Europe Heatwave : युरोपमध्ये उष्णतेचा कहर! रस्ते आणि सिग्नल वितळले, हजारो मृत्यू... नेमकं काय घडतंय? (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
अनेक ठिकाणी रस्ते वितळले आहे, रेल्वे रुळही वितळले आहेत. जंगलांना आग लागत असून नागरिकांना घराबाहेर रहावे लागत आहे. अनेक सिग्नल, गाड्यांचे टायर्सही वितळत आहे. याचे भयानक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. पण नेहमी थंड राहणारा युरोप नेमका कसा जळू लागला आहे? यामागे नेमकं काय कारण आहे? जाणून घेऊयात.
तज्ज्ञांच्या मते, या परिस्थितीमागे प्रमुख कारण म्हणजे युरोपची भौगोलिक रचना आहे. भारत उष्ण कटिबंधीय भागात आहे, यामुळे तीव्र उन्हाचा येथील लोकांवर जास्त परिणाम होत नाही.
परंतु, याउलट युरोपमधील बहुतांश देश हे समशीकोष्ण हवामान पट्टीत वसलेले आहेत. यामुळे येथील तापमान सामान्यत: कमी असते. यामुळे ३५ ते ४० अंश सेल्सियस तापमानही येथील लोकांसाठी धोकादायक आहे.
युरोप नेहमी थंड प्रदेश राहिल्याने येथील घराची रचना थंडीपासून बचावासाठी करण्यासाठी आलेली आहे. जाड भिंत आणि उष्णता आत टिकवून ठेवता येणाऱ्या रचनेमुळे उन्हाळ्यात परिस्थिती बिकट होते.
तीव्र उष्णतेमुळे दिवसभर साठलेली उर्जा रात्री बाहेर पडत नसल्याने घरातील तापमान जास्त राहत आहे. शिवाय युरोपमध्ये थंडीमुळे अनेक घरांमध्ये एअर कंडिशनरची सुविधाही मर्यादित आहे. यामुळे उष्णतेपासून सुटाक मिळणे अत्यंत कठीण आहे.
युरोपमध्ये ६५ वर्षांवरील नागरिकांचे प्रमाण युवकांच्या तुलनेने अधिक आहे. वृद्धांना शरीराचे तापमान नियंत्रित ठेवणे कठीण जाते. अनेक जण एकटे राहत असल्यामुळे वेळेवर मदत मिळत नाही. यामुळे उष्माघात, निर्जलीकरण आणि हृदयविकाराच्या घटना वाढत आहेत.
Europe is melting traffic lights melts under 45 c heatwave in Italy and Germany. pic.twitter.com/jXOsHmefwA — JOKAMRREDPILLZ (@JOKAQARMY1) June 30, 2026
हवामान तज्ज्ञांच्या मते, यामागे ओमेगा ब्लॉक आणि हीट डोम या दोन हवामानविषयक घटना कारणीभूत आहेत.
काय आहे ओमेगा ब्लॉक ?
ओमेगा ब्लॉकमुळे वातावरणातील उच्च दब जास्त काळ एकाच ठिकाणी स्थिर राहतो. यामुळे आफ्रिकेकडून येणाऱ्या गरम हवेचा प्रवाह युरोपमध्ये अडकते आणि थंड हवान रोखली जाते.
काय आहे हीट डोम?
तर हीट डोममुळे गरम हवा जमिनीजवळ अडकते. यामुळे सर्याचे तापमान वाझढते आणि सलग अनेक दिवस उच्च पातळीवर राहते.
हवामान तज्ज्ञांच्या मते, सध्या जागतिक तापमानवाढीमुळे तीव्र उष्णतेच्या लाटा वारंवार अधिक तीव्र होत आहे. युरोप हा जगातील सर्वाधित वेगाने तापमान वाढणाऱ्या खंडापैकी एक आहे. यामुळे उष्णतेच्या लाटा अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.
सध्या युरोपमधील तापमान सरासरीपेक्षा अधिक वेगाने वाढत आहे. यामुळे जगंताली आग, पाणी टंचाई, शेतीचे नुकसान आणि उष्माघातामुळे मृत्यूचा आकडा वाढत आहे.
🚨🇩🇪 HOLY SH*T! The heat has gotten so extreme in Germany that tram tracks have started to melt! The Leipzig Transport Authority has suspended every single tram line, after sealant in the rails and points liquefied across the network. They planned to resume service last night,… pic.twitter.com/il1oeu7Efr — Mario Nawfal (@MarioNawfal) June 28, 2026






