Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 22 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Indian Economy: ‘मेड इन इंडिया’ चा जगभर डंका! स्मार्टफोन मार्केटमध्ये भारताने चीनला पछाडलं; US तज्ज्ञ फरीद झकारियाही झाले फॅन

Indian Economy : भारताने गेल्या वर्षी स्मार्टफोन उत्पादन आणि निर्यातीत चीनला मागे टाकून एक ऐतिहासिक टप्पा गाठला. अमेरिकन तज्ज्ञांनी यावर चर्चा केली असून भारत आणि चीनच्या भविष्यावरही भाष्य केले आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Mar 23, 2026 | 01:48 PM
india beats china in smartphone exports to us fareed zakaria praise 2026

india beats china in smartphone exports to us fareed zakaria praise 2026

Follow Us
Follow Us:
  • चीनचा पोलादी गड कोसळला
  • फरीद झकारियांचे कौतुक
  • ट्रम्प फॅक्टर आणि ॲपलचा निर्णय

India surpasses China in smartphone exports to US : काही वर्षांपूर्वीपर्यंत जगाला असे वाटत होते की, स्मार्टफोन (Smartphone) आणि उच्च-तंत्रज्ञान उत्पादनामध्ये चीनची बरोबरी करणे कोणालाही शक्य नाही. पण २०२६ च्या सुरुवातीलाच भारताने असा चमत्कार करून दाखवला आहे, ज्याने संपूर्ण जगाचे डोळे विस्फारले आहेत. भारताने केवळ स्मार्टफोन तयारच केले नाहीत, तर बलाढ्य चीनला मागे टाकून अमेरिकेला सर्वाधिक फोन पुरवणारा देश होण्याचा बहुमान मिळवला आहे. अमेरिकन राजकीय भाष्यकार फरीद झकारिया यांनी यावर भाष्य करताना म्हटले आहे की, “भारताने जगाचा आवाज दाबला आहे आणि आपली क्षमता सिद्ध केली आहे.”

४४% मार्केट शेअर: चीनची ‘लॉबिंग’ मोडीत!

कॅलनेसिस (Canalys) या जागतिक संशोधन संस्थेच्या ताज्या आकडेवारीनुसार, अमेरिकेच्या बाजारपेठेत मोठा भूकंप झाला आहे. २०२४ मध्ये अमेरिकेला होणाऱ्या एकूण स्मार्टफोन पुरवठ्यात भारताचा वाटा केवळ १३% होता, जो २०२५-२६ मध्ये झपाट्याने वाढून ४४% वर पोहोचला आहे. दुसरीकडे, एकेकाळी ६१% वर्चस्व गाजवणारा चीन आता २५% पर्यंत खाली घसरला आहे. ही आकडेवारी केवळ व्यापार नाही, तर जागतिक भू-राजकारणातील बदलत्या वाऱ्याची दिशा दर्शवते.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : White House: अमेरिकेत शटडाउनने उडाली धांदल; ट्रम्प म्हटले, ‘इराणची डोकेदुखी संपल्यावर, देशातील ‘या’ शत्रूला ठेचणार’

फरीद झकारियांचे विधान: “तुमच्या खिशातला आयफोन आता भारतीय!”

प्रसिद्ध पत्रकार फरीद झकारिया यांनी एका विशेष कार्यक्रमात भारताच्या या प्रगतीचे तोंडभरून कौतुक केले. ते म्हणाले, “भारताने अवघ्या चार वर्षांत जे साध्य केले ते अशक्य मानले जात होते. आज अमेरिकन नागरिकांच्या खिशात जो नवीन आयफोन आहे, त्यावर ‘मेड इन इंडिया’ असे अभिमानाने लिहिलेले आहे. हाय-प्रिसिजन मॅन्युफॅक्चरिंगमध्ये भारतीयांनी आपली महानता सिद्ध केली आहे.” झकारिया यांच्या मते, विकसनशील देशांसाठी आता चीनपेक्षा भारत हा प्रगतीचा अधिक चांगला ‘रोल मॉडेल’ ठरत आहे.

“India has replaced China as the largest manufacturer of smartphones for the US in just four years. The latest iPhone in your pocket was made in India. They are doing the kind of high-precision manufacturing that people said only China could do,” says Fareed Zakaria pic.twitter.com/HHQVrTAqtH — Shashank Mattoo (@MattooShashank) March 23, 2026

credit – social media and Twitter

डोनाल्ड ट्रम्प आणि ‘शुल्क युद्ध’ (Tariff War)

भारताच्या या यशामागे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणांचाही मोठा वाटा आहे. ट्रम्प यांनी चीनमधून येणाऱ्या मालावर १० ते २५ टक्क्यांपर्यंत अतिरिक्त शुल्क लादल्यामुळे ॲपल (Apple), सॅमसंग (Samsung) आणि गुगल (Google) सारख्या दिग्गज कंपन्यांनी आपले उत्पादन केंद्र चीनमधून हलवून भारतात आणले. भारत सरकारनेही ‘पीएलआय’ (PLI) योजनेच्या माध्यमातून या कंपन्यांना लाल गालिचा अंथरल्याने आज भारत जगाची ‘स्मार्टफोन फॅक्टरी’ बनला आहे.

