Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 13 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

India China border dispute : सीमेवर चीनची नवी चाल? अरुणाचलमध्ये भारतीय जमिनीवर कब्जा केल्याचा दावा

India China border dispute : भारत आणि चीनमध्ये पुन्हा एकदा तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. चीनने अरुणाचल प्रदेशातील भारतीय जमिनींवर कब्जा केल्याचा दावा केला जात आहे. चीनने रस्ते, लष्करी छावण्या भारतीय जमिनीवर उभारल्या असल्याचे अरुणाचलमधील आदिवासी समाजाने म्हटले आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jun 30, 2026 | 02:29 PM
China Encroaches on Indian Land in Arunachal Pradesh

China Encroaches on Indian Land in Arunachal Pradesh

Follow Us
Follow Us:
  • सीमेवर चीनची नवी चाल?
  • अरुणाचलमध्ये भारतीय जमिनीवर कब्जा केल्याचा ड्रॅगनवर आरोप
  • ५ ठिकाणांवर चीनचा कब्जा
India China border dispute : अरुणाचल प्रदेशातील अपर सुबानसिरी जिल्ह्यातील सीमावर्ती ‘नाह’ आदिवासी समाजाने चीनकडून भारतीय भूभागावर अतिक्रमण केल्याचा गंभीर आरोप केला आहे. गेल्या ६ वर्षांत चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने त्यांच्या पारंपरिक गुरे चरण्याच्या, शिकार आणि शेतीसाठी वापरल्या जाणाऱ्या मोठ्या भूभागावर कब्जा केल्याचा दावा या समाजाने केला आहे. तसेच भारतीय हद्दीत रस्ते आणि लष्करी छावण्याही उभारल्याचा आरोप करण्यात आला आहे.

Indus Water treaty : ‘पाणी अडवलं तर हात तोडू’ , पाकिस्तानच्या धमक्या थांबेनात; सिंधु जल करारावरुन भारताला पुन्हा इशारा

नाह वेल्फेअर सोसायटीचे अध्यक्ष केरू चाडेर यांनी नुकत्याच अपर सुबानसिरीचे उपायुक्त यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, काही वर्षांपूर्वीपर्यंत आम्ही मुक्तपणे फिरत असलेली आमची पूर्वजांची जमीन, जंगलातील उत्पादने गोळा करण्याची ठिकाणे आणि गुरे चारत असलेल्या जमिनीचा मोठा भाग आता चीनच्या पीएलएच्या ताब्यात गेला आहे.

५ ठिकाणांवर वाढवला प्रभाव

अपर सुबानसिरीमधील ताकसिंग महसूल क्षेत्रातील ५ ठिकाणांमध्ये चीनने हळूहळू आपला प्रभाव वाढवला आहे. आंतरराष्ट्रीय सीमेवरील महत्त्वाच्या भागांवर धोरणात्मक पद्धतीने कब्जा करून चीन आपले नियंत्रण वेगाने विस्तारत असल्याचा दावाही करण्यात आला आहे.

दरम्यान, नाचो मतदारसंघाचे आमदार नाकाप नालो यांनी या प्रकरणाची अधिकृत पडताळणी होणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे. हा राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित विषय असल्याने प्रशासनाने या आरोपांची अधिकृत पुष्टी करणे गरजेचे आहे. राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने या दाव्यांबाबत चिंता निर्माण होणे स्वाभाविक आहे, असे ते म्हणाले.

ताकसिंग सीमावर्ती भागात हालचालींमध्ये वाढ

  • नाह वेल्फेअर सोसायटीनुसार, गेल्या १० ते १५ वर्षांत ताकसिंग सीमावर्ती भागात चीनच्या हालचालींमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. शक्य तितक्या अधिक भूभागावर ताबा मिळवण्याच्या उद्देशाने ही कारवाई सुरू असल्याचा आरोप
    संस्थेने केला आहे.
  • संस्थेच्या दाव्यानुसार, २०२० पर्यंत त्यांच्या पारंपरिक नियंत्रणाखाली असलेली ओयिंग (असाफिला क्षेत्र), पनियार (चुजार्ता क्षेत्र), मारपान (मारनाफे), पोट्रांग (तलाव परिसर)
    आणि टिंडिंगटांग (टीजी) ही ठिकाणे हळूहळू चीनच्या घुसखोरीच्या कक्षेत आली आहेत.
  • यापैकी काही ठिकाणे ताकसिंग मुख्यालयाच्या अगदी जवळ असून काहींना धार्मिक आणि तीर्थस्थळाचे महत्त्वही आहे.

अरुणाचल प्रदेश सरकार गप्प का?

निवेदनात चाडेर यांनी म्हटले आहे की, आमचा भारतीय लष्करावर पूर्ण विश्वास आहे. अनेक वर्षांपासून ते आमच्या भूमीचे रक्षण करत आहेत. मात्र, सध्या ताकसिंग भागात चीनच्या कारवायांचा वेग आणि त्यामागील हेतू अत्यंत चिंताजनक आहे. आमची जमीन दिवसेंदिवस इंच-इंच करून आमच्या हातातून निसटत आहे. या प्रकरणावर अद्याप जिल्हा प्रशासन किंवा अरुणाचल प्रदेश सरकारने कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.

Europe Heatwave : युरोपमध्ये उष्णतेचा कहर! रस्ते आणि सिग्नल वितळले, हजारो मृत्यू… नेमकं काय घडतंय?

Web Title: India china border dispute china encroaches on indian land in arunachal pradesh

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 30, 2026 | 02:29 PM

Topics:  

  • Arunachal pradesh
  • China
  • India china Border Clash
  • World news

संबंधित बातम्या

Bangladesh : बांगलादेशवर ऊर्जेचे महासंकट! रात्री 8 वाजता बंद करावे लागणार मॉल्स; ढाकाने मागितली दिल्लीकडे मदत
1

Bangladesh : बांगलादेशवर ऊर्जेचे महासंकट! रात्री 8 वाजता बंद करावे लागणार मॉल्स; ढाकाने मागितली दिल्लीकडे मदत

Arunachal Pradesh: ‘अरुणाचल हा आमचाच अविभाज्य भाग!’ चीनच्या दाव्यांवर भारत आक्रमक; ड्रॅगॉननेही दिले ‘असे’ अधिकृत स्पष्टीकरण
2

Arunachal Pradesh: ‘अरुणाचल हा आमचाच अविभाज्य भाग!’ चीनच्या दाव्यांवर भारत आक्रमक; ड्रॅगॉननेही दिले ‘असे’ अधिकृत स्पष्टीकरण

Kuril Islands: वादग्रस्त कुरिल बेटांवर पुतिन यांचे पाऊल अन् रशिया-जपानमधील 81 वर्षांचा वाद पुन्हा पेटला, वाचा इनसाइड स्टोरी
3

Kuril Islands: वादग्रस्त कुरिल बेटांवर पुतिन यांचे पाऊल अन् रशिया-जपानमधील 81 वर्षांचा वाद पुन्हा पेटला, वाचा इनसाइड स्टोरी

Balochistan स्वातंत्र्यलढ्याला वेग! पाकिस्तानी सैन्यावर बलुच विद्रोही संघटनांचा मोठा प्रहार; क्वेटा, बोलान, सिंधमध्ये मालिकास्फोट
4

Balochistan स्वातंत्र्यलढ्याला वेग! पाकिस्तानी सैन्यावर बलुच विद्रोही संघटनांचा मोठा प्रहार; क्वेटा, बोलान, सिंधमध्ये मालिकास्फोट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.