किम जोंग-उनने दाखवला जगातील सर्वात मोठा 'रॉकेट बॉम्ब'; दक्षिण कोरियावर अण्वस्त्राचे सावट? ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया )
Kim Jong-un 600mm rocket launcher battery : उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग-उन (Kim Jong-un) यांनी पुन्हा एकदा आपल्या लष्करी ताकदीचे प्रदर्शन करत जगाला थक्क केले आहे. उत्तर कोरियाने त्यांच्या अपग्रेड केलेल्या ६०० मिमी रॉकेट लाँचर सिस्टमची (KN-25) पूर्ण बॅटरी जगासमोर आणली आहे. हे केवळ साधे रॉकेट लाँचर नसून ते अण्वस्त्रे वाहून नेण्यास सक्षम आहे. हे शस्त्र दाखवताना किम जोंग-उन यांनी दिलेला इशारा अत्यंत धक्कादायक आहे. किम म्हणाले की, “जेव्हा हे शस्त्र आपली विनाशकारी ऊर्जा एकाच ठिकाणी केंद्रित करेल, तेव्हा शत्रूला देवाचे संरक्षणही वाचवू शकणार नाही.”
अमेरिकेने ‘KN-25’ असे नाव दिलेल्या या तोफखाना प्रणालीला जगातील सर्वात मोठी रॉकेट सिस्टम मानले जाते. या रॉकेटचा व्यास ६०० मिमी असून त्याची लांबी तब्बल ८ मीटर आहे. एका रॉकेटचे वजन सुमारे ३ टन असून ते आवाजाच्या वेगाने लक्ष्यावर झेप घेते. या नव्या आवृत्तीमध्ये उत्तर कोरियाने आधुनिक ‘चेसिस’चा वापर केला आहे, ज्यामुळे हे लाँचर खडबडीत भागातही वेगाने हालचाल करू शकते. २०१४ च्या जुन्या मॉडेल्सच्या तुलनेत हे नवीन मॉडेल अधिक शक्तिशाली आणि अचूक असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Pak-Afghan War : भारताने पाकिस्तानला सुनावलं अन् तालिबाननेही उपसली हत्यारं; ‘त्या’ एका व्हिडिओने सीमेवर रणकंदन
या शस्त्राची सर्वात भयावह बाजू म्हणजे याची ४०० किलोमीटर इतकी मोठी रेंज. प्योंगयांगमधून डागलेले हे रॉकेट संपूर्ण दक्षिण कोरियाला आपल्या कवेत घेऊ शकते. हे शस्त्र पारंपारिक तोफखाना आणि बॅलिस्टिक क्षेपणास्त्र यांच्यातील सीमारेषा अस्पष्ट करते. याचा अर्थ असा की, दक्षिण कोरियाकडे असलेल्या क्षेपणास्त्र संरक्षण यंत्रणांना (Missile Defense Systems) फसवून हे रॉकेट अत्यंत कमी वेळात लक्ष्यावर धडक देऊ शकते.
BIG warning by Kim Jong Un “Our nuclear test was for peaceful purposes. We don’t challenge anyone, But if you think you can take over North Korea like you did in Venezuela, remember, you’re playing with fire.” 😳 pic.twitter.com/n3kUCgtsAJ — Frontalforce 🇮🇳 (@FrontalForce) February 23, 2026
credit – social media and Twitter
सुरुवातीला या शस्त्राचा वापर केवळ स्फोटके वाहून नेण्यासाठी केला जाईल असे वाटले होते. मात्र, किम जोंग-उन यांनी स्पष्ट केले आहे की हे शस्त्र त्यांच्या ‘धोरणात्मक’ (Strategic) मोहिमांचा भाग आहे. लष्करी भाषेत याचा अर्थ असा होतो की हे रॉकेट ‘टॅक्टिकल’ अण्वस्त्रे वाहून नेण्यास सक्षम आहे. यात एक नवीन इलेक्ट्रॉनिक नियंत्रण प्रणाली बसवण्यात आली आहे, ज्यामुळे शत्रूचे जॅमर्स किंवा इलेक्ट्रॉनिक सिग्नल या शस्त्राची दिशा भरकटवू शकणार नाहीत. यामुळे याची अचूकता शंभर टक्के वाढली आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : कुख्यात ड्रग माफिया ‘ El Mencho’ लष्करी कारवाईत ठार; मेक्सिकोमध्ये हिंसाचार, गँगस्टर्सचा रस्त्यावर राडा, पाहा थरारक VIDEO
सत्ताधारी पक्षाच्या महत्त्वाच्या अधिवेशनापूर्वी (Party Congress) किम यांनी हे शक्तीप्रदर्शन केले आहे. विश्लेषकांच्या मते, हा केवळ लष्करी सराव नसून अमेरिका आणि त्यांच्या मित्र राष्ट्रांना दिलेला एक कठोर राजकीय संदेश आहे. किम जोंग-उन हे जगाला दाखवून देऊ इच्छितात की निर्बंध असूनही त्यांचे अण्वस्त्र कार्यक्रम अधिक वेगाने आणि आधुनिक पद्धतीने प्रगत होत आहेत. आशिया-पॅसिफिक क्षेत्रात यामुळे तणाव आणखी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
Ans: या ६०० मिमी रॉकेट लाँचर प्रणालीला जागतिक स्तरावर 'KN-25' म्हणून ओळखले जाते.
Ans: याची ४०० किमीची रेंज संपूर्ण दक्षिण कोरिया व्यापते आणि हे अण्वस्त्रे वाहून नेण्यास सक्षम असल्याने तो मोठा धोका आहे.
Ans: किम यांनी शस्त्राची विनाशकारी ताकद अधोरेखित करण्यासाठी म्हटले की, या शस्त्राच्या अचूकतेपासून आणि ताकदीपासून कोणाचेही संरक्षण होऊ शकणार नाही.






