Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

US Iran Ceasefire : अमेरिका-इराण शस्त्रसंधीचं भारताकडून स्वागत; शांततेची आशा व्यक्त

India Reaction on US Iran Ceasefire : पश्चिम आशियातील अमेरिका इराण यांच्यात झालेल्या युद्धनविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने याबाबत निवेदन जारी केले आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Apr 08, 2026 | 03:24 PM
India Reaction on US Iran Ceasefire

India Reaction on US Iran Ceasefire

Follow Us
Follow Us:
  • अमेरिका इराण युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया
  • निर्णयाचे स्वागत करत शांततेची आशा व्यक्त
  • जाणून घ्या परराष्ट्र मंत्रालयाने काय म्हटले?
India on US Iran Ceasefire : नवी दिल्ली : गेल्या महिन्याभरापासून सुरु असलेल्या अमेरिका इराण युद्ध (US Iran War) आता निवळताना दिसत आहे. दोन्ही देशांमध्ये दोन आठवड्यांसाठी शस्त्रसंधी लागू करण्यात आली आहे. यामुळे संपूर्ण जगाला काहीसा दिलासा मिळला आहे. दरम्यान भारताने या निर्णयाचे स्वागत केले आहे. तसेच पश्चिम आशियात शांतता प्रस्थापित होईल अशी आशा व्यक्त केली आहे. तर याच वेळी इराणमधील नागरिकांना देश सोडण्याचे आदेश दिले आहेत.

US-Israel Iran Ceasefire :युद्धविराम नाहीच! इस्रायलने इराणच्या अटी मान्य करण्यास; मध्यपूर्व पुन्हा पेटणार?

भारताची अमेरिका इराण युद्धावर पहिली प्रतिक्रिया

भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने मध्यपूर्वेतील युद्धासंदर्भात एक निवेदन जारी केले आहे. या निवदेनात भारताने म्हटले आहे की, आम्ही अमेरिका इराणमधील युद्धविरामाचे स्वागत करतो आणि यामुळे पश्चिम आशियात शांतता प्रस्थापित होईल अशा असा व्यक्त करतो असे भारताने म्हटले आहे. याशिवाय भारत नेहमीच शांतता, संवाद आणि कूटनीतीच्या मार्गाने तणाव कमी करण्यावर भर देतो हेही परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

युद्धाच्या परिणामांवर चिंता व्यक्त

याच वेळी भारताने महिन्याभरात युद्धामुळे झालेल्या परिस्थितीवर आणि त्याच्या परिणामांवरही भाष्य केले आहे. या युद्धामुळे सामान्य जनतेला मोठ्या हालपेष्टा सहन कराव्या लागल्या. तसेच यामुळे जागतिक उर्जा पुरवठाही धोक्यात आला होता. यामुळे आता शांतता प्रस्थापित होऊन स्ट्रेट ऑफ होर्मुझ( Strait of Hormuz) चा मार्ग विनाअडथळा सुरु राहिल अशी अपेक्षा भारताने केली आहे.

Statement on the recent development in West Asia ⬇️ 🔗 https://t.co/WwFCi4kXHg pic.twitter.com/wmsF4YUb7j — Randhir Jaiswal (@MEAIndia) April 8, 2026

इराणमधील भारतीयांना देश सोडण्याचे आदेश 

दरम्यान याच वेळी  भारताच्या इराणमधील दूतावासाने आपल्या नागरिकांसाठी नवा आदेश जारी केला आहे. अमेरिका इराण यांच्यात शस्त्रसंधी लागू झाल्यानंतर तातडीने देश सोडण्याचे आवाहन तेहरानमधील भारतीय दूतावासाने केले असून यासाठी हेल्पेलाईन नंबरही जारी करण्यात आले आहेत.

⚠️ Advisory as on 08 April 2026. pic.twitter.com/pusFQIAKKI — India in Iran (@India_in_Iran) April 8, 2026

युद्धविरामानंतर पुढे काय?

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबतच्या युद्धबंदीला दोन आठवड्यांची मंजुरी दिली आहे. तसेच युद्धविरामासाठी पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि फील्ड मार्शल असीम मुनीर यांनी केलेल्या प्रयत्नांचे अमेरिका-इराणने आभार मानले आहेत. येत्या शुक्रवारी (१० एप्रिल) पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद येथे इराणच्या १० कलमी प्रस्तावावर पुढील चर्चा होणार आहे. जगभरातून ही चर्चा यशस्वी व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. यामुळे संपूर्ण जगाचे लक्ष या चर्चेकडे लागले आहे.

‘Thank You पाकिस्तान…’, US Iran Ceasefire वर ब्रिटनने शाहबाज यांचे मानले आभार; जाणून घ्या मलेशिया-ऑस्ट्रेलियाने काय म्हटले?

💡

Frequently Asked Questions

  • Que: अमेरिका इराण युद्धबंदीवर भारताने काय प्रतिक्रिया दिली?

    Ans: पश्चिम आशियातील अमेरिका इराण शस्त्रसंधीचे भारताने स्वागत केले असून कायस्वरुपी शांतता प्रस्थापित होईल अशी आशा व्यक्त केली आहे.

  • Que: भारताने इराणीमधील आपल्या नागरिकांना काय आदेश दिला?

    Ans: अमेरिका इराणमध्ये युद्धबंदी लागू होताच तेहरानमधील भारतीय दूतावासाने इराणमधील भारतीय नागरिकांना तातडीने देश सोडण्याचे आदेश दिले आहे. तसेच हेल्पेलाईन नंबरही जारी केला आहे.

Web Title: India on us iran ceasefire mea release statment on strait of hormuz

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 08, 2026 | 03:10 PM

Topics:  

  • MEA
  • US-Israel Iran War
  • World news

संबंधित बातम्या

Felix Finkbeiner : एका चॉकलेटने लावली 1 कोटी झाडे; जर्मनीतील ‘या’ शाळकरी मुलाने कशी घडवून आणली जगभरात वृक्षारोपणाची महाक्रांती?
1

Felix Finkbeiner : एका चॉकलेटने लावली 1 कोटी झाडे; जर्मनीतील ‘या’ शाळकरी मुलाने कशी घडवून आणली जगभरात वृक्षारोपणाची महाक्रांती?

Snake Island : समुद्राच्या मध्यभागी मृत्यूचं बेट! समुद्री चाच्यांच्या खजिन्याचे रक्षण करता चक्क हजारो विषारी साप; वाचा थरारक कहाणी
2

Snake Island : समुद्राच्या मध्यभागी मृत्यूचं बेट! समुद्री चाच्यांच्या खजिन्याचे रक्षण करता चक्क हजारो विषारी साप; वाचा थरारक कहाणी

FlyDubai FZ1073 : युएईमधील भारतीयांनी फ्लायदुबईचा हिरो स्मित मच्छरला केला सलाम; वाचा त्यांच्या आरोग्याबद्दल लेटेस्ट अपडेट
3

FlyDubai FZ1073 : युएईमधील भारतीयांनी फ्लायदुबईचा हिरो स्मित मच्छरला केला सलाम; वाचा त्यांच्या आरोग्याबद्दल लेटेस्ट अपडेट

Plague Alert: ‘हे एक बायोवेपण…’ रशियातील ‘त्या’ घटनेवर ट्रम्प यांचे मोठे विधान; WHO कडून स्पष्टीकरणाची मागणी
4

Plague Alert: ‘हे एक बायोवेपण…’ रशियातील ‘त्या’ घटनेवर ट्रम्प यांचे मोठे विधान; WHO कडून स्पष्टीकरणाची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.