India fails in Trade Deal with America says Muhammad Yunus
Bangladesh News Marathi : ढाका : अमेरिका (America) आणि भारताच्या व्यापार वादाचा फायदा बांगलादेशाला (Bangladesh) झाला आहे. अमेरिकेने बांगलादेशवरील कर कमी केला असून २०% कर लादला आहे, तर भारतावर २५% कर लादला आहे. दरम्यान अमेरिका आणि भारतामधील व्यापार वाद वाढत असून यावर बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार मोहम्मद युनूस यांनी टिप्पणी केली आहे.
युनूस यांनी भारत अमेरिकेसोबत व्यापार करण्यास अपयशी ठरला असल्याचे म्हटले आहे. मात्र त्यांच्या या विधानामुळे बांगलादेश आणि भारत संबंध बिघडण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे अमेरिकेने पाकिस्तानसह बांगलादेशवरील करही रद्द केला आहे. पूर्वी ट्रम्प यांनी बांगलादेशवर ३७% कर लादला होता, आता हा कर २०% करण्यात आला आहे. (America-Bangladesh Trade Deal)
तिसरे महायुद्ध भडकणार? अमेरिकेच्या अणु पाणबुड्या रशियाच्या निशाण्यावर; आता काय करणार ट्रम्प?
मोहम्मद युनूस ( Muhammad Yunus) यांनी पत्रकार परिषदेदरम्यान हे विधान केले आहे. त्यांनी म्हटले, आमच्या व्यापार वाटाघाटी अधिकाऱ्यांनी अमेरिकेशी चर्चा केली आणि ३७% कर १७% ने कमी केला आहे. अमेरिकेने २०% कर बांगलादेशावर लादला आहे. यामुळे आमच्या देशाच्या आर्थिक हितांचे रक्षण आणि विकास करण्यासाठी आम्ही चांगले काम केले आहे.
तसेच यामुळे बांगलादेशाच्या कापड उद्योगाला देखील चालना मिळेल असे त्यांनी म्हटले आहे. भारतावर बांगलादेशपेक्षा मोठा कर लादला असल्याने याला युनूस मोठा विजय मानत आहे.
Chief Adviser’s message after successful tarriff negotiations with US
Dhaka, August 1, 2025: We proudly congratulate the Bangladesh tariff negotiators on securing a landmark trade deal with the United States, a decisive diplomatic victory.
By reducing the tariff to 20%, 17…— Chief Adviser of the Government of Bangladesh (@ChiefAdviserGoB) August 1, 2025
युनूस यांनी एक्सप्रेसवर पोस्ट केलेल्या निवेदनात, बांगलादेशवरील टॅरिफ श्रीलंका, व्हिएतनाम, पाकिस्तान आणि इंडोनेशियाच्या बरोबरीचा असल्याचे म्हटले आहे. या सर्व देशांवर ट्रम्प यांनी १९% ते २० टक्के कर लादला आहे. याचा बांगलादेशाला या कमी टॅरिफचा फायदा होत आहे. बांगलादेशचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार खलीलुर रहमान यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे.
त्यांनी म्हटले आहे, ‘आम्ही जास्त टॅरिफ टाळण्यास यशस्वी झालो आहोत. ही आमच्या कापड उद्योगासाठी आनंदाची बातमी आहे. यामुळे आमच्या कापड उद्योगाला जागतिक स्तरावर बाजारपेठ निर्माण करण्याची संधी मिळाली असल्याचे त्यांनी म्हटले.याशिवाय रहमान यांनी त्यांच्या अधिकाऱ्यांनी देशाचे हित लक्षात घेऊन अमेरिकेशी चर्चेस प्राधान्य दिले असल्याचे म्हटले.
बांगलादेशाचा कापड उद्योग हा अर्थव्यवस्थेसाठी मुख्य आधार आहे. चीननंतर हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा निर्यातदार बांगलादेश आहे. सध्या बांगलादेशच्या जीडीपीमध्ये कापड उद्योगाचा ११% टक्के वाटा आहे, म्हणजे एकूण निर्यातीपेक्षा ८०% जास्त आहे. सध्या ट्रम्प यांनी बांगलादेशवरील कर कमी केल्याने हा वाटा वाढण्याची शक्यता आहे. याचा बांगलादेशला व्यापार आणि राजनैतिक स्तरावर देखील फायदा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
ट्रम्पची नवी चाल, बांगलादेशवरील कर केला कमी, ‘या’ भारतीय कंपन्यांचे शेअर्स कोसळले