Viral : अमेरिकेला गंडवलं? खरे नाही तर 'क्लोन पुतिन'ने घेतली ट्रम्पची भेट; सोशल मीडियावर धुमाकूळ (फोटो सौजन्य: एक्स/ @fridolinmozart)
Trump Putin Meet : मॉस्को : रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची अलास्कामध्ये बैठक पार पडली. शुक्रवारी (१५ ऑगस्ट) झालेल्या या बैठकीत रशिया आणि युक्रेन युद्धावर शांतता करारासाठी चर्च होणार झाली, पण यावर कोणताही ठोस निर्णय झाला नाही. दरम्यान सोशल मीडियावर एक खळबळजनक चर्चा सुरु आहे. सोशल मीडियावर दावा केला जात आहे की, व्लादिमिर पुतिन यांच्या जागी त्यांच्यासारखाच दिसणारा क्लोन ट्रम्प यांना भेटण्यास गेला होता. या दाव्याने सोशल मीडियावर चर्चांना उधाण आले आहे.
सोशल मीडियावर एक हास्यास्पद कट-थिअरी चर्चेत आहे. यामध्ये दावा केला जात आहे की, ट्रम्प यांना भेटायला स्वत: पुतिन गेले नव्हते तर त्यांनी आपला ‘क्लोन’ अलास्काला पाठवले होते. यावर सोशल मीडियावर नोस्ट्राडेमस फ्रिडोलिन मोझार्ट याने एक्सवर @fridolinmozart या अकाउंटवर पोस्ट केली आहे. यामध्ये त्याने पुतिन नसून त्यांचा क्लोन अलास्काला पाठवला होता याचे स्पष्टीकरण दिले आहे. यामध्ये म्हटले आहे की, खऱ्या पुतिनपेक्षा या पुतिनची चाल-ढाल खूप वेगळी आहे. शिवाय अलास्कामध्ये गेलेल्या पुतिन यांचा चेहरा भरलेला दिसत आहे, पण खऱ्या पुतिन यांचा चेहरा अगदी वेगळा आहे. तसेच त्यांच्या वागण्याच्या अंदाजवरही लोकांनी शंका व्यक्त केली आहे. पुतिन जास्त हसत नाहीत, पण ट्रम्प यांना भेटायला गेलेले पुतिन आनंदाने ट्रम्पची भेट घेत आहेत.
Its literally not even the real Putin. They didnt even send the good double, they sent “Jovial Putin”, the expendable one that usually just makes minor public appearances and went to visit Kim in NK. Look at that hairline and those cheek fillers, jfc… pic.twitter.com/27lDBsbLqA
— Nostramanus 🐦⬛ (@fridolinmozart) August 15, 2025
लोकांनी उत्तर कोरियाला किम जोंग उन यांना भेटायला गेलेल्या पुतिन आणि ट्रम्प यांना भेटायला गेलेल्या पुतिन वेगवेगळे आहेत असे म्हटले आहे. त्यांच्या गालावरील केसांवरुन हा दावा केला जात आहे. लोकांच्या मते, ट्रम्प यांना भेटायला आलेले खरे पुतिन नसून त्यांचा क्लोन आहे. काहींना हा पुतिन यांचा पाचवा क्लोन असल्याचा दावा केला आहे. मात्र या दाव्यांमध्ये कितपत सत्य आहे हे सांगणे कठीण आहे. सध्या सोशल मीडियावर खरे पुतिन आणि क्लोन पुतिन यांची जोरदार चर्चा रंगली आहे.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.