानी मैदुगुरीपासून अवघ्या 15 किलोमीटर अंतरावर आहेत. शेतकऱ्यांना कापणी करत असताना लक्ष्य करण्यात आले होते.
चिबोक अपहरणाने जगाचे लक्ष वेधले
मीडिया रिपोर्टनुसार, 2014 मध्ये बोको हरमने चिबोक गावातून 276 शाळकरी मुलींचे अपहरण केले होते. या घटनेने संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले होते आणि नायजेरियातील दहशतवादाचा प्रश्न आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवला होता. या हल्ल्यामुळे नायजेरियामधील सुरक्षिततेच्या स्थितीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सरकार आणि सुरक्षा दलांनी नागरिकांचे रक्षण करण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याची गरज आहे.