China Foreign Minister soon to visit India
India China news in Marathi : नवी दिल्ली : भारत आणि चीनच्या (India China Relations) संबंधामध्ये सुधारणा होताना दिसून येते आहे. चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी भारत दौऱ्यावर येणार असल्याची माहिती मिळाली आहे. यादरम्यान वांग यी भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) अजित डोवाल यांची भेट घेणार आहेत. यावेळी भारत आणि चीनमधील व्यापक सीमा प्रश्नांवर चर्चा होणार आहे.
तसेच परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्याशीही वांग यी द्विपक्षीय संबंधावर चर्चा करणार आहे. ही भेट दोन्ही देशांच्या वाढत्या सकारात्मक संबंधासाठी अत्यंत महत्वाची मानली जात आहे. सोमवारी (१८ ऑगस्ट) ही भेट होणार आहे. जून २०२० मध्ये गलवान खोऱ्यातील संघर्षानंतर वांग यी पहिल्यांदाच भारताला भेट देणार आहेत.
भारताच्या पंतप्रधान मोदींना चीनच्या SCO परिषदेमध्ये सहभागी होण्यासाठी बिजिंगकडून अधिकृत आमंत्रण मिळाले आहे. ३१ ऑगस्ट ते १ सप्टेंबर दरम्यान ही परिषद होणार आहे. अमेरिकेच्या (America) वाढत्या दबावादरम्यान पंतप्रधान मोदींचा हा दौरा महत्वाचा ठरू शकतो असे तज्ज्ञांनी म्हटले आहे. यावेळी चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्याही भेट पंतप्रधान मोदी घेण्याची शक्यता आहे.या दौऱ्याच्या काही दिवसांपूर्वीच चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांचा भारत दौरा नियोजित करण्यात आला आहे.
भारत- चीन संबंधामध्ये सुधार
२०२० मध्ये गलवान खोऱ्यात भारत आणि चीनमध्ये हिंसक संघर्ष झाला होता. त्यानंतर दोन्ही देशांचे संबंधांमध्ये कटूता निर्माण झाली होती. मात्र आता दोन्ही देशांतील संबंध सुधारण्याच्या मार्गावर आहेत. गेल्या वर्षी दोन्ही २१ ऑक्टोबर रोजी दोन्ही देशांमध्ये करार करण्यात आला होता. यानुसार चीन डेमचोक आणि डेपसांग या लष्करी तळावर आपले सैन्य माघारी घेणार आहे.
ब्लूमर्ग वृत्तंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस भारत आणि चीनमध्ये थेट विमान सेवा सुरु करण्याची घोषणा होईल. चीनच्या शांघाय (SCO) सहकार्य संघटनेच्या परिषेदत याची अधिकृत घोषणा केली जाऊ शकते. गलवान खोऱ्यातील वादानंतर पाच वर्षांनी दोन्ही देशांमधील विमानसेवा सुरु करण्यात येत आहे.
Viral : अमेरिकेला गंडवलं? खरे नाही तर ‘क्लोन पुतिन’ने घेतली ट्रम्पची भेट; सोशल मीडियावर धुमाकूळ