India blocks China's Global Times' X handle amid India-Pakistan tensions
बिजिंग: भारताने आपल्या एका शत्रू देशाला म्हणजेच पाकिस्तानला धडा शिकवला असून आता चीनवरही मोठी कारवाई केली आहे. भारत सरकराने चीनचे ग्लोबल टाईम्स ब्लॉक केले आहे. भारत सरकारने सोशल मीडियावरील चीनचे ग्लोबल टाईम्स अकाउंट बंद केले आहे. यामागचे कारण म्हणजे, ग्लोबल टाईम्सने भारताविरुद्ध खोट्या बातम्या पसरवण्याचा प्रयत्न केला. यामुळे ड्रॅगनविरोधात ही कारवाई करण्यात आली आहे.
ग्लोबल टाईम्स हे चीनचे मुखपत्र आहे. हे मुखपत्र चीनचे अध्यक्ष शी जिपिंग यांच्या अजेंडानुसार कार्य करत. ग्लोबल टाईम्सने भारताविरोधात खोट्या बातम्या पसरवल्या असे सांगण्यात येत आहे. ग्लोबल टाईम्सवरील कारवाईपूर्वी भारताने अरुणाचल प्रदेशाबद्दल चीनच्या दूष्ट हेतूही स्पष्ट केला. तसेच भारताने चीनचे एक्स न्यूज चे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरील अकाऊंट देखील भारतामध्ये बॅन केले आहे.
अरुणाचल प्रदेशातील काही ठिकाणांची नावे बदलण्याचा चीनने प्रयत्न केला, परंतु भारताने याला स्पष्टपणे नकार दिला आहे. भारताने स्पष्ट शब्दात सांगितले की, चीनचा हा प्रयत्न हास्यास्पद भाग आहे. अरुणाचल प्रदेश हा भारताचा अविभाज्य भाग होता , आहे आणि राहिल हे स्पष्ट शब्दात सांगितले आहे.
चीनने अरुणाचल प्रदेशातील काही ठिकाणांची नावे जाहीर केली होती. यावर भारताने टिका केली आहे. तसेच चीनने अरुणाचल प्रदेश दक्षिण तिबेटचा भाग आहे. दरम्यान भारताच्या परराष्ट्र मंत्रीलयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी चीनच्या या दाव्याला प्रत्युत्तर दिले आहे. जयस्वाल यांनी म्हटले की, चीनने भारतातील अरुणाचल प्रदेशांतील ठिकाणांची नावे बदलण्याचा व्यर्थ आणि हास्यास्पद प्रयत्न केला आहे.
भारत सरकार चीनच्या या निर्णयाला स्पष्ट नकार देते. तसेच अरुणाचल प्रदेश हा भारताचाच भाग होता, आहे आणि राहिले असेल जयस्वाल यांनी स्पष्ट शब्दात ठणकावून सांगितले आहे.
पाकिस्तानसोबतच्या तणावादरम्यान चीनने पाकिस्तानला पाठिंबा दर्शवला होता. चीनने म्हटले होते की, पाकिस्तानच्या सार्वभौमत्वासाठी, प्रादेशिक अखंडता आणि राष्ट्रीय स्वातंत्र्य जपण्यासाठी पाकिस्तानसोबत आहे. तसेच चीनने भारताच्या ऑपरेशन सिंदूर अंतर्गत केलेल्या कारवाईला खेदजनक म्हणून देखील संबोधले होते. चीनने पाकिस्ताला पाठिंबा देत जागतिक स्तरावर देखील भारतावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला होता. चीनने पाकिस्तानला समर्थन दर्शवत भारतविरोधी भूमिका उघडपणे मांडली होती.
दरम्यान पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानविरोधात कडक कारवाई केली आहे. भारताने सिंधू जल करार स्थगित केला आहे. तसेच ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्यापत काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या ठिकाणांना उद्ध्वस्त केले आहे. यानंतरही पाकिस्तानने केलेले सर्व हल्ले भारताने हाणून पाडले आहे. परंतु पाकिस्तान काही सुधारण्याचे नाव घेत नाही. पाकिस्तानने सिंधू जल करार पुनर्सुचित केला नाही तर ही युद्धबंदी मानली जाणार नाही असे म्हटले आहे.