भारताकडून जगाला काय शिकण्यासारखे आहे?

गेल्या २५ वर्षांपासून भारत जगातील दुसरी सर्वात वेगाने वाढणारी मोठी अर्थव्यवस्था आहे. चीनची प्रगती ही हुकूमशाहीच्या जोरावर झाली असली, तरी भारताने लोकशाही मूल्यांचे जतन करून ही आर्थिक झेप घेतली आहे. त्यामुळेच, जगातील इतर विकसनशील देशांना आता भारताची धोरणे अधिक आश्वासक वाटत आहेत. उच्च दर्जाचे उत्पादन (High-precision manufacturing) आणि स्वस्त मजुरी या पलीकडे जाऊन भारताने आता ‘ब्रँड इंडिया’ची विश्वासार्हता निर्माण केली आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : World War III : ‘सापाला डोकं वर काढू देऊ नका’; इराणला चारीमुंड्या चीत करण्यासाठी ट्रम्पसोबत आखाती देशांचीही ‘फिल्डिंग’

 ड्रॅगनच्या साम्राज्याचा अंत?

स्मार्टफोन निर्मितीतील हे यश केवळ सुरुवात आहे. भारत आता सेमीकंडक्टर, लॅपटॉप आणि इलेक्ट्रिक वाहनांच्या क्षेत्रातही चीनला आव्हान देण्याच्या तयारीत आहे. अमेरिकन तज्ज्ञांनी भारताचे केलेले हे कौतुक म्हणजे आगामी काळात भारत ‘जागतिक उत्पादन केंद्र’ (Global Manufacturing Hub) म्हणून चीनची जागा घेणार असल्याचे स्पष्ट संकेत आहेत.

💡

Frequently Asked Questions

  • Que: स्मार्टफोन निर्यातीत भारताचा अमेरिकेतील वाटा किती आहे?

    Ans: २०२५-२६ च्या आकडेवारीनुसार, अमेरिकेतील एकूण स्मार्टफोन मार्केटमध्ये भारताचा वाटा ४४% वर पोहोचला आहे.

  • Que: चीनचा वाटा अमेरिकेत किती टक्क्यांनी कमी झाला आहे?

    Ans: चीनचा वाटा ६१% वरून घसरून आता केवळ २५% इतकाच राहिला आहे.

  • Que: फरीद झकारिया यांनी भारताच्या प्रगतीबद्दल काय म्हटले?

    Ans: झकारिया यांनी भारताला हाय-प्रिसिजन मॅन्युफॅक्चरिंगचा नवीन किंग म्हटले असून जगाला चीनपेक्षा भारताकडून अधिक शिकण्यासारखे आहे, असे विधान केले आहे.

Web Title: India beats china in smartphone exports to us fareed zakaria praise 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 23, 2026 | 01:48 PM

Topics:  

  • America
  • China
  • international news
  • smartphone

संबंधित बातम्या

Hybrid Cars : 60 दिवस, अमेरिकेचे 6 अब्ज डॉलर्स, आणि संपूर्ण जगाची नजर; US-Iran शांतता चर्चेसाठी JD Vance स्वित्झर्लंडमध्ये दाखल
1

Hybrid Cars : 60 दिवस, अमेरिकेचे 6 अब्ज डॉलर्स, आणि संपूर्ण जगाची नजर; US-Iran शांतता चर्चेसाठी JD Vance स्वित्झर्लंडमध्ये दाखल

Smartphone Price Dropped: iPhone खरेदीची हीच योग्य वेळ! Amazon वर मिळतंय जबरदस्त डिस्काऊंट, नवी किंमत पाहून थक्क व्हाल
2

Smartphone Price Dropped: iPhone खरेदीची हीच योग्य वेळ! Amazon वर मिळतंय जबरदस्त डिस्काऊंट, नवी किंमत पाहून थक्क व्हाल

Global Sleep Atlas : ‘ग्लोबल स्लीप ॲटलस’चा धक्कादायक अहवाल; भारतीयांना लागतेय गाढ झोप, तर ‘या’ देशातील लोकांची उडालीये झोप
3

Global Sleep Atlas : ‘ग्लोबल स्लीप ॲटलस’चा धक्कादायक अहवाल; भारतीयांना लागतेय गाढ झोप, तर ‘या’ देशातील लोकांची उडालीये झोप

Smartphone Price Dropped: हीच खरी संधी! हजारो रुपयांच्या डिस्काऊंटसह खरेदी करा Samsung चा प्रीमियम 5G फोन… जाणून घ्या ऑफर्स
4

Smartphone Price Dropped: हीच खरी संधी! हजारो रुपयांच्या डिस्काऊंटसह खरेदी करा Samsung चा प्रीमियम 5G फोन… जाणून घ्या ऑफर्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.